प्राचीन इब्री संस्कृतीमध्ये, घराच्या आतमधील भिंतीवरील हिरवे व पिवळे पट्टे हे गंभीर समस्येचे चिन्ह होते. ते याचे सूचक होते की घरामध्ये एका प्रकारचे कोड निर्माण होत आहे. जर ते तपासले नाही, तर तो कुष्ठरोग संपूर्ण घरात पसरू शकतो, ते मग भिंत, जमीन आणि छप्पराला देखील नुकसान करू शकते.
याशिवाय, ते जे घरात राहत आहेत त्यांचे आरोग्य देखील धोक्यात असते. भिंती व जमीन जे दूषित झाले आहेत याकडे ताबडतोब याजकाने लक्ष दिले पाहिजे, जो त्या घराची तपासणी करील आणि हे निश्चित करील की त्यास काही वेळेकरिता वेगळे ठेवावे किंवा शुद्ध केले पाहिजे. (लेवीय १४ वाचा). या प्रक्रियेने पापाच्या गंभीरतेबद्दल आठवण देण्याचे कार्य केले आणि त्वरित कार्य करण्याची गरज की ते पसरण्यापासून त्याच्या हानिकारक परिणामास रोखावे.
जुन्या करारात, कुष्ठरोग हा मरणप्राय आजार होता ज्याने मोठी भीति व वेगळेपणा आणला होता. ते ज्यांना कुष्ठरोग झाल्याचे निदान झाले आहे त्यांना अशुद्ध मानले जात होते आणि त्यांना नगराच्या वेशीबाहेर राहण्याची गरज होती, त्यांचे परिवार व समाजापासून दूर. (लेवीय १३:४६). कुष्ठरोग हे पापाचे प्रतीक होते, जे आपल्याला देव व इतरांपासून देखील वेगळे करते.
जसे कुष्ठरोग एका लहान लक्षणाने सुरु होतो आणि जलदपणे वाढतो, तसेच पाप देखील वाढते. हे आपण राजा दाविदाच्या कथेमध्ये पाहतो, ज्याने पापाच्या वासनेने सुरुवात केली आणि शेवटी व्यभिचार आणि खून केला (२ शमुवेल ११). पाप हे त्वरित आपल्या नियंत्रणातून निघून जाऊ शकते, जर आपण त्यास थांबविण्यासाठी पाऊले उचलली नाहीत.
पापाचे परिणाम हे गंभीर होते, जसे कुष्ठरोगाचे परिणाम. कुष्ठरोग शरीराला नष्ट करतो, नसांना नुकसान करतो आणि शरीर विद्रूप करतो. पाप जिवाला नष्ट करते, आपल्याला देवापासून विभक्त करते, आणि आपल्याला नाशाच्या मार्गावर नेते.
लेवीय अध्याय १३-१४ मध्ये, आपण त्या प्रक्रियेला पाहतो ज्यातून एका कुष्ठरोग्याला जावयाचे असते जेणेकरून त्यास शुद्ध असे घोषित करावे. याजक व्यक्तीची तपासणी करीत असे आणि याची पुष्टी करीत की ते अजून शुद्ध झाले आहेत किंवा नाही. जर ते शुद्ध झाले असतील, तरी त्यांना बरे होण्यापर्यंत छावणीच्या बाहेर राहावे लागत असे. एकदा की त्यांना शुद्ध असे घोषित केले, तेव्हा मग त्यांना समाजामध्ये परत राहण्यास परवानगी देण्यात असे.
त्याचप्रमाणे, पापापासून शुद्ध ठरविले जाण्यासाठी, आपण आपली पापे कबूल केली पाहिजेत आणि क्षमेसाठी विनंती करावी. १ योहान १:९ म्हणते, "जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील." आपण आपली पापे स्वीकारली पाहिजेत आणि त्यापासून मागे वळले पाहिजे.
मार्क १:४०-४५ मधील येशू एका कुष्ठरोग्यास बरे करण्याची कथा हे एक शक्तिशाली उदाहरण आहे की येशू शारीरिक व आध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टीने कसे बरे करू शकतो. एक कुष्ठरोगी येशूकडे आला, बरे करण्यासाठी विनंती करू लागला, आणि येशूने त्यास स्पर्श केला हे म्हणत, "माझी इच्छा आहे, शुद्ध हो!" ताबडतोब, मनुष्य बरा झाला.
जसे लेवीय मध्ये आहे, त्या कुष्ठारोग्यास एका याजकाला दाखविण्याची गरज होती की शुद्ध असे घोषित करावे आणि बलिदान अर्पण करावे. मार्क १ मध्ये, प्रभु येशू कुष्ठरोग्याला सांगतो की त्याने जावे आणि त्याचे बरे होण्याची साक्ष म्हणून याजकास दाखवावे.
तसेच लेवीय मध्ये, तो कुष्ठरोगी पुन्हा एकदा समाजात जाऊन राहू शकत असे एकदा की त्यांना शुद्ध असे घोषित केले गेले. मार्क १ मध्ये, प्रभु येशू बरे झालेल्या कुष्ठरोग्याला सांगतो की त्याने स्वतःला याजकास दाखवावे आणि विहित अर्पण करावे, जे मग त्यास समाजामध्ये परत राहण्यास परवानगी देईल.
तर तुम्ही पाहता, प्रभु येशू हा आपला अंतिम बरे करणारा आहे, जो आपले शारीरिक व आध्यात्मिक आजार बरे करू शकतो. तो मग पापाची लज्जा व विभक्तीकरण काढून टाकू शकतो आणि मग आपल्याला पिता व इतरांबरोबर संबंधात पुन्हा आणू शकतो. म्हणून, आज व नेहमीच येशू जो आपला अंतिम बरे करणारा आहे त्याकडे क्षमा आणि पुनर्स्थापनेसाठी वळा.
प्रार्थना
प्रेमळ पित्या, ज्याप्रमाणे एक कुष्ठरोगी केवळ तुझ्या स्पर्शाने बरा झाला, मला स्पर्श कर, आणि मला बरे कर आणि मला पूर्ण असे बनीव. मी अशी प्रार्थना देखील करतो की, मी तुझ्या समाजात योग्य जागा प्राप्त करीन आणि तुझे सामर्थ्य व गौरवाची साक्ष देईन. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
● युद्धासाठी प्रशिक्षण-१
● द्वारपाळ
● दिवस ११ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या