"कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत." (१ करिंथ १६:९)
द्वार हे खोलीमध्ये प्रवेश करण्यासाठी आहेत. आपण सर्व जण देवाकडे प्रार्थना करतो की आपल्यासाठी द्वार उघडावेत; कृपा, संधी, विवाह, आरोग्य, वित्त, प्रगती इत्यादींचे द्वार. देवाच्या लेकरांसाठी ही वास्तवात देवाची इच्छा आहे. प्रकटीकरण ३:८ मध्ये त्याने म्हटले, "तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही.... ." उघडलेले द्वार आशीर्वादाच्या मार्गाला सूचित करते जे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. देवाची ही इच्छा नाही की कामे करून घेण्यासाठी आपण संघर्ष करीत राहावे. म्हणून, येशू, जो त्याचा पुत्र याचे वधस्तंभावर बलिदान देण्याद्वारे, आपल्याला जीवनाच्या प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी मार्ग मोकळा आहे.
२ पेत्र १:३-४ मध्ये बायबल म्हणते, "ज्याने तुम्हांआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत; त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यांसाठी की, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे." एक चांगला पिता म्हणून, त्याच्याकडे त्याच्या लेकरांसाठी वारसा आहे; आणि ते आपल्याला देण्याची त्याची इच्छा आहे.
प्रेषित पौलाने त्याच्या तिसऱ्या मिशनरी प्रवासादरम्यान इफिस येथून करिंथ येथील मंडळीला लिहिले, जेथे त्याने करिंथ येथील विश्वासणाऱ्यांबरोबर असण्याची आणि त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालविण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु त्यांना याची माहिती देण्यासाठी तो उत्सुक होता की देवाने त्याच्यासाठी संधीचे मोठे द्वार उघडले आहे की तेथे सुवार्ता सांगावी. परिणामस्वरूप, कठीण हृदय कधी असणारे इफिस येथील लोकांनी हळूहळू पौलाद्वारे प्रचार केलेली सुवार्ता स्वीकारली आणि आत्मसात केली.
यहोशवाचे पुस्तक देखील इस्राएलींचे आश्वासित देशाचा ताबा मिळविण्याच्या कथेबद्दल सांगते. जेव्हा त्यांनी आश्वासित देशावर ताबा मिळविला, ते त्या देशाला पुन्हा एकदा घेत होते जे कधी त्यांचा पूर्वज अब्राहाम याचे होते. मिसर देशात चारशेपेक्षा अधिक वर्षे राहिल्यानंतर, इब्री लोक त्यांच्या घरी परतले जे पूर्वी मूर्तिपूजक लोकांद्वारे बांधलेले आणि त्यांच्या ताब्यात होते, ज्यांस कनानी लोक म्हणतात. (उत्पत्ति १५:२१)
अनेक वेळेला, द्वार हे सहज उघडले जात नाहीत, कारण आपण त्यावर थाप मारली आहे. त्याऐवजी, काही हे आमच्या आशीर्वादांच्या मार्गाला तोंड देण्यासाठी तटबंदी असे आहेत जे देवाने आपल्यासाठी तयार केले आहे. उदाहरणार्थ, इस्राएली लोकांनी आश्वासित देशात पुन्हा प्रवेश केल्यानंतर, इब्री लोक तीन मुख्य अडथळ्यांना सामोरे गेले जे तीन युद्धाचे प्रतिबिंब असे होते ज्यांस ख्रिस्ती लोक सामोरे जातील जेव्हा ते त्यांच्या जीवनासाठी देवाच्या आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी करतील.
अ. नगराची तटबंदी (गणना १३:२८)
ब. महाकाय लोकांचा वंश (गणना १३:३३)
क. विरोध करणारी सात राष्ट्रे (अनुवाद ७:१)
हे प्रत्येक अडथळे आणि आव्हाहने जी इस्राएली लोकांच्या प्रगतीच्या मार्गात उभी होती त्याचे आज महत्त्व आहे आणि ते त्या अडथळ्यांना प्रतिनिधित करते जे ख्रिस्ती लोक अनुभवतील जेव्हा ते त्या मार्गावर प्रवास करतील की देवाच्या आश्वासनांच्या परिपूर्णतेचा अनुभव करावा. मी तुम्हांला भीति दाखवीत नाही, परंतु हे चांगले आहे की तुम्ही हे जाणता की हे अडथळे खरे आहेत, आणि ते सैतानाचे सरळपणे प्रगटीकरण आहेत.
देवाने त्यांना भूमी अगोदरच दिली होती, परंतु सैतान लोकांच्या मनाला भुरळ घालीत होता म्हणजे त्यांनी आश्वासित देशाचा आनंद घेऊ नये. परंतु तो अपयशी ठरला आहे. काही लोक सैतानाला दोष देण्याऐवजी देवाला देखील दोष देतात जेव्हा ते अशा अडथळ्यांना सामोरे जातात. माझी इच्छा आहे की तुम्ही हे ओळखावे की तुमच्या जीवनासाठी देवाची आश्वासने ही खोटी नाहीत परंतु वैध आहेत आणि ती अवश्य पूर्ण होतील.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आतापर्यंत माझ्यासाठी कृपेचे आणि उन्नतीचे द्वार तू माझ्यासाठी उघडले आहेत म्हणून मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की या उघडलेल्या द्वारांच्या सत्यतेमध्ये कायम राहण्यासाठी तू मला साहाय्य कर. माझ्यासाठी उघडलेल्या द्वारांविरोधातील प्रत्येक अडथळे येशूच्या नावाने मोडले जावोत म्हणून मी प्रार्थना करतो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याच्या प्रकाशात नातेसंबंधांचे संगोपन करणे● परमेश्वरा जवळ या
● विचलित होण्याच्या वाऱ्यामध्ये स्थिर
● शेवटच्या समयाच्या चिन्हांची पारख करावी?
● युद्धासाठी प्रशिक्षण
● छाटण्याचा समय-३
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
टिप्पण्या