"तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ति देतो; मी तुझे साहाय्यही करितो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो.' (यशया ४१:१०)
मानसिक प्रतिमा ह्या फारच मर्यादित करणाऱ्या शक्ति आहेत जे अधिक विश्वासणाऱ्यांना प्रगती करण्यापासून अडथळा करतात. जरी काही मानसिक चित्रे ही अचूक असू शकतील, तरी काही हे चुकीच्या माहितीवर आधारित असे आहेत. ह्या चुकीच्या कल्पना मग आपल्यात भय उत्पन्न करतात. अनेक जण आश्चर्य करतात की, "आपण या आजारामधून बरे होऊ काय?" चुकीची माहिती आपण आपल्या मनात येऊ दिली ती आपल्यात भीतीचा किल्ला बनविते, आणि आपण आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या परिस्थितीबद्दल वाईट असा विचार करू लागतो.
जरी जेव्हा कोणी आपल्याला सांगतो की येशू बरे करू शकतो, तरी चुकीची माहिती जी आपण आपल्या मनात येऊ दिली ती आपल्या आरोग्याच्या बाबतीत अशा सुवार्तेविषयी नकार करते. किंवा कदाचित आपण अनेक नोकऱ्या शोधल्या आहेत, आणि अचानकपणे आपण तशीच पात्रता असलेल्या लोकांना भेटतो ज्यांना कमी वेतनाची नोकरी मिळाली आहे. ही माहिती आपल्याला देवावरील आशा गमाविण्याकडे नेते, जो आपल्या पात्रतेच्या पलीकडे करण्यास सक्षम आहे. आपण एखादया बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये एखादया उच्च अधिकाराच्या पदावर आलो आहोत याची कल्पना करीत नाही. त्याऐवजी, आपण आपल्या स्वतःला रोजंदारीवर काम करणारे असे पाहतो.
आपण हे विसरतो की बायबल म्हणते की उन्नति व वाढ ही देवाकडून येते. तो कोणाला तुमच्यासाठी खाली आणू शकतो आणि तुम्हांला त्या पदावर आरूढ करू शकतो (स्तोत्र ७५:६-७). सैतान आपल्याला ते पाहण्यापासून प्रतिबंध करतो की देवाने योसेफास कसे सरळ तुरुंगातून राजवाडयात नेले, एक मनुष्य जो त्या पदासाठी शून्य पात्रता असलेला होता. जरी योसेफाकडे पात्रता असती, हे लक्षात ठेवा की तो त्याच्या पित्याच्या घरापासून त्याची कोणतीही ओळखपत्रे न घेता आलेला होता. तर मग, या नवीन भुमिकेसाठी प्रमाण म्हणून तो काय देणार होता? परंतु तो विषय नाही कारण देवाचा हात त्याजवर व त्याच्याबरोबर होता. म्हणून, राजवाड्याचे द्वार, उघडले गेले होते, आणि तो त्यात सरळपणे गेला.
दावीद बद्दल काय, राजा म्हणून अभिषेक करण्यास त्याच्याकडे अधिक पात्रता नव्हती. त्याच्या भावांच्या तुलनेत त्याजजवळ त्या क्षेत्रामध्ये काहीच अनुभव नव्हता, जे अगोदरच इस्राएली सेनेमध्ये भरती केलेले होते. रानात राहणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्यांना राजवाड्याचे नियम व शिष्टाचार ठाऊक होते, जो त्याचा अधिकतर वेळ मेंढरांसोबत घालवित असे. परंतु देवाने हस्तक्षेप केला होता आणि त्याच्या लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यास अभिषेक केला.
सामान्यपणे, भय हे शक्यता व अनुमानवर आधारित असते आणि प्रत्यक्षात काय घडते त्यावर आधारित नसते. तुमच्या प्रतिमा ह्या नेहमी तुमच्या मनाच्या मुख्य विचारसरणीस पाठविल्या जाणाऱ्या बरोबर किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असतात. ज्ञान व समज गोंधळात टाकणाऱ्या कल्पनेस तुमच्या मनावर नियंत्रण करणे आणि तुमच्या जीवनात मानसिक महाकाय प्रतिमा निर्माण करण्यापासून अडवू शकते. म्हणून, देव किती महान आहे यापेक्षा तुमचा डोंगर किती दुर्गम आहे हेच केवळ तुम्ही पाहता. तुमच्या विजयाच्या नृत्याचा सराव करण्याऐवजी तुम्ही पराजयाची कल्पना आणि तालीम करू लागता.
देव तुम्हाला बोलत आहे, भिऊ नका. दुसऱ्या शब्दात, चुकीची माहिती काढून टाका आणि पवित्र शास्त्रातील शक्यतेसह तुमचे मन भरून टाका. मार्क १३:३७ मध्ये येशूने म्हटले, "जे मी तुम्हांला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा." दुसऱ्या शब्दात, सैतानाला देवाच्या कार्यांस कमी लेखू देऊ नका जे तुमच्या डोळ्यासमोर पवित्र शास्त्रात नोंदलेले आहे. येशूने लोकांच्या जीवनात काय केले ते बायबलमध्ये नोंदलेले आहे. तुमच्या जीवनात देखील तो तसे करण्यास इच्छूक व समर्थ आहे. तो आज पेक्षा काल अधिक शक्तिशाली होता असे नाही. बायबल म्हणते तो काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. (इब्री. १३:८)
म्हणून भिऊ नका ! भिंतीप्रमाणे देव तुमच्यासोबत आहे. तो तुमच्यासोबत आहे की प्रत्येक द्वार उघडावे जे तुमच्या मार्गात उभे असू शकते. तो तुमच्यासोबत आहे की प्रत्येक अडथळ्यास समतल करावे. पवित्र शास्त्रातील खऱ्या माहितीसह केवळ तुमचे हृदय भरून टाका, आणि जेव्हा विश्वास तुमच्यात दृढ केला जातो, तेव्हा तुमचे जीवन पवित्र शास्त्राची सत्यता प्रदर्शित करू लागते.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझ्या वचनाद्वारे विश्वासाच्या इंजेक्शनसाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की मला नवीन मन असावे म्हणून मला साहाय्य कर. तुझ्या मार्गाचे अनुसरण करण्यास मला साहाय्य कर आणि माझ्या हृदयातील भयाच्या प्रत्येक बालेकिल्ल्यास मी काढून टाकीत आहे. आतापासून, मी केवळ शक्यता पाहतो. मी केवळ तुझाच विचार करतो. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वासनेवर विजय मिळवावा● युद्धासाठी प्रशिक्षण - २
● २१ दिवस उपवासः दिवस ०७
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
● राज्यात नम्रता आणि सन्मान
● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● प्रचलित अनैतिकतेमध्ये स्थिर राहणे
टिप्पण्या