डेली मन्ना
दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Saturday, 21st of December 2024
23
20
167
Categories :
उपास व प्रार्थना
देवाच्या बहुविध ज्ञानाशी जुळणे
“मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी , ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.” (निर्गम ३१:३)
देव निर्माणकर्ता देव आहे, आणि ते आपण निसर्गात पाहू शकतो. त्याने जे सर्वकाही निर्माण केले आहे त्यामध्ये आपण ते पाहू शकतो. सर्वकाही सुंदर आणि अद्भुतरित्या बनवले आहे. जर तुम्ही आपल्याजवळ असणारे विविध प्रकारचे पक्षी, झाडे आणि मासे आणि जेथे कोठे तुम्ही वळता तेथे दिसणारे प्राणी ह्यांच्याकडे पाहिले, तर तुम्ही सृष्टी निर्मितीची सुंदरता पाहाल.
हे सर्वकाही शक्य झाले कारण सृष्टीमध्ये देवाचे ज्ञान सक्रीय होते. म्हणजे, देव निर्माण करणारा आहे, आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या सर्व लेकरांनी देखील निर्माण करणारे व्हावे. पवित्र शास्त्र म्हणते की आपल्याला ख्रिस्ताचे मन आहे (१ करिंथ. २:१६). म्हणून ख्रिस्ताच्या मनाचे एक वैशिष्ट्य हे ज्ञान आहे. ख्रिस्त हा देवाचे ज्ञान आहे (१ करिंथ. १:२४). जेव्हा आपण म्हणतो आपल्याला ख्रिस्ताचे मन आहे, तेव्हा आपण सक्रीयपणे समस्या सोडवणारे असावे अशी अपेक्षा असते.
पुष्कळ लोक त्यांच्या वित्तीयतेमध्ये जखडून राहतात कारण ते उपाय निर्माण करू शकत नाहीत. व्यवसायी जगत समस्या सोडवणे आणि उत्पादन करण्यावर वाढत जाते. जर येथे समस्या आहे, तर येथे उपाय देखील असतो जो ज्ञानाच्या आत्म्याने आत्मसात करता येऊ शकतो जे वित्तीय प्रगतीकडे नेते.
आजच्या आपल्या वचनात, आपण पाहतो की देव लोकांना ज्ञान, समज आणि बुद्धीने भरतो जेणेकरून ते गोष्टी निर्माण करण्यास सक्षम होऊ शकतील. आज आपल्या प्रार्थनेचे लक्ष्य हे देवाच्या बहुविध ज्ञानाशी जुळणे आहे जेणेकरून आपण आयुष्याचा विविध क्षेत्रात प्रगती करण्यास सक्षम व्हावे.
निर्गम ३६, वचन २ म्हणते,
“नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती, त्यांना मोशेने बोलावले.”
या वचनावरून तुम्ही पाहू शकता की येथे विशेष लोक आहेत ज्यांना ज्ञानी-हृदय असलेले लोक म्हणतात. ते हे लोक आहेत ज्यांच्यामध्ये देवाने ज्ञानाचा आत्मा टाकला आहे. देवाचे मुल म्हणून, तुमच्यात, ख्रिस्ताच्या व्यक्तीमत्वात देवाचे ज्ञान आहे. ख्रिस्त हा देवाचे ज्ञान आहे आणि तुम्हांला देवाचे ज्ञान आहे. म्हणून तुमच्यासाठी काहीही अत्यंत कठीण नाही झाले पाहिजे. तुमच्यासाठी काहीही कठीण नाही असले पाहिजे. तुमच्यासाठी काहीही समस्या नाही असले पाहिजे कारण जे मन तुम्हांला आहे ते ज्ञानाचे मन आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही समस्यांना ते सोडवू शकते.
१ राजे अध्याय ४, वचन२९ मध्ये, असे म्हणते,
“देवाने शलमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले.”
एका माणसाचे ज्ञान, संपूर्ण राष्ट्र, मिसर देशाच्या ज्ञानापेक्षा अधिक होते. हेच जे देव करू शकतो. हे ज्ञान शलमोनावर आले नाही. ते काहीतरी होते जे शलमोनाने स्वप्नात असताना प्रार्थनेच्या ऐवजी त्याला मिळावे अशी इच्छा बाळगली होती (१ राजे ३:५-१२). म्हणून, तुम्ही देवाच्या ज्ञानाशी संपर्क करू शकता त्यातील एक मार्ग त्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा आणि ते मागा.
शलमोनाच्या जीवनातून दुसरी गोष्टी ही होती की तो या ज्ञानासाठी मागत होता, स्वार्थी उद्देशासाठी नाही. त्याला ज्ञान हवे होते म्हणजे तो देवाच्या लोकांचे मार्गदर्शन करू शकेल. देवाचे राज्य, त्याचे लोक, आणि त्यातील रुची हे प्रेरणा देणारी शक्ती होते ज्याने शलमोनाला देवाजवळ ज्ञानाचा आत्मा मागायला लावले.
