"कारण आमच्या युद्धाची शस्त्रें दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो; आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध आहो." (२ करिंथ १०:४-६)
यहोशवाने काही पुढाऱ्यांना पाठविले की जावे आणि देवाने त्यांना दिलेल्या आश्वासित देशाची माहिती आणावी. त्यांना वाटले की त्या देशाचा पूर्णपणे ताबा घेण्याअगोदर तो देश कसा असेल याची त्यांना कल्पना असावी. आणि म्हणून पुढारी हा वृत्तांत घेऊन आले, हे म्हणत, "त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतांत अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशांत हित्ती; यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनाऱ्यावर व यार्देनतीरी कनानी लोकांची वस्ती आहे." (गणना १३:२८-२९)
आश्वासित देशाचा ताबा घेण्यात इस्राएली लोक तटबंदीच्या नगरांना सामोरे गेले हे बालेकिल्ल्यांना प्रतिनिधित करते ज्याने महत्वपूर्ण आव्हाहन ठेवले होते. इस्राएली लोक विचार करीत होते की ते या नगरांवर ताबा कसे मिळवितील, कारण भिंती व द्वार हे भेदण्यास अशक्य असे दिसत होते. त्यांना वाटले की आता सर्व काही संपले आहे. वास्तवात, काही लोक ज्यांनी तटबंदीच्या नगरांबद्दल ऐकले ते मिसर देशाला परत जाण्याचा विचार करू लागले होते. देवाने किती वेळा तुम्हाला दृष्टांत दिले आहे, परंतु अडथळ्यांमुळे तुम्ही परत माघारी जाण्याचा विचार केला? कधी कधी सैतान अडथळा तयार करतो जे भेदणे अशक्य असे दिसत असते; त्यादरम्यान, अनेक लोकांनी त्यातून प्रवेश केलेला होता. अनेक लोक त्यातून पार गेले होते आणि भूतकाळात तशाच अडथळ्यांवर देखील मात केली होती.
ही तटबंदीचे नगरे आध्यात्मिक अडथळ्यांची रूपकात्मक अशी आहेत, ज्यांस आपण ख्रिस्ती म्हणून, कदाचित आपल्या आध्यात्मिक प्रवासात सामोरे जाऊ. हे अडथळे किंवा भिंती दुर्गम असे वाटतात, आणि आपण कदाचित गोंधळून जातो की आपण त्यावर कशी मात करावी. तथापि, आपण जर पुढे वाचले, तर तुम्ही हे ओळखाल की देवाने त्या भिंतीला चमत्कारिकरित्या कसे पाडले जी दुर्गम अशी वाटत होती. त्याने त्या भिंतीला धसविले, आणि लोकांनी सहजपणे देशावर ताबा मिळविला. देवाने अडथळ्यांना समतल केले आणि ते त्यातून चालत गेले की आशीर्वादाचा आनंद घ्यावा.
ज्याप्रमाणे देवाने इस्राएली लोकांना तटबंदीच्या नगरावर विजय दिला, तो आपल्याला आध्यात्मिक बालेकील्ल्यांवर विजय मिळवून देण्यास साहाय्य करू शकतो जे आपल्या प्रगतीला अडथळा करतात. देवाच्या सामर्थ्यावर विश्वास व अवलंबून राहण्याने, आपण हे अडथळे आणि भिंतींना मोडू शकतो आणि देवाच्या आश्वासनांच्या पूर्णतेचा आनंद अनुभवू शकतो. हे कधीही विसरू नका की आपल्याकडे आध्यात्मिक शस्त्रें आहेत की ठेचावे आणि सैतानाचे प्रत्येक बालेकिल्ले मोडून टाकावे ज्यांना आपल्या विरुद्ध उभे राहावे आणि आपल्या प्रगतीला अडथळा करावे असे वाटते.
आपल्याला केवळ विश्वासाची आणि देवावर पूर्ण भरवसा ठेवण्याची गरज आहे. तो मनुष्य नाही जो आश्वासन देतो आणि ते पूर्ण करीत नाही. आपण आणखी काय जाणण्याची देखील गरज आहे की भिंतीबद्दल देव गाफील नाही. होय, आपण त्याजवळ जाण्याअगोदर तो त्याबद्दल जाणतो. जेव्हा तुम्ही भिंत पाहिली तसे तो तुमच्यासारखा गैरसावध नाही. हे पुरेसे कारण आहे की त्यावर भरवसा करावा. त्यास ठाऊक होते की तेथे अडथळा आहे, तरीही त्याने तुम्हांला त्या दिशेने नेले. त्यास शेवट सुरुवातीपासूनच ठाऊक आहे; म्हणजे, त्यास ठाऊक आहे की तुमच्या विरोधातील बालेकील्ल्याना कसे पाडून टाकावे. म्हणून त्यावर विसंबून राहा, त्याच्या मागे उभे राहा आणि त्यास तुमच्या वतीने प्रबळ असे दाखवू दया. २ इतिहास १६:९ म्हणते, "परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो."
तसेच, आपण जेव्हा आपल्या आधात्मिक आशीर्वादांच्या मार्गाच्या दिशेने प्रवास करतो, आपण तेव्हा चार आध्यात्मिक अडथळ्यांना किंवा भितींना सामोरे जाऊ जे आपल्या प्रगतीला अडथळा करण्यास पाहतात:
१. मनुष्यांची परंपरा
२. चुकीचे विचार
३. क्षमाहीनता
४. अविश्वास
सुवार्ता ही आहे की तुमच्या देवापलीकडे कोणतेही अडथळे नाही, म्हणून शांत राहा, आणि तुम्हाला त्यातून साहाय्य करण्यास त्यावर भरवसा करा.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, भूतकाळात माझ्यासाठी तू भिंती मोडल्या आहेत म्हणून मी तुझे आभार मानतो. या प्रवासात मी एकटा नाही हे मला दाखविले म्हणून मी तुझे आभार मानतो. मी जसे पुढे वाटचाल करीत राहतो त्यामध्ये तुझ्यावर भरवसा करीत राहावे म्हणून तू मला साहाय्य कर यासाठी मी प्रार्थना करतो. मी प्रार्थना करतो की येथून पुढे काहीही मला खालच्या पातळीवर धरून ठेवणार नाही. माझ्यापुढे असणारी भिंत मोडली आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● बदलण्यासाठी अडथळा● महान पुरुष आणि स्त्रिया का पतन पावतात - ६ (आपल्या विचारांना बंदी बनवने)
● स्वप्ना मध्ये देवदूताचे प्रगट होणे
● अडथळ्यांवरमात करण्याचे व्यवहारिक मार्ग
● चला यहूदा ला प्रथम जाऊ दया
● हे काही प्रासंगिक अभिवादन नाही
● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
टिप्पण्या