"तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीति, शांति ह्यांच्या पाठीस लाग." (२ तीमथ्यी. २:२२)
पुरुष हे पाहण्याद्वारे लैंगिकदृष्टया उत्तेजित होतात. यामुळेच अधिकतर बीभत्सपणा हा स्त्रियांवर नाही तर पुरुषांवर अधिक कार्यशील होतो. दु:खदपणे, आज लाखो लोकांनी त्यांचे घर व जीवनाचे द्वार बीभत्सपणासाठी अनिच्छुकपणे उघडले आहेत आणि आता ते बीभत्सपणाच्या साईटसाठी व्यसनी झाले आहेत.
बीभत्सपणा हा व्यक्तीमध्ये "लुभावणारा आत्मा" निर्माण करतो. १ तीमथ्यी ४:१-२ मध्ये बायबल म्हणते, "आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील,......ते फुसलाविणाऱ्या आत्म्याच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील." या उताऱ्यापासून मोहित करण्यासाठी हेल्लेणी शब्द हा 'प्लानोस' आहे, ज्याचा अर्थ 'भटकणे आणि रस्त्यावरील फिरणाऱ्या भटकंतीसारखे."
लुभावणे हे व्यक्तीला सत्यापासून दूर करते आणि त्या व्यक्तीला तेथेच घुटमळत राहावे असे करते. हे शेवटच्या समयाचे चिन्ह आहे, आणि आपण फारच सावधानी बाळगली पाहिजे. पौल तीमथ्याला लिहित होता, त्यास चेतावणी देत होता की सैतान हा जे अगोदरच विश्वासात आहेत त्यांच्यावर देखील हल्ला करण्यास पाहत आहे. त्याची इच्छा आहे की त्यांना त्या विशावासातून बाहेर लुभावून काढावे आणि त्यांना लुभावणाऱ्या आत्म्याद्वारे गुलाम असे करावे. आणि बीभत्सता हे त्यापैकी एक पाप आहे जे फार सहजरित्या गुलाम बनविते. प्रभु येशूने म्हटले, "जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे." (योहान ८:३४)
ते दिवस आता राहिलेले नाहीत जेव्हा बीभत्स व्हिडीओ पाहणे हे कठीण असे होते, परंतु आता आपल्याकडे ती पीढी आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आणि उच्च-वेगाचे इंटरनेट आहे. मॅट फ्रॅड जो डिलिवर्डचा लेखक आहे त्याच्या मते: "पुरुष व स्त्रियांच्या खऱ्या कथा जे बीभत्सपणापासून शुद्धतेकडे वळले, "सध्याचा अभ्यास हे दाखवितो की ९५ टक्के तरुणांकडे कोठेही पाहू शकणारे एक्स-रेटेड सिनेमे उपलब्ध आहेत- म्हणजे स्मार्टफोन. स्मार्टफोनची अत्यंत वाढ ही तरुण वर्गाच्या पिढीमध्ये बीभत्सपणाची अधिक चित्रे पाहण्यात घनिष्ठ्पणे संबंधित आहे. हे आता अधिक विविधता आणि अधिक सामाजिक स्वीकृतीसह कधी नव्हते इतके सहज उपलब्ध झाले आहे." हे धोक्याचा इशारा देत आहे; हे दाखविते की सैतान हा आपल्या पिढीला आणि आपल्या तरुणांच्या भविष्याला गोंधळात टाकण्यासाठी किती अधिक प्रयत्नशील आहे. परंतु तो यशस्वी होणार नाही.
शास्ते १६:५ मध्ये बायबल म्हणते, "तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हांला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळविता येईल हे तूं त्याच्याकडून लाडीगोडीने काढून घे. म्हणजे आम्हांला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरीस आणता येईल. आम्ही प्रत्येक जण तुला चांदीची अकराशे नाणी देऊ."
