"एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा." (कलस्सै. ३:१३)
कोणीतरी तुमचा अपमान करण्यासाठी तुम्हांला दीर्घकाळ जगण्याची गरज लागेल. होय. लोक हे नेहमीच तुमच्या भावनांवर घाला घालतील. तुम्ही देखील याशी सहमत व्हाल की तुम्ही त्या गोष्टी करता ज्या तुम्हाला अपमानित करतात, तरीही तुम्ही स्वतः यावर विचार करण्याचे आणि तुमच्या स्वतःवर प्रीति करण्याचे थांबविलेले नाही. क्षमेचा विषय हा ख्रिस्ती विश्वासामध्ये मुलभूत असा आहे. आपल्या उद्धाराचे मूळ म्हणजे देव आपल्याला क्षमा करीत आहे. होय, लोक त्रासदायक असू शकतात आणि अपमान गहन असू शकतो, परंतु बायबल म्हणते तरीही आपण क्षमा केली पाहिजे. हे इतके खरे आहे कारण तुमचा कितीही अपमान झालेला असेन, तरीही देवासमोर आपले अपराध मोठे आहेत, तरीही त्याने आपल्याला क्षमा केली आहे.
मत्तय ८:२१-३५ मध्ये, प्रभु येशूने क्षमा न करण्यास तुरुंगात अडकल्याप्रमाणे म्हटले आहे. क्षमाहीनता ही भिंती प्रमाणे आहे ज्यास आपण आपल्या मनात विटांवर विटा लावून बनविले आहे, जे आपल्या आत्म्यास व शरीरास स्वच्छ करण्यापासून पवित्र आत्म्यास प्रतिबंध करते. मत्तय ६:१४-१५ मध्ये येशूने म्हटले, "कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही." जेव्हा आपण क्षमाहिनतेमध्ये जगतो, तेव्हा आपण आपल्या जीवनातून देवाच्या क्षमेला टाळतो.
उपरोधिकपणे, व्यक्ति जो क्षमा करण्यास नकार देतो तो त्यांनी बांधलेल्या भिंतीमागे अडकला जातो. इफिस. ४:३२ मध्ये, प्रेषित पौलाने आपल्याला शिकविले आहे की आपण एकमेकांप्रती दयाळू आणि करुणामय असावे, एकमेकांना क्षमा करणारे व्हावे, जसे ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केली आहे. "तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा." (इफिस. ४:३२)
क्षमाहिनतेच्या तुरुंगात येथे चार भिंती आहेत.
१. बदला घेण्याची भिंत
यामध्ये आपण आपली इच्छा धरून ठेवतो की ज्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे त्यांच्याविरुद्ध बदला घ्यावा. हे तीन वेगवेगळ्या मार्गांनी प्रगट होऊ शकते. समान शक्ती, अधिक शक्ती किंवा कमी प्रमाणातील बदला घेण्यासह प्रत्युतर दयावे असे कदाचित आपल्याला वाटते. काहीही असो, हे तिन्हीही बदला घेण्याचे प्रकार आहेत. काही लोक वर्षानुवर्षे घालवितात की बदला घेण्याची योजना करावी, आणि त्यांना कशामध्येही पूर्णतः वाटत नाही जोपर्यंत ते सूड घेत नाहीत. बायबल, अबशालोम बद्दल बोलते, ज्याने अम्नोनास क्षमा केली नाही, ज्याने त्याच्या बहिणीची अब्रू लुटली होती. शेवटी दोन वर्षानंतर त्यास तशी संधी मिळाली. तुम्ही याची कल्पना करू शकता की मनुष्य किती एकाकी होऊन जातो जेव्हा तो बदला घेण्याची योजना करीत असतो.
२. संतापाची भिंत
हे येथेच आपण आपल्या हृदयात कटुत्व ठेवतो आणि पुन्हा पुन्हा आपल्या मनात त्या अपराधाच्या अपमानाचा अनुभव करीत राहतो. कोणीतरी ज्याने तुमचा अपमान केला आहे त्यास पाहिल्यावर तुम्हांला कसे वाटते? तुम्ही त्यांच्या कल्याणाची शुभेच्छा देता किंवा तुम्हांला राग येतो? तुम्हांला ठाऊक आहे की चिडचिड करण्याची स्पष्ट भावना आणि जखम पुन्हा उघडी होते. संताप आपल्या हृदयाला पूर्ण आनंद अनुभविण्यास अडथळा करतो.
३. खेदाची भिंत
हे येथेच आपण विश्वास ठेवतो की आपण भूतकाळास बदलू शकले असते आणि अपमान होण्यापासून रोखू शकलो असतो. मी असे करू शकलो असतो, "मी असे केले पाहिजे होते", "मी असे केले असते" असे काहीतरी वेगळ्याप्रकारे केले असते, असा आपण कदाचित विचार केला असता.
४. प्रतिकाराची भिंत
चवथी भिंत आशीर्वादास प्रतिकार करते. हे याच ठिकाणी आपण आपल्या विरुद्ध अपराध करणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर व इतरांसमोर शुभेच्छा देण्यास नकार देतो. क्षमाहिनतेच्या परिणामाचा हा शेवट आहे. तुम्ही याची कल्पना करू शकता की जेव्हा एक व्यक्ति स्वतःसाठी देवाजवळ आशीर्वादाची इच्छा करतो, परंतु त्याच्या शेजाऱ्यासाठी नाही.
तुम्ही तुमच्या जीवनात देवाच्या आशीर्वादाची इच्छा ठेवता काय? तेव्हा मग तुमच्या हृदयाला प्रत्येक क्षमाहिनतेपासून मुक्त करा म्हणजे देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सरळपणे प्रवाहित होऊ शकेल. त्या व्यक्तीजवळ जा आणि त्यास सांगा की तुम्ही त्यांना क्षमा केली आहे. ते ज्यांनी तुमचा अपमान केला आहे त्याच्याबरोबर समेट करा; तेव्हा मग तुमचे जीवन देवाच्या अलौकिक उत्साहाचा आनंद अनुभवील.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझ्या वचनाच्या सत्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की क्षमा करणारा व्हावे म्हणून तू मला साहाय्य कर. मी मांसमय हृदयासाठी प्रार्थना करतो जे लोकांचा आणि त्यांच्या दृष्टीकोनाचा स्वीकार करते. मी कृपेसाठी प्रार्थना करतो की प्रत्येक अपमान विसरून जावे म्हणजे मी तुझ्याकडून क्षमा प्राप्त करावी. मी आदेश देत आहे की आतापासून माझे जीवन आनंदाने भरलेले असेल. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आदर व ओळख प्राप्त करा● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-1
● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● वाट पाहण्यामुळे एका राष्ट्राचा उद्धार केला गेला
टिप्पण्या