"शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही; ह्यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे." (२ तीमथ्यी २:४)
गुंतण्याचा काय अर्थ आहे?
गुंतणे याचा अर्थ जटीलपणे विणलेले, गुंडाळलेले किंवा एकत्र लपेटलेले असे असावे जे वेगळे करण्यास किंवा सोडविण्यास कठीण असे होते.
ब्राझील येथील जंगलात एक धोकादायक रोपटे आहे ज्यास मैटाडोर किंवा "खुनी" असे म्हणतात. जे जमिनीवर एक लहान अंकुर असे सुरु होते आणि जेव्हा त्यास एखादे मजबूत झाड मिळते, तेव्हा ते त्यांचे लांबलचक तोंड त्या झाडाच्या खोडाभोवती गुंडाळतो. जसे ते रोपटे वाढू लागते, ते हातासारखे त्यांचा भाग त्या झाडाभोवती घट्ट आवळू लागते. ते रोपटे वरवर जात राहते जोपर्यंत ते झाडाच्या टोकापर्यंत जात नाही आणि मग त्यामध्ये फूल येते. हे मग झाडाला जगण्यास कठीण असे करते, आणि ते रोपटे इतर झाडांवर पसरू लागते.
मैटाडोरसारखे, दैनंदिन जीवन सूक्ष्मपणे आपल्याला गुंतवू शकते ज्यामुळे जग, देह आणि सैतान यांच्या विरोधातील आपल्या सततच्या आध्यात्मिक युद्धामध्ये ख्रिस्ताचे सैनिक म्हणून आपल्या प्रभावीपणाला तटस्थ करते. हे महत्वाचे आहे की आपण जागरूक असावे, आपले डोळे ख्रिस्तावर केंद्रित ठेवावे आणि जगात गुंतविणाऱ्या मोहाला प्रतिकार करावा. केवळ तेव्हाच आपण ख्रिस्ताकडील आपल्या अंतिम विजयाकडे सातत्याने वर जात राहू.
"गुंतणे" या शब्दाला त्या मेंढराचे वर्णन करण्यासाठी देखील वापरले आहे ज्याचे केस काट्यांमध्ये अडकले आहे. कशामध्ये तरी गुंतणे आणि गुंतले जाणे यामध्ये मुख्य फरक आहे.
जेव्हा या जीवनाच्या सामान्य घडामोडी आपल्याला इतक्या घट्ट बांधून ठेवतात की आपण आपल्या स्वतःला त्यातून मुक्त करून घेण्यास सक्षम होत नाही आणि आपला कप्तान ख्रिस्ताची आज्ञा पूर्ण करीत नाही, तेव्हा मग आपण गैर-शाश्वत गोष्टींच्या मागे लागणाऱ्या "काट्यांमध्ये" गुंतले जातो! आपले मुख्य ध्येय हे की आपल्या कप्तानास प्रसन्न करणे आहे.
एका रात्री, लष्करी मोहिमेदरम्यान, प्रसिद्ध महान अलेक्झांडरला झोप लागली नाही. जेव्हा तो छावणीच्या मैदानात चालत होता तेव्हा तो एका सैनिकावर आदळला गेला जो सेवेवर गाढ झोपेमध्ये होता, ज्यास फारच गंभीर अपराध समजत होते. काही प्रकरणात, गार्ड सेवेदरम्यान झोपण्याची शिक्षा तत्काळ मृत्यु होती. त्यावेळेस पर्यवेक्षक असणारा अधिकारी त्या झोपलेल्या सैनिकावर रॉकेल टाकत असे आणि त्यास पेटवून देत असे, आणि त्यास पाहण्याचे भयंकर नशीब असे करीत असे.
जेव्हा तरुण सैनिक झोपेतून उठू लागला तेव्हा तो भयंकर घाबरला की त्यास झोपेत असताना कोणी पाहिले आहे. "गार्ड सेवेदरम्यान झोपण्याची काय शिक्षा आहे हे तुला ठाऊक आहे काय? महान अलेक्झांडरने कठोर आवाजात विचारले, "होय, सर" सैनिकाने उत्तर दिले. भयाने त्याचा आवाज कापत होता.
जनरलने मग या सैनिकाचे नाव काय हे विचारले, तेव्हा त्याने उत्तर दिले अलेक्झांडर, सर." गोंधळून जाऊन, महान अलेक्झांडरने पुन्हा विचारले, "तुझे नाव काय आहे?" त्याने उत्तर दिले, माझे नाव अलेक्झांडर आहे, सर, सैनिकाने दुसऱ्या वेळेला उत्तर दिले.
मुद्दा निश्चित करण्यासाठी, महान अलेक्झांडरने मोठयाने म्हटले, आणि पुन्हा एकदा सैनिकाचे नाव विचारले. माझे नाव अलेक्झांडर आहे, सर, सैनिकाने शांतपणे उत्तर दिले.
त्याच्याकडे सरळपणे पाहत, महान अलेक्झांडरने अतुलनीय तीव्रतेसह म्हटले, सैनिक, एकतर तुझे नाव बदल किंवा तुझे आचरण बदल."
या भेटीने त्या तरुण सैनिकावर एक मोठा प्रभाव केला होता, जो ड्युटीवर मग कधीही झोपलेला असा आढळला नाही. एक सामर्थ्यशाली आठवण आहे की आपले नाव प्रतिनिधित करते की आपण कोण आहोत आणि आपले काय महत्त्व आहे आणि मग आपले आचरण हे नेहमी तसेच प्रदर्शित झाले पाहिजे.
तसेच, मत्तय ६:२४ मध्ये, येशू आपल्याला इशारा देत म्हणत आहे, "कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही." आपण देवाची सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची निवड केली पाहिजे आणि जगाच्या गोष्टींच्या मागे लागण्यात आपल्या स्वतःला गुंतवू देऊ नये.
प्रार्थना
पित्या, मला साहाय्य कर की या जीवनाच्या घडामोडींमध्ये गुंतून राहू नये परंतु त्याऐवजी तू जो माझा कप्तान म्हणून तुला प्रसन्न करण्यावर माझे लक्ष केंद्रित करावे. मला शक्ती व ज्ञान दे की अडथळे टाळावे जे माझ्या आध्यात्मिक वाढीला आणि देवाच्या राज्यामध्ये प्रभावीपणाला अडथळा करू शकते. येशूच्या नावाने, आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● दुसरे अहाब होऊ नका● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
● कोणीही आवडता नाही परंतु घनिष्ठ
● २१ दिवस उपवासः दिवस ०३
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● छाटण्याचा समय
● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा
टिप्पण्या