राजा यहोशाफाट नेत्याच्या सेनेच्या पुढे एक गीत गाणाऱ्यांची मंडळीदेवासाठीस्तुती करण्यास पाठविली. केवळ याची कल्पना करा, एक गीत गाणाऱ्यांचा गट सेनेचे पुढारपण करीत आहे. तो निश्चितच त्यास्तुती करणाऱ्यास मरण्यास पाठवीत नाही आहे. त्यास भविष्यात्मक गीताचे प्रकटीकरण मिळाले, आणि तुम्हाला सुद्धा मिळावे. त्याने त्यांना बाहेर पाठविले की विजयाची घोषणा करा जे त्याने परमेश्वराच्या वचना द्वारे अगोदरच प्राप्त केले आहे.
बायबल याची नोंद करते: "ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा अम्मोनी, मवाबी व सेइर पहाडातले लोक जे यहूदावर चाल करून येत होते त्यांस गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. अम्मोनी व मवाबी सेइर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्यांजवर उठले; सेइरनिवाश्यांचा निःपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. (२ इतिहास २०: २२-२३)
जेव्हा ते भविष्यात्मक गीत गाऊ लागले, त्यांची शत्रू एकमेकांबरोबर लढू लागले. तेथेछावणीमध्ये संभ्रम होता. विजयहाकोणतेही शस्र न वापरता केवळ परमेश्वराला स्तुती गाऊन मिळविला गेला होता.
हे शेवटच्या समयात घडणार आहे. जेव्हा चर्चभविष्यात्मक स्तराच्या उपासने मध्ये जाणार आहे, तेथे शत्रूच्या छावणी मध्ये संभ्रम असणार आहे. ते एकमेकांबरोबर लढणार आहेत.
जेव्हा असे वाटते की सर्व नरकमय यातना ह्या तुमच्या विरुद्ध मोकळ्या झाल्या आहेत, स्वर्ग हा शत्रू विरुद्ध मोकळा होत आहे आणि शत्रूवर स्तुतीच्या भविष्यात्मक गीता द्वारे विजय मिळवीत आहे.
स्तोत्रसंहिता १४९: ५-९ आपल्याला सांगते की, जेव्हा देवाचे लोक गीता मध्ये देवाची स्तुती करतात, हे जसे काही धारदार तरवार प्रमाणे आहे जे त्यांच्या शत्रूंवर बदला आणते.
अंधाराच्या दुष्ट शत्रूंना बांधले जाते. पुढे, पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की,त्या सर्वांचे जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात हे गौरवी सौभाग्य आहे.
स्तुतीचे गीत गाणे हे चांगले वाटण्या सारखे नाही, आणि निश्चितच फारच चांगले दिसत आहे असे नाही. परमेश्वरासाठी स्तुतीचे गीत गाण्यासाठी तुम्हाला गायक किंवा संगीतकार होण्याची गरज नाही. पवित्र आत्म्याला तुमच्यावर पूर्णपणे वर्चस्व करू दया आणि स्वर्गीय स्तुती त्याच्यासाठी मोकळी करा. काहीतरी मोठे हे लवकरच घडणार आहे!
Bible Reading: Isaiah 6-9
प्रार्थना
धन्यवादीत पवित्र आत्म्या माझा ताबा घे, आणि माझ्या मध्ये स्तुती ला जन्म दे. असे होवो की माझी स्तुती तुझ्या दृष्टिसमोर स्वीकारयोग्य होवो. येशूच्या नांवात. (आता मोठयाने गीता द्वारे परमेश्वराची उपासना करीत काही वेळ घालवा.)
Join our WhatsApp Channel

Most Read
● त्याचे दैवी दुरुस्तीचे दुकान● विश्वासाचे जीवन
● भिन्नता ही स्पष्ट आहे
● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
● अंतिम क्षण जवळ येण्यास सुरुवात होते
● धैर्यवान राहा
● भविष्यवाणीचा आत्मा
टिप्पण्या