डेली मन्ना
दिवस ०७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Sunday, 17th of December 2023
33
23
934
Categories :
उपास व प्रार्थना
नवीन मुलुख हस्तगत करणे
मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हांला दिले आहे.” (यहोशवा १:३)
विश्वासणारे हे विविध क्षेत्रात नेते असू शकतात, जसे क्रीडा, राजकारण, तंत्रज्ञान, ऋषी, शिक्षण, सैन्य, आरोग्यसेवा आणि प्रसारमाध्यमे. त्या पदांवर आपल्या नेत्यांद्वारे देवाचे राज्य वाढेल आणि विविध संस्था आणि पद्धतींमध्ये धार्मिक मुल्यांचा शिरकाव होईल.
देवाने आदामाला आज्ञा दिली की फलदायक व्हा, बहुगुणीत व्हा आणि सत्तेखाली आणा (उत्पत्ती १:२८). देवाची मुले म्हणून, आपली रचना केली आहे की मुलुख हस्तगत करावी आणि त्यावर प्रभुत्व करावे. मुलुखे हस्तगत करण्यासाठी तलवार किंवा बंदुकीची आवश्यकता लागत नाही. हे लोकांबरोबर शारीरिकरित्या लढण्याबद्दल नाही. मुलुखे हस्तगत करणे हे “प्रभावा”बद्दल आहे.
व्यवसायाच्या कोणत्याही क्षेत्रात यश “प्रभावाकडे” नेईल. समाजात चांगली तत्वे आणि मुल्ये प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रभावाचा वापर करायचा आहे.
आपण पृथ्वीचे मीठ आणि प्रकाश असे आहोत; मुक्तीद्वारे आपली रचना केलेली आहे की देवासाठी पृथ्वीवर नियंत्रण करावे. प्रत्येक विभागावर प्रभाव करण्यासाठी आणि त्यास भ्रष्टाचार आणि नाशापासून राखण्यासाठी आपल्याला बोलावलेले आणि तारण केलेले आहे (मत्तय. ५:१६; १ पेत्र. २:९). इतरांनी अनुकरण करण्यासाठी ख्रिस्ती लोकांनी आदर्श उदाहरण मांडायचे आहे, नेतृत्व, नैतिकता आणि मानवतेसाठी एक रूपरेखा. आपण बदललेले एजंट आहोत ज्याकडे जगाने प्रेरणा आणि उपदेशासाठी पाहावे.
मुलुखे हस्तगत करण्याचा काय अर्थ आहे?
१. त्याचा अर्थ बदललेले एजंट होणे
२. याचा अर्थ नवीन सीमा मोडणे
३. याचा अर्थ माणसांच्या हृदयात देवाच्या राज्याला वाढवणे.
४. याचा अर्थ राज्याच्या तत्वांद्वारे तुमच्या वातावरणास प्रभावित करावे.
५. याचा अर्थ सकारात्मक संदर्भ मुद्दा होणे
आपल्याला मुलुखे हस्तगत करण्याची का आवश्यकता आहे?
१. अंधाराच्या शासकांना काढून टाकण्यासाठी
आपल्या समाजात हे सैतानी शासक हे आजार, रोग, दारिद्र्य, मृत्यू, वेदना आणि सर्व प्रकारच्या वाईटास कारणीभूत आहेत. जर आपण त्यांना काढून टाकले नाही, तर जो पर्यंत ते राहू शकतात तोपर्यंत ते तेथेच राहतील.
“कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिस. ६:१२)
२. तुमच्या सर्व श्रमात यशस्वी होण्यासाठी
प्रादेशिक आत्मे पुष्कळ ख्रिस्ती लोकांच्या प्रयत्नांना निराश करत आहेत; जर एखाद्या मुलुखावरील त्यांच्या मजबुतीला तुम्ही मोडत नाही, तर त्या मुलुखांमध्ये तुम्हांला यशस्वी होणे कठीण होऊन जाईल.
मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हांला दिले आहे.” (यहोशवा १:३)
अनेक सेवाकार्ये एका विशेष संख्येच्या पलीकडे वाढत नाहीत कारण तेथे प्रादेशिक आत्मे आहेत ज्यांनी पुष्कळांची मने बंदिवासात धरून ठेवलेली आहेत.
मुलुखे हस्तगत करण्यासाठी पाच गोष्टी
देवासाठी मुलखावर हक्क दाखवण्यापूर्वी तुम्ही या पाच आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत.
१. उद्देश
तुम्ही मुलुखे हस्तगत करण्याची इच्छा का करता, तुमच्या स्वतःसाठी की देवासाठी?
जर तुमचा उद्देश योग्य आहे, तर देव तुमचे साहाय्य करेल, परंतु जर ते तुम्ही स्वार्थी हेतूने करत असाल, तर तुम्ही स्वतःला सैतानी हल्ल्यासाठी उघडे करणारे व्हाल.
२. प्रार्थना
याबेसाने त्याच्या मुलखाच्या विस्तारासाठी देवाजवळ प्रार्थना केली आणि ते त्याला देण्यात आले. सैतानी प्रतिकार काढून टाकण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता लागते.
