मुख्य कारण की आपण शत्रूला घाबरतो ते हे की, कारण आपण जे दृश्य दिसते त्याप्रमाणे चालतो, विश्वासाने नाही.
२ राजे ६ कडेमी तुमचे लक्ष घेऊन जातो. आरामाचा राजा इस्राएल विरुद्ध युद्ध करण्यात होता. तो हे समजूनफार संतापला होता की जे काही तो गुप्तपणेत्याच्या सल्लागारांमध्ये बोलत असे ते इस्राएल च्या राजाला कळविण्यात येत होते.
त्याने शंका घेतली की त्याच्या सल्लागारांमध्ये कोणी भेद प्रगट करणारा असेल परंतु राजाला याची खात्री देण्यात आली की तसे काही नाही. पुढे त्यास सांगण्यात आले की हा तो संदेष्टा अलीशा आहे ज्यास देवाचा आत्मा सर्व काही प्रगट करतो जे आरामाचा राजा गुप्तपणे योजितो. आरामाचा राजा मग त्याच्या निवडक संघास संदेष्टा अलीशा ला अटक करण्यास सांगतो.
सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ यांसह नगरास वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी, हाय! हाय!
आता आपण काय करावे? तो म्हणाला, भिऊ नको; त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.
अलीशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, यालादृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडिले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यांस दिसले. (२ राजे ६:१५-१७)
अलीशा चा सेवक पाहत होता पण त्यास दिसत नव्हते. त्याने अरामी सेनेला त्यांच्या नगरास वेढलेले पाहिले, परंतु त्याने देवाच्या लोकांना असंख्य देवदूतांद्वारे संरक्षण दिले गेले आहे हे पाहिले नाही. तो आध्यात्मिक आंधळेपणात चालत होता.
संदेष्टा अलीशा ची प्रार्थना ही या आंधळे पणाला उपाय करण्यातसामर्थ्यशाली साधन होती. आपल्याला दररोज प्रार्थना करण्याची गरज आहे "प्रभो, माझे डोळे उघड की तुला जे मी बघावयास पाहिजे ते कदाचित मी पाहू शकावे."
जेव्हा आपले आध्यात्मिक डोळे हे उघडे केले जातात, आपण देवाच्या दृष्टीकोनाने गोष्टींना पाहतो. आपण पाहू की आपण ख्रिस्ता बरोबर स्वर्गीय स्थानात बसलेले आहोत. आपण पाहू की ख्रिस्त राज्य करतो आणि अगोदरच विजय हा प्राप्त केलेला आहे. आपण भीती मध्ये चालणार नाही.
आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्याला आव्हाने आणि विरोधाचा सामना करावा लागू शकतो जो अजिबात परवडणारा नाही. तथापि, जेव्हा आपण जसे दिसते त्यापेक्षा विश्वासाने चालण्याची निवड करतो, आपण विश्वास ठेवू शकतो की परमेश्वर दृष्यामागे कार्यरत आहे, आपल्या चांगल्यासाठी आणि त्याच्या गौरवासाठी घटना आणि परिस्थितीचे आयोजन करीत असतो. आपण शांती आणि धाडस प्राप्त करू शकतो, हे जाणून की परमेश्वर आपल्या बाजूने आहे आणि त्याचे देवदूत आपल्या बाजूने लढत आहेत.
प्रार्थना
१. आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच, ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा देखील या प्रार्थना मुद्द्यांचा उपयोग करा.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या येशूच्या नावाने माझे आध्यात्मिक नेत्र उघड की त्या गोष्टी पाहाव्यात जे मी पाहावे अशी तुझी इच्छा आहे.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, तुझे वचन म्हणते की, "कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दु:ख मरणास कारणीभूत होते" (२ करिंथ ७:१०). फक्त तूच आमचे डोळे या सत्यासाठी उघडू शकतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना ईश्वरप्रेरित दु:खाच्या भावनेसह तुझ्या आत्म्याचा स्पर्श कर की त्यांनी पश्चाताप करावा, तुला शरण यावे आणि त्यांचे तारण व्हावे. येशूच्या नावाने.
आर्थिक प्रगती
पित्या, येशूच्या नावाने मला लाभहीन श्रम आणि भ्रमित कार्यांपासून मुक्त कर.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की थेट प्रक्षेपण देशभरातील हजारो कुटुंबांपर्यंत पोहचावे. तुला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखण्यासाठी त्यांना आकर्षित कर. जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वचन, उपासना आणि प्रार्थनेमध्ये वाढीव.
राष्ट्र
पित्या, येशूच्या नावाने, आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने कार्यरत होण्यासाठी मी प्रार्थना करतो, ज्यामुळे चर्चची सतत वाढ व विस्तार होईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सुटकेचा दिवस (दिवस १०)● प्रीति-जिंकण्याची योजना -२
● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● कृपे मध्ये वाढणे
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● ते व्यवस्थित करा
● दिवस २०: ४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या