चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. (गलती ६:९)
मला अनेक लोक माहीत आहेत ज्यांना इतरांना साहाय्य करताना फार भयानक अनुभव आले आहेत. त्यांनी त्यांच्या लेकरांसोबत त्यांना साहाय्य केले, त्यांच्यासाठी भोजन केले, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, नोकरी शोधण्यात त्यांच्यासाठी साहाय्य केले, हे केवळ यासाठीच की ज्यांना साहाय्य केले ते शेवटी त्यांच्याविरोधात झाले.
फारच उघड आहे, यामुळे फारच दु:ख व कटुत्व निर्माण केले आणि काहींनी ही शपथ घेतली की येथून पुढे कधीही कोणालाही साहाय्य करावयाचे नाही. जरीहाएक रस्त्यावरील चांगला मार्ग असे दिसत असेन, तो ख्रिस्ताचा मार्ग नाही. हेच प्रत्यक्षात शत्रूला (सैतानाला)पाहिजे.
दयाळू व्हा आणि चांगले करा [कृपा करा म्हणजे कोणीतरी त्याकडून लाभ प्राप्त करतो] आणि उधार दया, त्याकडूनपरत फेड म्हणून कोणतीही अपेक्षा व आशा ठेवू नका; आणि मग तुमचे उदार होणे [पुरस्कार] हे महान [श्रीमंत, प्रबळ, तीव्र, व विपुल]असेल. (लूक ६:३५ ऐम्पलीफाईड)
आपल्यापैकी अनेक जण ह्या दृष्टीकोनाने साहाय्य करतात की त्यांच्याकडून परतफेड होईल जेव्हा गरज असेन. आणि जेव्हा ते प्राप्त करीत नाही, ते मग त्यांना वापरले व त्यांचा नकार केला आहे असे वाटते. बायबल आपल्याला हे सांगते की आपण परतफेडी ची काहीही अपेक्षा व आशा न ठेवता साहाय्य केले पाहिजे. पुढे, ते आपल्याला प्रोत्साहन देते की, जेव्हा केव्हा आपण इतरांना साहाय्य करतो, ते व्यर्थ नाही; आपण प्रभूकडून खात्रीने पुरस्कार प्राप्त करू आणि आपल्याला परमपवित्राचे पुत्र व कन्या म्हणतील.
बायबल म्हणते, जर तुमच्याकडे इतरांना साहाय्य करण्याचे दान आहे, तर ते त्या सामर्थ्याने करा जे परमेश्वर देतो......" (१ पेत्र ४:११).
इतरांना आशीर्वाद देणे सोडू नका. जसे हे तुम्ही करीत राहता, प्रभु सामर्थ्य, शक्ती पुरवेल, आणि हे सतत वाढत जाईल व तुमची योग्यता बहुगुणीत करेल की तुमच्या भोवतालच्या हजारो लोकांना आशीर्वाद असे व्हावे. आध्यात्मिक वाढीचे हे रहस्य आहे.
तर मग, भीति, शंका, अविश्वास, संताप, कटुत्व यांस तुम्हाला इतरांची उन्नति, त्यास आशीर्वाद, पुरवठा करणारे, असे होण्यापासून अडथळा करू देऊ नका.
इब्री ६:१० मध्ये वचन हे म्हणते, "कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही."
नेहमी उत्साहित राहा, हे जाणून कीपरमेश्वर हाच एक आहे जो तुम्हाला इतरांप्रती केलेली दयेची कृत्ये व परिश्रमपूर्वक प्रीति साठी पुरस्कार देणारा आहे.
"सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांस म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून दया; त्यांनी म्हटले आता 'एकही भांडे उरले नाही'; तेव्हा तेल वाढावयाचे राहिले." (२ राजे ४:६)
तेल हे वाढण्याचे थांबले जेव्हा विधवा ते ओतण्याची थांबली.
मला तुम्हाला भविष्यात्मक हे सांगू दया...
ओतत राहा जरी जे तुमची प्रशंसा करीत नाहीत, तुम्ही जे सर्व काही करता त्यासाठी ते तुमचा आदर करीत नाही.
जरी ते तुमचा अस्वीकार करतात, दु:ख देतात व तुम्हाला समजत नाहीत तरी ओतत राहा.
- सेवाकरणेसोडू नका
- दानदेणेसोडू नका
- उपासनेला येणेसोडू नका
- इतरांसाठी प्रार्थना करणेसोडू नका
- क्षमा करणे व काळजी करणेसोडू नका
सतत ओतत राहा म्हणजे तेल हे वाढत राहील.
प्रार्थना
पित्या, मला कृपा पुरीव की माझ्या भोवतालच्या लोकांसाठी सतत आशीर्वाद होत राहू. तूं न्यायी व विश्वसनीय आहे. तुझ्या नेत्राकडून काहीही लपलेले नाही. मला अधिक दे म्हणजे मी अधिक करू शकेन. सर्व गौरव हे तुझेच आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तो शब्द पाळ● त्याचे दैवी दुरुस्तीचे दुकान
● यासाठी तयार राहा!
● वासनेवर विजय मिळवावा
● तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
● जगण्याचे चिन्ह (पद्धत)
टिप्पण्या