प्रेषित पौल करिंथ येथील लोकांना लिहित आहे, हे म्हणत, "कारण तुम्हांस ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांस ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हांस विनंती करितो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा." (१ करिंथ. ४:१५-१६)
बायबल मधील काही महान नायकांच्या यशाचे एक रहस्य म्हणजे मार्गदर्शक असणे होते. तुम्हांला गुरु आहेत काय ज्यांचे तुम्ही अनुकरण करू शकता आणि ज्यांकडून तुम्ही शिकू शकता? जर नाही, तर तुमच्यासाठी ही भूमिका पूर्ण करण्यास त्या व्यक्तीचा प्रार्थनापूर्वक शोध घ्या, ज्याप्रमाणे पौलाने करिंथ येथील लोकांसाठी केले होते. जर तुम्हांला आध्यात्मिकदृष्टया वाढावयाचे आहे, तर हा एक सिद्धांत आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
बायबल मधील मार्गदर्शनाची काही उदाहरणे पाहू या:
उदाहरण #१
यहोशवा हा नेहमीच, मोशे, या देवाच्या माणसाभोवती राहत असे.
"मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे." (निर्गम ३३:११)
हा एक अतिशय संक्षिप्त आणि सूक्ष्म पण महत्वाचा उल्लेख आहे त्या वस्तुस्थितीचा की यहोशवा उपस्थित असे जेव्हा परमेश्वर मोशेबरोबर बोलत असे, पण याहूनही अधिक महत्वाचे हे आहे की यहोशवा मंडप सोडून बाहेर येत नसे, जरी मोशे तेथून निघून गेलेला असेन. मोशेच्या प्रार्थनेच्या जीवनाकडून त्याने देवाबरोबरच्या घनिष्ठतेबद्दल शिकले होते. जेव्हा मोशे देवाला भेटण्यास डोंगरावर गेला, तेव्हा यहोशवा त्याच्याबरोबर गेला. (निर्गम २४:१३)
यहोशवा या मनुष्याने प्रेषित मोशेचे जीवन, देवाशी असलेले त्याचे नाते आणि त्याचे जीवन अतिशय काळजीपूर्वक अनुसरण केले. मग, एका दिवशी, या मनुष्याने इस्राएल लोकांना वचन दिलेल्या कनान देशात नेले.
उदाहरण #२
अलीशा हा एक शेतकरी होता. जेव्हा एलीया पहिल्या प्रथम अलीशाला भेटला, तेव्हा तो बैलांची बारा जोते चालवून शेत नांगरित होता (१ राजे १९:१९). त्याचा पिता हा एक श्रीमंत मनुष्य होता. एके दिवशी एलीया आला आणि त्याने त्याचा अंगरखा अलीशावर टाकला, आणि त्या दिवसापासून पुढे, अलीशा विश्वासपूर्वक एलीयास अनुसरला. त्या काळात तेथे पुष्कळ संदेष्ट्ये होते, परंतु हा मनुष्य, अलीशा, त्याच्या गुरूच्या पाठीमागे चालला. आज फारच कमी लोक असे करताना मी पाहतो.
आज, पुष्कळ लोकांना देवाच्या पुरुष किंवा स्त्रीच्या घनिष्ठतेत चालण्याची इच्छा आहे, केवळ इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करण्यासाठी. त्यांना देवाच्या माणसाकडून शिकण्यात अजिबात रस नाही. देवाचा माणूस जो अभिषेक घेऊन आहे त्याची त्यांना खरोखर पर्वा नाही. त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर मिळवावे यासाठीच केवळ त्यांना त्या अभिषेकाचा वापर करण्याची इच्छा आहे.
१ परमेश्वराने एलीयास वावटळीच्याद्वारे स्वर्गास घेऊन जाण्याचा समय आला त्या वेळी एलीया अलीशाबरोबर गिलगाल येथून चालला होता.
२ एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे; तर तू येथेच थांब.” अलीशा म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला कधी सोडणार नाही.” मग ते बेथेल येथे गेले.
३ बेथेलातल्या संदेष्ट्यांचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, “आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने म्हटले, “मला ठाऊक आहे, पुरे करा.”
४ एलीया त्याला म्हणाला, “अलीशा, परमेश्वर मला यरीहोला पाठवत आहे तर तू येथे थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते यरीहोस गेले.
५ यरीहोतील संदेष्ट्यांचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, “आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने म्हटले, “मला ठाऊक आहे, पुरे करा.”
६ एलीया त्याला म्हणाला, “परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवत आहे. तू येथेच थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते दोघे पुढे चालले. (२ राजे २:१-६)
उल्लेखित चार ठिकाणांपैकी (गिलगाल, बेथेल, यरीहो, यार्देन) प्रत्येक हे इस्राएलाच्या इतिहासात अत्यंत महत्वपूर्ण आहेत, आणि मी विश्वास ठेवतो की, ते ख्रिस्ती जीवन प्रवासातील टप्प्यांचे अत्यंत प्रतीकात्मक आहेत. गिलगाल हे देहाविषयी उपाय करण्याचे ठिकाण आहे (यहोशवा ४:१९-२४). बेथेल जगावर मात करण्याबद्दल बोलते कारण पवित्रशास्त्रात मिसर हे जगाचे प्रतिनिधित्व करते. यरीहो हे आध्यात्मिक युद्धाचे ठिकाण आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोकांना आध्यात्मिक युद्धे आवडत नाहीत कारण ते मागणी करते, त्यामुळे ते सोपा मार्ग स्वीकारतात. ते देवाच्या माणसाला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगतात.
एलीया त्याच्याभोवती असणाऱ्या माणसाला आवाहन देत होता, पण तरीसुद्धा, अलीशाने एलीयाची सेवा केली. अलीशा जरी एलीयाच्या इतक्या घनिष्ठतेमध्ये होता, त्याने पदांसाठी प्रयत्न केला नाही परंतु सेवकाची भूमिका स्वीकारली आणि एलीयाच्या हातावर पाणी टाकणारा मनुष्य म्हणून ओळखला गेला होता. (२ राजे ३:११)
काही प्रश्ने आहेत ज्यांची तुम्हांला सत्य उत्तरे देणे आवश्यक आहे
१. तुम्हीं कोणाकडून शिकत आहात?
२. तुम्हीं कोणाचे अनुसरण करीत आहात?
३. तुमचा गुरु कोण आहे?

प्रार्थना
पित्या, माझे डोळे उघड की माझ्या जीवनात गुरुचे महत्त्व ओळखावे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● बदलण्याची वेळ● एक आदर्श व्हा
● दिवस १९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● वचनामध्ये ज्ञान
● शेवटच्या समयाच्या चिन्हांची पारख करावी?
● विचार करण्यास वेळ घ्या
● नवीन तुम्ही
टिप्पण्या