डेली मन्ना
आध्यात्मिक अभिमानावर मात करण्याचे ४ मार्ग
Monday, 30th of October 2023
23
14
1396
Categories :
Spiritual Pride
“आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा: एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. परुश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केई, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.’ जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’ मी तुम्हांला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.” (लूक १८:९-१४)
आध्यात्मिक जीवन हा एक धोकादायक प्रवास आहे, केवळ बाह्य आव्हानांमुळेच नाही, परंतु अंतर्गत संघर्षामुळे देखील, ज्यामुळे आपल्या चरित्राची परीक्षा होते. यातील सर्वात कपटी म्हणजे आध्यात्मिक अभिमान. परुशी आणि जकातदाराच्या उदाहरणाने सज्ज, चला या आध्यात्मिक सापळ्याचा सामना करण्याचे मार्ग शोधू या.
१. तुमच्या स्वतःवर जे लक्ष तुम्ही केंद्रित करता त्यापेक्षा देवावर केंद्रित करा.
आपल्या स्वतःच्या नीतिमत्वामध्ये गुरफटून जाणे हे सोपे आहे. परंतु कलस्सै. ३:२-३ आपल्याला आठवण देते, “वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.” देवाचा महिमा आणि चांगुलपणावर लक्ष केंद्रित केल्याने आपले लक्ष स्वतःपासून आणि खरोखर पात्र असलेल्या व्यक्तीकडे वळते. लक्ष केंद्रित करण्यामधील हा बदल स्वतःमध्येच गुंग राहण्याला प्रतिबंधक लस बनते जे अभिमानाला उत्तेजन देत असते.
२. प्रार्थना करा
आध्यात्मिक अभिमानाच्या क्षेत्रामध्ये, प्रार्थना नम्रतेचा बालेकिल्ला बनते. प्रेषित याकोब आपल्याला आठवण देतो, “म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल” (याकोब ४:७). प्रार्थनेत आपण देवाला शरण जातो आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी मागणी करतो. हे तेथेच आपण आपल्या गर्वाला सोडून देतो आणि आपल्या अंत:करणाचा शोध घेण्यास देवाला आमंत्रित करतो, ज्याप्रमाणे दाविदाने स्तोत्र १३९:२३-२४ मध्ये प्रार्थना केली, “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव.”
३. शिकवण्यायोग्य व्हा
शिकण्याची आणि वाढण्याची इच्छा हे नम्रतेचे चिन्ह आहे. नीतिसूत्रे ९:९ शिकवण्यायोग्य आत्म्याची प्रशंसा करते, “ज्ञान्याला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल; नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल.” मोशे त्याचा सासरा इथ्रोकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी तयार होता (निर्गम १८:१३-२४). शिकवण्यायोग्य असण्याचा अर्थ मूर्ख असणे असा नाही. याचा अर्थ सल्ल्यास हुशारीने मानणे आणि बदलण्यास तयार असणे. जेव्हा आपण आपले हृदय उघडे ठेवतो, तेव्हा आपण आपल्या जीवनात पवित्र आत्म्याच्या कार्यासाठी अधिक तयार असतो, जे गर्वाला बाजूला ठेवते.
४. उपास करा
उपास ही एक शारीरिक क्रिया आहे ज्यामध्ये आध्यात्मिक परिणाम आहेत. हे आपल्या शारीरिक भुकेवर प्रभुत्व मिळवण्यास आणि आपली आध्यात्मिक दृष्टी पुन्हा केंद्रित करण्यास आपल्याला मदत करते. यशया ५८:६-७ उपासाच्या खऱ्या उद्देशाबद्दल बोलते, “दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, ........” जेव्हा तुम्ही उपास करता, तेव्हा तुम्हांला तुमच्या असुरक्षा आणि मर्यादांची आठवण करून दिली जाते, त्याद्वारे देवाची कृपा तुमच्यातून प्रवाहित होऊ शकेल.
मला तुम्हांला इशारा देऊ द्या. या तत्वांकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. आपल्याला कदाचित वाटेल की आपण स्थिर असे उभे आहोत, पण आपण पतनाच्या अगदी जवळ असू शकतो (१ करिंथ. १०:१२). आणि चला हे विसरू नका, दाखल्यामधील परुश्याने विचार केला की तो न्याय्य आहे, केवळ ख्रिस्ताने सांगितले की तो तसा नाही.

प्रार्थना
पित्या, तुझी कृपा आणि ज्ञानाची मला दररोज गरज आहे हे मी मानतो. तुझ्यावर अधिक केंद्रित राहण्यास मला मदत कर, प्रार्थनामय आणि शिकवण्यायोग्य असावे आणि उपासाद्वारे माझ्या स्वतःला नम्र करणारे असावे. मला आध्यात्मिक अभिमानापासून सांभाळ जेणेकरून मी जे सर्वकाही करतो त्यामध्ये तुझे गौरव करावे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या मनाची वृत्ती चांगली करणे● कोणीही सुरक्षित नाही
● येशूने गाढवावर स्वारी का केली?
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-२
● तुमची कल्पना वापरा की तुमच्या वचनाला योग्य स्वरूप दयावे
● तुमचे मार्गदर्शन कोण करीत आहे?
● पापी रागाचे स्तर उघडणे
टिप्पण्या