"त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये. अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे." (मत्तय १५:६)
आपल्या सर्वाना संस्कृती आणि परंपरा आहेत जे आपली कृत्ये व नातेसंबंधांना मार्गदर्शन करतात. यापैंकी काही परंपरा ह्या काही ठिकाणे व क्षेत्रांसाठी एकमेव अशी आहेत. काही निश्चित प्रसंगांसाठी काही लोक विशेष प्रकारे वेशभूषा करतात; काही परंपरा मागणी करतात की तुम्ही काही अन्नास तुमच्या हाताने खावे; त्याचवेळी काही लोक खाण्यासाठी लाकडी काठ्या वापरतात. काही परंपरा ह्या विवाहाच्या काही निश्चित विधींसाठी योग्य अशा आहेत; तर इतर ठिकाणी त्या निषिद्ध आहेत.
आपल्या दैनंदिन जीवनात जितक्या परंपरा विणल्या गेल्या आहेत, तितक्या त्या कधी कधी अडथळे म्हणून उभे राहतात आणि देवाच्या आशीर्वादाचा आनंद घेण्यापासून आपल्याला अडथळा करतात जेव्हा आपण त्यांना देवाच्या वचनापेक्षा अधिक महत्त्व देतो. मत्तय १५:३-६ मध्ये, देवाच्या आज्ञापेक्षा मनुष्यांच्या परंपरेला प्राथमिकता दिल्याबद्दल येशू परुशी लोकांना खडसावतो. हया परंपरा केवळ परंपरा अशाच राहण्याऐवजी नेहमी ह्या सत्य असे होतात आणि त्यांना देवाच्या वचनापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. देवाच्या सत्याबद्दल हे आपल्या समजेस अडथळा करते आणि त्याचा आशीर्वाद अनुभविण्यापासून आपल्याला रोखते. आपण हे विसरतो की पृथ्वी देखील देवाच्या वचनाद्वारे रचली गेली आहे, आणि म्हणून आपण त्याच्या अधीन होतो आणि देवाच्या वचनावर विसंबून राहण्याऐवजी आपण आपली जीवने ह्या परंपरेद्वारे चालवितो.
अनुवाद १२:२९-३२ मध्ये देवाने इस्राएली लोकांना चेतावणी दिली, "ज्या राष्ट्राचा ताबा घेण्यास तू जात आहेस त्यांचा पाडाव तुझा देव परमेश्वर तुझ्यासमोर करील व तू ती ताब्यात घेऊन तेथे वस्ती करशील. तेव्हा सांभाळ, नाहीतर तुझ्यासमोर त्यांचा पाडाव झाल्यावर तुलाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल आणि ही राष्ट्रे आपल्या देवाची ज्या प्रकारे सेवा करीत होती तशीच आपणही करावी असे मनात आणून त्या देवाच्या नादी तू लागशील. आपला देवा परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नको; कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवाच्या बाबतीत करीत आले आहेत; ते देवाप्रीत्यर्थ आपल्या मुलांमुलींचा देखील होम करीत असतात."
तो त्यांना सांगत होता की लोकांच्या जीवनपद्धती आणि परंपरेबद्दल एवढी उत्सुकता बाळगू नका ज्यांचा देश ताब्यात घेण्यास ते जात आहेत. देव म्हणत आहे, त्यांच्या परंपरेबद्दल चौकशी करू नका; त्याऐवजी, माझ्या आज्ञांनुसार चाला. असे होवो की तुमचे जीवन हे माझ्या वचनाद्वारे चालविले जावे व अधिकारात असावे. कलस्सै २:८ मध्ये प्रेषित पौलाने देखील चेतावणी दिली आहे, "ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष दया." म्हणून, कोणत्या परंपरेस तुम्ही बिलगून आहात जे तुम्हांला देवाच्या बहुगुणीत सामर्थ्यात प्रवेश करण्यापासून अडथळा करीत आहे.
जरी अनेक ख्रिस्ती लोक देवाला मनापासून प्रेम करतात, तरी काही हा विश्वास ठेवीत नाहीत की १ करिंथ १२:७-१० मधील यादीत दिलेली पवित्र आत्म्याची नऊ वरदाने आजही कार्यरत आहेत. त्यापैकी काही कदाचित हा विश्वास ठेवतील की चमत्कारिक बरे होणे हे शेवटचा प्रेषित, योहानाच्या मृत्युनंतर बंद झाले. ह्या विश्वासणाऱ्यांना कदाचित "विश्वास न ठेवणारे अविश्वासी" असे समजले जाऊ शकते, कारण ते म्हणतात की ते बायबलवर विश्वास ठेवतात, परंतु मनुष्य-रचित धर्मशास्त्रीय परंपरेशी त्यांची बांधिलकी आध्यात्मिक अडथळा निर्माण करते जे त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यास पूर्णपणे आत्मसात करण्यापासून रोखते.
हे अडथळे त्या तटबंदीच्या नगराप्रमाणे आहेत ज्याचा सामना इब्री लोकांनी केला होता, ज्याने त्यांना आश्वासन दिलेल्या देशावर ताबा घेण्यापासून त्यांना रोखले होते. अडथळ्यांवर मात करण्याऐवजी, निष्क्रिय व्हावे आणि आध्यात्मिक दानाच्या शक्यतेवर "त्यांचा हक्क" नाही म्हणून नाकारणे हे सोपे होऊ शकते. म्हणून, आतापासून, प्रत्येक संस्कृती आणि परंपरेचा देवाच्या वचनानुसार मूल्य ठरवा. असे होवो की तुमचे हृद्य देवाला प्रसन्न करणे आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्सुक असावे. असे जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुमचे जीवन अलौकिकतेच्या प्रकटीकरणासाठी व्यासपीठ असे होईल.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझ्या वचनाकडून जो प्रकाश मी प्राप्त केला आहे त्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की तुझ्या वचनामध्ये कायम राहण्यासाठी तू मला साहाय्य कर. असे होवो की तुझ्या वचनाच्या सत्याने माझ्या जीवनास मार्गदर्शन करावे. मी प्रार्थना करतो की तुझ्या कृपेचा वर्षाव मजवर केला जाईल. मनुष्यांच्या परंपरेच्या प्रत्येक मर्यादेपासून मी स्वतंत्र आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वेदीवर अग्नी कसा प्राप्त करावा● प्रार्थनाहीनता दुतांच्या कार्यास अडथळा आणते
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे
● आज पवित्र व्हा आणि अद्भुत कृत्येउद्या होतील
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
● दिवस ०४ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● सर्वसामान्य भीती
टिप्पण्या