राक्षस हे बीभत्सपणामागे आहेत ज्याप्रमाणे पलिष्टी लोक दलीलाच्या मागे होते की शमशोनाला आंधळे करणे व त्याच्या पाचारणास नष्ट करण्याद्वारे त्याची शक्ती निष्प्रभ करावी. त्यांना एका मार्गाची गरज होती की शमशोनाचा पराभव करावा आणि त्यास शक्तिहीन करावे, आणि केवळ एकच मार्ग जो घेतला पाहिजे होता तो दलीला द्वारे त्यास मोहित करणे हा होता.
शमशोनासारखे, तुम्ही देखील शक्तिशाली आहात. माझी इच्छा आहे की तुम्ही हे ओळखावे की तुम्हांला तुमच्यापुढे महान भविष्य आणि नशीब आहे. देवाने तुम्हांला महानतेसाठी चिन्हित केले आहे, आणि तुम्ही अनेक लोकांसाठी सोडविणारे असे आहात. त्यामुळेच सैतान हा तुम्हांला अशक्त करण्यात सर्व काही करीत आहे.
दलीलाचे काम हे केवळ शमशोनाची शक्ती जाणण्याचे नव्हते पण त्यास निष्प्रभ करण्याचे होते. हेच तर या शेवटच्या-समयाच्या लुभाविणाऱ्या आत्म्याचे सामर्थ्य आहे. सैतानाची इच्छा आहे की त्यास मोठे दाखविण्यासारखे वापरावे की तुमच्या अलौकिक शक्तीचे मर्म जाणावे आणि मग त्यास निष्प्रभ करावे. परंतु तो यशस्वी होणार नाही. त्यामुळेच तुम्हाला पळण्याची गरज आहे. पौलाने तीमथ्याला म्हटले, "अशा जीवनशैलीमधील कोणत्याही आमंत्रणाचा अस्वीकार कर."
चला मला तुमच्यापुढे स्पष्ट मांडू दया; बीभत्सपणा हा तुमच्या आत्म्यासाठी विष आहे. म्हणून पूर्णपणे त्याचा नकार करा. ते पाप आहे ज्याची इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या उद्देशापासून दूर करावे आणि तुम्हांला अशक्त असे करावे. त्यापासून दूर पळा. बीभत्स चित्रे किती जण पाहत आहेत त्यासंबंधातील आकडेवारी करणाऱ्यांमध्ये सहभागी होऊ नका.
उत्तेजना देणारे मुद्दे काढून टाका. तुमचा फोन व कॉम्पुटर वरील सर्व बीभत्स माध्यमे काढून टाका, आणि बीभत्सपणा संबंधातील सर्व सामाजिक संबंध बंद करा. जर ती एक टीव्ही मालिका असेल, तर ती पूर्णपणे काढून टाका. बीभत्सपणाची सर्व मासिके कचऱ्यात टाकून द्या. जर उत्तेजना देणारा मुद्दा तुमच्यासाठी संध्याकाळच्या वेळेला तुमच्याकडे खूपच वेळ आहे, तेव्हा मग तुमच्या जीवनाच्या पुढील काळासाठी तुमचा वेळ धार्मिक कार्यांनी भरून टाका.
प्रतिदिवशी पवित्रशास्त्राच्या वचनावर मनन करा आणि धार्मिक मित्रांसोबत वेळ घालवा जे तुमच्या विचारांस बायबल अध्ययन सत्राशी व्यस्त ठेवतात. जर तुम्हांला त्याची सवय लागली असेल, तर प्रार्थना करा आणि येशूच्या रक्तास तुमच्या मनाला व विवेकास शुद्ध करण्यासाठी विनंती करा. येशूच्या नावाने तुम्ही स्वतंत्र आहात.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आज माझ्या जीवनात सैतानाच्या कार्यांना उघड करण्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की तूं आज तुझ्या रक्ताने माझ्या हृदयाला शुद्ध कर. बीभत्सपणाच्या प्रत्येक मृत कार्यांपासून मी माझ्या विवेकास शुद्ध करतो; मी आदेश देत आहे की येथूनपुढे मी याद्वारे कधीही बंधनात जाणार नाही. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-1● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
● देण्याने वाढ होते - 1
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● देवाचे प्रत्यक्ष गुणवैशिष्ट्ये
● उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा
टिप्पण्या