तुमच्या जीवनात देवाने ज्ञानाच्या आत्म्याला मोकळे करावे अशी तुमची इच्छा का आहे? हे स्वार्थी उद्देशासाठी नाही. देवाचे राज्य तुमच्या अंत:करणात असले पाहिजे म्हणजे जेव्हा ते मोकळे केले जाईल, तेव्हा तुम्ही राज्यासाठी उपाय म्हणून त्याचा वापर कराल जे राज्याच्या वाढीसाठी आणि पृथ्वीवरील क्षेत्रात धार्मिकता स्थापित करण्यासाठी साहाय्य करते. दारिद्र्यासाठी उपचार हा ज्ञानाचा आत्मा आहे कारण ज्ञान संपत्ती निर्माण करते. (नीतिसूत्रे ३:१६)
येथे तीन प्रकारचे ज्ञान आहे:
१. आपल्याला देवाचे ज्ञान आहे; जे अंतिम आहे. (याकोब १:५)
२. आपल्याला माणसाचे ज्ञान आहे, ते माणसाच्या संवेदना आणि तर्कांवर आधारित आहे. आणि आपल्याला वासनामय आणि आत्मारहित ज्ञान देखील आहे. (१ करिंथ. ३:१८-२०)
३. सैतान देखील ज्ञानाचे काही प्रमाण प्रदर्शित करतो. (याकोब ३:१५)
मी ठामपणे विश्वास ठेवतो की आजपासून, तुम्ही जीवनाच्या सर्व क्षेत्रात देवाच्या आत्म्यानुसार चालू लागाल कारण देवाचे बहुविध ज्ञान येशूच्या शक्तिमान नावाने तुमच्या जीवनात मोकळे केले जाईल.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. हे परमेश्वरा, आज माझ्या जीवनात येशूच्या नावाने तुझ्या ज्ञानाचा आत्मा मोकळा कर. (याकोब १:५)
२. माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात देवाच्या ज्ञानासोबत मी जुळत आहे आणि मी येशूच्या नावाने मोठी प्रगती करण्यास सुरुवात करत आहे. (इफिस. ३:१०)
३. मला ख्रिस्ताचे मन आहे, त्यामुळे येशूच्या नावाने, देवाच्या आत्म्याने कार्य करण्यास येशूच्या नावाने मी सुरुवात करत आहे. (१ करिंथ. २:१६)
४. प्रत्येक अडचणी आणि प्रत्येक समस्या ज्यांना मी आज अनुभव करत आहे, त्या प्रत्येक समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी येशूच्या नावाने मी ज्ञान प्राप्त करत आहे. (नीतिसूत्रे २:६)
५. पित्या, मला वित्तीय प्रगतीसाठी अंतर्ज्ञान, अद्भुत उपाय आणि सक्रीय ज्ञान येशूच्या नावाने प्रदान कर. (नीतिसूत्रे ८:१२)
६. हे परमेश्वरा, स्वर्गाच्या खिडक्या उघड आणि मजवर आशीर्वादांचा वर्षाव कर, आशीर्वाद जे अंतर्ज्ञान निर्माण करेल, आणि उत्पादन आणि सेवाकार्य निर्माण करण्यासाठी मला समर्थ करेल जे लोकांना येशूच्या नावाने आश्चर्यचकित करेल. (मलाखी ३:१०)
७. देवाच्या ज्ञानाने, माझ्या जीवनाच्या विरोधातील दुष्टाच्या प्रत्येक योजलेल्या गोष्टी, जटिलता आणि दोषापासून येशूच्या नावाने मी बाहेर निघतो. (याकोब ३:१७)
८. परमेश्वरा लोकांशी संबंध बनवण्यास, जे लोक माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्याशी संबंध बनवण्यास, आणि लोक जे माझ्यासारखेच आहेत आणि लोक जे माझ्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहेत त्यांच्याशी संबंध बनवण्यास येशूच्या नावाने मला ज्ञान प्रदान कर. (लूक. २:५२)
९. परमेश्वरा, प्रत्येक संधी, प्रत्येक स्त्रोत, आणि तू मला दिलेला वेळ आणि कौशल्यांना वाढवण्यासाठी येशूच्या नावाने मला ज्ञान प्रदान कर. (इफिस. ५:१६)
१०. उपाय निर्माण करण्यासाठी मी देवाचे ज्ञान प्राप्त करतो, जे देवाच्या राज्याला येशूच्या नावाने वाढवेल. (नीतिसूत्रे ४:७)
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
● शेवटची घटका जिंकावी
● काहीही लपलेले नाही
● एक मुख्य किल्ली
● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी
● तुम्ही किती विश्वसनीय आहात?
टिप्पण्या