"त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याजपुढे वाचिला. त्यांत हा मजकूर होता: अहश्वेरोश राजाचे खोजे द्वारपाळ असत, त्यापैंकी दोघे बिग्थान व तेरेश यांनी राजावर हात टाकण्याचा बेत केल्याची मर्दखयाने खबर दिली. तेव्हा राजाने विचारले की या कामगिरीबद्दल मर्दखयाचे काही गौरव अथवा मानसन्मान करण्यात आला काय? त्याच्या खिदमतीत असलेल्या सेवकांनी त्यास सांगितले, त्याच्या बाबतीत कांहीएक करण्यात आले नाही." (एस्तेर ६:१-३)
हे उदाहरण पुरवठा परिपूर्णपणे करणे दाखविते. अहश्वेरोश राजा झोपू शकला नाही, त्याच्याकडे अनेक पर्याय होते की वेळ घालवावा, तरीही त्याने आदेश दिला की ग्रंथ त्याच्याकडे आणला जावा आणि वाचण्यात यावा. पुस्तक-आणणारा इतिहासाच्या नोंदीमधील कोणताही भाग निवडू शकला असता, परंतु त्याने या विशेष भागाकडे आणले. पुस्तक इतर कोणत्याही पानावर उघडले जाऊ शकले असते, परंतु ते त्याच पानावर उघडले जे राजाचा वध होण्यापासून वाचविण्याच्या मर्दखयाच्या वीर कार्याची नोंद असलेल्या ठिकाणी उघडले गेले. त्या मार्गातील प्रत्येक पायऱ्यांवर, हे स्पष्ट आहे की देव त्या घटनेंना घडवीत होता.
ज्याप्रमाणे राजा अहश्वेरोशकडे इतिहासाचा ग्रंथ, स्मरण करण्याचे पुस्तक होते, त्याचप्रमाणे देवाकडे देखील स्मरण करण्याचे पुस्तक आहे. मलाखी ३:१६ मध्ये यास स्पष्ट केले आहे, "तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले; ते परमेश्वराने कान देऊन ऐकले, व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली."
दुसऱ्या शब्दात, ज्याप्रमाणे राजाचे पुस्तक त्याच्या प्रजेच्या कृत्यांची नोंद करते, देवाचे पुस्तक त्यांच्या कृत्यांची नोंद करते जे त्याचा सन्मान व आदर करतात. देव सहसा नियमितपणे येत असतो की आपले परिश्रम आणि दया व प्रीतीच्या आपल्या कार्यास पुरस्कृत करावे. तो अंत:करण तपासतो आणि त्याची नोंद घेतो. आपले प्रत्येक कृत्य हे बीज आहे आणि ते आपल्याकडे पिकाच्या स्वरुपात परत येते. म्हणून बी पेरत राहा.
इब्री लोकांस पत्र ६:१० मध्ये बायबल म्हणते, "कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही." मर्दखयास त्याचे चांगले कार्य जेव्हा त्याने राजाचा प्राण वाचविला यासाठी पुरस्कार देण्यात लोक विसरले त्याप्रमाणे लोक कदाचित विसरू शकतात. कोणीही त्याचा उल्लेख केला नाही. ते झाकून टाकण्यात आले, किंवा कदाचित सुरक्षा अधिकाऱ्याने त्याचे श्रेय घेतले असेन आणि निरीक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली असेन. परंतु योग्यवेळी, देवाने कार्य केले. त्याने राजाची झोप उडविली कारण ती वेळ होती की त्याच्या विश्वासू पुत्राचे परिवर्तन करावे.
बायबल म्हणते, देव अनीतिमान नाही की विसरावे. म्हणून तुम्हाला लोकांबरोबर संघर्ष करण्याची गरज नाही. कधी कधी आपण आपली चांगली कृत्ये थांबवितो कारण आपल्याला पुरस्कार देण्यात आला नाही. आपण कटू होतो आणि बदलतो. काही लोक त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या समर्पणास कमी करतात कारण व्यक्ति जो कामावर उशिरा येतो आणि आळशी आहे त्याची पदोन्नती करण्यात आली आहे. इतर हे त्यांच्या दयाळूपणाचे मार्ग बदलतात कारण कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी सुवार्ता आहे; तुमचा पुरस्कार हा देवाकडून आहे. जेव्हा वेळ झाली आहे, तेव्हा त्यास ठाऊक आहे की तुमच्यावर कृपा करण्यासाठी लोकांना कसे चालना दयावे.
या प्रकरणात, देवाने राजाची झोप उडविली. तो अस्वस्थ होता, आणि एकच गोष्ट त्याच्यासाठी महत्वाची होती की ग्रंथामधून पाहावे. परमेश्वर सर्वसत्ताधारी आहे. तो पृथ्वीवर शासन करतो आणि राजांचे हृदय त्याच्या हाती आहे. म्हणून आरामात राहा आणि त्यावर लक्ष ठेवून राहा. तुमचे चांगले कृत्य करीत राहा आणि धैर्य सोडू नका. कामाच्या ठिकाणी परिश्रमी राहा, जरी इतर हे आळशी असतील. चांगले कृत्य करीत राहा जरी जेव्हा तुमच्याकडे लक्ष देण्यात येणार नाही. मनुष्यांकडून लाकडाच्या तात्पुरत्या पदकावरच स्थिर होण्यापेक्षा देवाची शाश्वत ओळख होण्याची वाट पाहणे उत्तम आहे.
तुमचा पुरस्कार देवाकडून येतो, आणि जेव्हा तुम्हांला देण्याची वेळ आहे तेव्हा तो ते तुम्हांला नाकारणार नाही. गलती. ६:९, "चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल." करीत राहा, थकू नका, तुम्ही विचार कराल त्यापेक्षा तुमचा पुरस्कार हा निकट आहे, पण जेव्हा तुम्ही थांबता, तुम्ही पुरस्कार गमाविता.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की तुझी सेवा करण्यामध्ये मला तू परिश्रमी राहण्यास साहाय्य कर. माझ्यावर सोपविलेल्या कार्यात स्थिर राहण्यास कृपेसाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येक थकवा व निराशेच्या विरुद्ध मी प्रार्थना करतो. मी विनंती करतो की कामावर कर्तव्यदक्ष राहण्यास तूं मला साहाय्य कर जेव्हा तू प्रगट होईल. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-1● २१ दिवस उपवासः दिवस १७
● एस्तेरचे रहस्य काय होते?
● कृतज्ञतेसाठी एक धडा
● मानवी हृदय
● दैवी भेट देण्याचा तुमचा क्षण ओळखा
● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #3
टिप्पण्या