जेव्हा मी लोकांना विचारले की त्यांचा गुरु कोण आहे? काही उत्तर देतात, "येशू त्यांचा गुरु आहे." अशा लोकांना खरेच माहीत नाही किंवा समजत नाहीत की गुरु संबंधात बायबल काय म्हणते. गुरु म्हणजे एक व्यक्ति आहे ज्यास देव नियुक्त करतो.
जर तुम्ही बायबल वाचले असेन, तीमथ्यीचे वडील ग्रीक विदेशी होते. पण तरीही, तीमथ्याने प्रेषित पौलाची गुरु म्हणून निवड केली. प्रेषित पौलाने तीमथ्याला "विश्वासामधील एक खरा पुत्र" असे म्हटले (१ तीमथ्यी १:२). आज, चर्चमध्ये विश्वासात खरा मुलगा किंवा खरी मुलगी" म्हणून कसे संबोधले जाऊ शकते."-फारच कमी. आज पुष्कळांना देवाच्या प्रसिद्ध पुरुष किंवा स्त्रीशी जोडलेले असणारे नाव व प्रसिद्धी हवी आहे.
तुम्हांला ठाऊक आहे काय की तीमथ्यी हा इफिस येथील पहिला बिशप झाला? हे कसे काय घडले? प्रेषित पौलाद्वारे त्यास मार्गदर्शन मिळाले होते. काही गोष्टी आहेत ज्या शिकविल्या जाऊ शकतात आणि काही गोष्टी आहेत ज्या केवळ आत्मसात केल्या जाऊ शकतात.
माझ्या अगदी सुरुवातीच्या ख्रिस्ती जीवनापासून, मला गुरुचे महत्त्व ठाऊक आहे. देवाचे दोन माणूस ज्यांच्याकडून मी खरोखर शिकलो ते डी.जी.एस. दिनाकरण आणि पास्टर बेनी हीन आहेत. देवाच्या या माणसांना मी व्यक्तिगतरीत्या कधीही ओळखत नव्हतो. मी अस्तित्वात आहे हे त्यांना कदाचित माहीत नसावे. मी त्यांची पुस्तके वाचत असे, त्यांचे विडीओ पाहत असे आणि त्यांच्या भाषणांना पुन्हा पुन्हा ऐकत असे. प्रत्येक संदेश, मी सर्वकाही लिहून ठेवत असे आणि पुढे अभ्यास करीत असे. मी त्यांच्या जवळच्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करीत असे आणि त्यांच्या वैयक्तिक प्रार्थना जीवनाबद्दल जाणून घेई.
मला आठवते जेव्हा देवाचा माणूस डी. जी. एस. दिनाकरण कोल्हापूरला आले होते; मी तेथे दोन बसेसची व्यवस्था केली होती आणि बऱ्याच लोकांना त्या प्रार्थना सभेला घेऊन गेलो होतो. तो जवळजवळ १० तासांचा प्रवास होता. ती शहराची बस होती जी आम्हांला स्वस्तात मिळाली होती. सीट हे सरळ होते आणि बसचे निलंबन भयंकर होते आणि आमची पाठ दुखत होती. आम्ही झोपलो सुद्धा नाही पण देवाच्या माणसाला जवळून पाहण्यास मी इतका उत्साही होतो की मी सर्व काही आनंदाने सहन केले.
काही लोकांना गुरुसोबत असण्याचा खूप अभिमान असतो. ते त्या व्यक्तीसोबत दोन दिवस राहतात, आणि त्यानंतर, ते त्यांच्या मनासारख्या गोष्टी करतात. देवाचा कोणताही माणूस परिपूर्ण नाही. कोणताही गुरु परिपूर्ण नाही, परंतु देव अशा गुरूंचा वापर करून तुम्हांला देवाबरोबर चालताना पुढील स्तरावर नेईल.
येशूने त्याच्या जीवनातून तीन व अर्धे वर्षे सेवाकार्यात घालविली. त्याचा अधिकतर वेळ हा जमावाबरोबर किंवा संपन्न किंवा प्रभावशाली नेत्यांबरोबर घालविलेला नव्हता परंतु बारा पुरुष ज्यांच्या जीवनात त्याने आपले जीवन व बुद्धि घातली होती. प्रथम, तो लोकसमुदायाबरोबर दाखल्यांनी बोलत असे; मग तो शिष्यांना स्पष्ट करून व समजावून सांगत असे. हे पुरुष त्याच्या चर्चला बनविणारे साधन बनले.
येथे जमाव आणि मग शिष्य आहेत. शिष्य नेहमीच गुरूचा शोध घेतात. जर तुम्ही मला तुमचा गुरु म्हणता, तर मग यावर्षी देवाच्या मार्गात वाढण्याविषयी तुम्ही गंभीर असले पाहिजेत. जर तुम्हाला खरोखर मार्गदर्शन घेण्याची गरज आहे तर तुम्ही मऊ मातीसारखे असले पाहिजे. देवाचा आत्मा तुमच्या गुरुबरोबर कार्य करीत आहे तो तुम्हांला एका उपयोगी पात्रामध्ये घडवेल जे स्वामीच्या उपयोगासाठी तयार असेल. (२ तीमथ्यी २:२१)

प्रार्थना
पित्या, तूं माझ्या जीवनात जो गुरु दिला आहे त्यासाठी मी तुझे आभार मानतो. (काही वेळ तुमच्या गुरुसाठी आणि त्याच्या/तिच्या बरोबरच्या तुमच्या संबंधासाठी प्रार्थना करण्यात घालवा.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● याचा अर्थ काय आहे, येशूचे कार्य करणे आणि त्यापेक्षा मोठी कार्य करणे?● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
● २१ दिवस उपवासः दिवस ०६
● पित्याची मुलगी-अखसा
● मध्यस्थी करणाऱ्यांसाठी एक भविष्यात्मक संदेश
टिप्पण्या