english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. इतरांसाठी मार्ग प्रकाशित करणे
डेली मन्ना

इतरांसाठी मार्ग प्रकाशित करणे

Saturday, 14th of October 2023
20 12 1303
आपण राहतो त्या वेगवान जगात, मते उदारपणे सांगितली जातात. सामाजिक माध्यम व्यासपीठ उदयामुळे क्षुल्लक किंवा महत्वाच्या सर्व बाबींवर विचार, दृष्टीकोन आणि निर्णय सांगणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. तथापि, शब्द प्रभावी असू शकतात, परंतु, “शब्दांपेक्षा क्रिया अधिक बोलते” या म्हणीमध्ये गहन सत्य आहे.

प्रेषित पौलाने, तीताला त्याच्या पत्रात, या कल्पनेला विस्तृतपणे मांडले आहे. त्याने लिहिले, “सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे स्वतःला दाखव; शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण ह्यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे.” (तीताला पत्र २:७-८).

 येथे प्रेषित पौल विश्वासणाऱ्यांना केवळ प्रोत्साहन देत नाही की फक्त चांगले शब्द बोलावे, तर त्यानुसार जगण्याच्या महत्वावर तो जोर देत आहे.

त्याबद्दल विचार करा. कोणीतरी काही म्हटले किंवा काहीतरी केले त्याने तुम्ही किती वेळा प्रेरित झाला होता? शब्दांना विसरले जाऊ शकते परंतु कृतींना नाही? ते स्मरणात एक स्थान कोरून ठेवते.
 कधीकधी जीवनाचा मार्ग बदलून टाकते.

प्रभू येशूने स्वतः हे ओळखले होते. त्याचे सेवाकार्य हे केवळ प्रचार करण्याबद्दलच नव्हते; तर ते कार्याबद्दलही होते. त्याने बरे केले, त्याने सेवा केली आणि त्याने प्रेम केले. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये, प्रभू येशू त्याच्या शिष्यांचे पाय धुतो, अत्यंत नम्रतेचे कृत्य, सेवा नेतृत्वास दर्शवतो. मग तो म्हणतो, “कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे” (योहान १३:१५).

जेव्हा आपण बोलण्यानुसार चालतो, तेव्हा आपण इतरांनी अनुसरण करण्यासाठी मार्गावर प्रकाश उजळवतो. याचा अर्थ हा नाही की आपण अडखळणार नाही किंवा चुका करणार नाही. याचा अर्थ आपला संपूर्ण प्रवास, देवाच्या मार्गावर चालण्याचे आपले समर्पण, हे इतरांसाठी किरण म्हणून कार्य करते.

जुन्या करारात, आपल्याला दानीएलाची कथा आढळते, एका तरुण मुलाला बाबेलमध्ये बंदिवान म्हणून नेण्यात आले. परदेश आणि त्यातील अनोळखी संस्कृती असतानाही, दानीएल त्याच्या विश्वासात ठाम राहिला. राजकीय भोजन व द्राक्षारसाने स्वतःला दुषित न करण्याचे त्याने निवडले. विश्वासाचे कृत्य हे केवळ त्याच्या लाभासाठी नव्हते, तर ज्या देवाची तो सेवा करत होता त्याबद्दल ते बाबेल येथील लोकांसाठी साक्ष होते. हे त्याचे शांत, स्थिर समर्पण होते जे कोणत्याही संदेशापेक्षा मोठ्याने बोलले. त्याचे जीवन नीतिसुत्र, “चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे” याचे प्रतिक होते (नीतिसूत्रे २२:१).

मतांच्या जगामध्ये, आपल्या जीवनांनी बोलावे असे होऊ द्यावे. त्याने ख्रिस्ताचे प्रेम, कृपा आणि दया प्रतिध्वनी करू द्यावे. जेव्हा इतर आपल्या विश्वासाला आव्हान देतात किंवा आपल्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, तेव्हा त्यांना आपल्या चरित्रामध्ये चुका सापडू देऊ नका. आपली जीवने प्रेरणादायी असावीत की जरी ते जे आपल्याशी सहमत नाहीत ते काहीही करू शकणार नाही तर आपल्या एकनिष्ठतेचा आदर करतील.

शिवाय, विश्वासणारे म्हणून, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की जर आपण ख्रिस्ती जीवनाचे एक चांगले उदाहरण दाखवण्यात अपयशी ठरतो, तर आपण इतरांना त्यांच्या अविश्वासाबद्दल बहाणे करण्याची संधी देतो. जसे रोम. २:२४ मध्ये पौलाने लिहिले, “तुमच्यामध्ये परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे” असे शास्त्रात लिहिलेले आहे.” ही शक्तिशाली आठवण आहे की आपल्या कृती किंवा त्याची कमतरता हे एकतर लोकांना देवाकडे आकर्षित करू शकतात किंवा त्यांना दूर ढकलू शकतात.

म्हणून, मग, केवळ आपला विश्वास सांगू नका, तर त्यास प्रदर्शित करा. सर्व मनुष्यांद्वारे जाणणारे आणि वाचणारे जिवंत पत्र होऊ द्या (२ करिंथ. ३:२). आपल्या सभोवतालचे जग बदलू शकते, परंतु स्थिर असे राहा, उत्तम कार्याचा नमुना स्थित करू या आणि ते जे प्रकाशाचा शोध घेत आहेत त्यांच्यासाठी दिवा प्रकाशित करणारे व्हा.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आदर्शांनुसार जगण्यास आम्हांला समर्थ कर, जे सर्वकाही आम्ही करतो त्यामध्ये तुझी प्रीती आणि कृपा प्रतिबिंबित करू दे. असे होऊ दे की आमच्या जीवनांनी इतरांना तुझ्या जवळ आणणारे व्हावे, आमच्या कृतींनी तुझ्या नावाचे गौरव करू दे. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● दिवस ३२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● पहारेकरी
● तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते
● आत्म्याद्वारे मार्गदर्शित होणे याचा काय अर्थ आहे?
● दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● स्वर्गाचे द्वार उघडा व नरकाचे द्वार जोरानेबंद करा
● पृथ्वीचे मीठ
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन