ख्रिस्ती म्हणून, आपल्याला पवित्रतेचे जीवन जगण्यास आणि विश्वासात एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी बोलावले आहे. तथापि, पवित्र शास्त्रासंबंधी मानकांचे पालन करण्याच्या आपल्या आवेशामध्ये, आपण पारख आणि न्यायामधील अंतराला ओलांडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. वरवर पाहिले तर दोन्हीही सारखेच दिसत असले तरी, येथे महत्वपूर्ण फरक आहेत जे आपण समजले पाहिजे जेणेकरून आपले शब्द आणि वागणुकीमध्ये पाप करण्यापासून टाळले पाहिजे.
आपल्या स्वतःची प्रथम पडताळणी करणे
पारख आणि न्यायामधील फरक ओळखण्याची एक किल्ली ही इतरांच्या कृत्यांचे मुल्यांकन करण्याअगोदर आपल्या स्वतःची पूर्णपणे तपासणी करण्याने पारख सुरुवात होते. १ करिंथ. ११:२८, ३१ मध्ये प्रेषित पौल आपल्याला उपदेश देतो, “म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे... आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता.”
या उलट, जेव्हा कोणी नेहमी इतरांना दोष लावत असतो त्याच समस्येसाठी त्याने स्वतःच्या जीवनात अजूनही मात केलेली नसते. रोम. २:१ इशारा देते, “तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही; कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतो त्यात त स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोषी ठरवणारा तुही त्याच गोष्टी करतोस.” “पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.” (मत्तय ७:५)
निष्कर्ष काढण्याअगोदर तथ्ये गोळा करणे
पारख आणि न्यायामधील आणखी एक फरक आपण माहितीचा कसा वापर करतो त्याशी संबंधित आहे. पारख करण्यात निष्कर्षापर्यंत पोहचण्याअगोदर माहितीची काळजीपूर्वक तपासणी करणे समाविष्ट आहे. १ थेस्सल. ५:२१ आपल्याला उपदेश देते, “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा.”
या उलट, पहिली छाप, जे ऐकले आहे आणि मर्यादित माहितीवर आधारित न्याय केला जातो. ज्यांनी न्याय केला आहे ते अगोदरच मांडलेल्या त्यांच्या मताचे समर्थन करण्यासाठी पुरावे शोधत असतात, त्यांच्या स्वतःच्या पूर्वग्रहांचे प्रमाणीकरण शोधत राहतात. परंतु नीतिसूत्रे १८:१३ सावधगिरीचा इशारा देते, “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.” कोणत्याही प्रकारचा निकाल देण्यापूर्वी आपण तथ्ये गोळा केली पाहिजे आणि लोकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.
समस्येला खाजगीपणे सोडवावे जेव्हा शक्य असते
तिसरा फरक हा आहे की पारख समस्येला जितके शक्य होईल तितके खाजगीपणे सोडवण्याचा प्रयत्न करते, तर न्याय करण्यात सार्वजनिकपणे उघड करणे आणि दोष लावण्याची वृत्ती असते. मत्तय १८:१५ मध्ये प्रभू येशूने स्वतः अशा खाजगीपणे समस्या सोडवण्याच्या तत्वाला प्रमाणित केले आहे, हे म्हणत, “तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांतात असताना त्याचा अपराध त्याला दाखव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल.”
पारख करण्याचा उद्देश जे अडखळले आहेत अशा भाऊ-बहिणींना पुनःस्थापित करण्यात आहे, सार्वजनिकपणे त्यांना लज्जित करण्याचा नाही. गलती. ६:१ उपदेश देते, “बंधूजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तुही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे.” आपण जी कृपा प्राप्त करण्याची आशा ठेवतो तीच कृपा आपण इतरांवर देखील करावी.
आपल्या स्वतःची हिशेबदेही ओळखावी
शेवटी, आपण हे ओळखले पाहिजे की न्याय करणे हे देवाचे काम आहे, आपले नाही. रोम. १४:१०-१२ आग्रह करते, “तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे, त्या अर्थी माझ्यापुढे प्रत्येक गुडघा टेकेल, व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील.”
त्या दिवशी, आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठी उत्तर देऊ, इतरांवर आपल्या टिकांसाठी नाही. आपण पारख करणे आचरणात आणणे आणि जे चुकले आहेत त्यांची सौम्यपणे सुधारणूक करणे हे निश्चित असले तरी, आपण आपल्या स्वतःचा अशक्तपणा आणि कमकुवतपणा लक्षात ठेवून हे नम्रपणे, काळजीपूर्वक केले पाहिजे. चला आपण आपल्या मनात उद्देश ठेवू या की आत्मपरीक्षण, तथ्यानुसार समज आणि पुन:स्थापन करण्याच्या इच्छेने पारख करावी-ढोंगीपणा, गृहीत धरून आणि सार्वजनिकपणे लज्जित करण्याने पेटून उठून कधीही न्याय करू नये. जशी म्हण आहे, “तथ्ये ही तुमचे मित्र आहेत, पण गृहीत धरणे हे तुमचे शत्रू आहेत.”
प्रार्थना
प्रेमळ स्वर्गीय पित्या, ज्ञान आणि कृपेने पारख करण्यासाठी मला मदत कर, इतरांची पडताळणी करण्याअगोदर माझ्या स्वतःच्या मनाचे परीक्षण करावे. न्याय करणे हे केवळ तुझ्याजवळ आहे हे मी नेहमी लक्षात ठेवावे असे होऊ दे. माझे विचार, शब्द आणि कृत्यांना शुद्ध कर जेणेकरून मी नेहमी तुझा आदर करावा. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1● भिऊ नका
● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● नम्रता हे कमकुवतपणा समान नाही
● परमेश्वरासाठी तहानेले झालेले
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● तुम्ही किती विश्वसनीय आहात?
टिप्पण्या