“९ याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की, ‘त्याला प्रसवताना मला फार क्लेश झाले.’ १० याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा: ‘तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवाशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दु:खी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!” (१ इतिहास ४:९-१०)
तुम्ही आध्यात्मिक लढ्यासाठी तयार असले पाहिजे. तुम्ही लढल्याशिवाय मुलुख घेऊ शकत नाही.
३. आवेश
दानीएल राजवाड्यात राजाच्या भोजनाने दुषित होणार नाही यासाठी दृढनिश्चयी होता (दानीएल १:८). उद्देशावाचून तुम्ही दृढनिश्चयी होऊ शकत नाही. जर दानीएल त्याच्या जीवनासाठी देवाचा उद्देश समजला नसता, तर तो बाबेलच्या पद्धतीपुढे झुकला असता. देवाचा माणूस, माईल्स मुन्रो, याने म्हटले होते, “जेव्हा उद्देश हा ठाऊक नसतो, तेव्हा गैरवर्तन अपरिहार्य असते.”
४. शुद्धता
“ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही” (योहान १४:३०). या जगाचा राजकुमार ख्रिस्ताच्या जीवनाचा शोध घेण्यासाठी आला परंतु त्याच्यामध्ये काहीही अशुद्ध असे शोधू शकला नाही. जर त्याने काहीही चूक शोधली असती, तर ख्रिस्त हा शत्रूचा कायदेशीर बंदिवान झाला असता.
तुम्ही लोकांना बाहेरून स्वच्छ दिसत असाल परंतु तुम्ही आतून शुद्ध आहात का किंवा तुम्ही केवळ ढोंग करत आहात? सैतानाला ठाऊक आहे की जर तुम्ही केवळ डोळ्याची सेवा करत असाल किंवा तुम्ही केवळ धर्माचा खेळ करत असाल. चर्चमध्ये आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही वेगळे व्यक्ती आहात का? सत्तेआधी शुद्धता येते. जर तुम्ही देवासोबत योग्य नाहीत, तर तुम्ही प्रदेश हस्तगत करू शकणार नाही.
५. सत्ता
“अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील.” (मत्तय. १२: २९)
सैतान हा बलवान माणूस आहे, आणि तुम्ही मुलुख हस्तगत करण्यापूर्वी, सैतानाला बांधले गेले पाहिजे. पृथ्वीवर काहीही बांधण्यासाठी आपल्याला अधिकार देण्यात आला आहे, म्हणून जर आपण बांधण्यास चुकलो, तर काहीही बांधले जाणार नाही. कोणत्याही मुलखातील बलवान माणूस ज्यावर तुम्ही प्रभाव करण्याचा प्रयत्न करत असाल त्याला बांधणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, व्यवसाय, अधिकृत प्रदेश, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा इत्यादी मधील बलवान माणसाला बांधले गेले पाहिजे. जीवनाच्या विविध भागांवर प्रभुत्व करणारी येथे विशेष तत्वे आहेत.
पुढील अभ्यासासाठी: उत्पत्ती १३:१५; स्तोत्र. २:८
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. पित्या, तत्वे, सत्ता, प्रभुत्व आणि सामर्थ्याच्यावर स्वर्गीय स्थानात ख्रिस्तासह बसवण्यासाठी तुझे आभार असो. येशूच्या नावाने. आमेन. (इफिस. २:६)
२. प्रत्येक मालमत्ता जी योग्यपणे माझी आहे त्याचा येशूच्या नावाने मी हक्क दाखवतो. (यहोशवा १:३)
३. माझ्या प्रगतीला अडथळा करणाऱ्या कोणत्याही प्रादेशिक आत्म्यांना मी येशूच्या नावाने पक्षघाती करत आहे. (लूक. १०:१९)
४. माझे यश आणि प्रगतीला अडथळा करणाऱ्या कोणत्याही बालेकिल्ल्यांना मी येशूच्या नावाने ओढून काढत आहे. (२ करिंथ. १०:४)
५. माझे अस्तित्व आणि दैवी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या कोणत्याही प्रादेशिक आत्म्यांच्या विरोधात माझ्यासाठी लढण्यासाठी मी येशूच्या नावाने देवदूतांच्या सैन्यांना आदेश देत आहे. (स्तोत्र. ९१:११)
६. हे परमेश्वरा, माझ्या मुलखाचा विस्तार कर आणि येशूच्या नावाने माझी प्रतिष्ठा वाढव. ते जे या उपासात सहभागी होत आहेत त्या सर्वांसाठी तसेच कर. (१ इतिहास ४:१०)
७. माझी वाढ आणि गौरवाच्या विरोधातील मर्यादित करणारी संस्कृती, परंपरा आणि प्रादेशिक आत्म्यांना येशूच्या नावाने मी मोडून काढत आहे. (गलती. ३:२८)
८. हे जमिनी, परमेश्वराचे वचन ऐक, येशूच्या नावाने माझ्या वतीने कार्य करू लाग. (यशया ५५:११)
९. माझ्या नशिबावर ठेवलेली प्रत्येक मर्यादा, येशूच्या नावाने काढून टाकली आणि नष्ट केली जावी. (यिर्मया २९:११)
१०. मी आता येशूच्या नावाने नवीन मुलुख हस्तगत करत आहे. (जेथे तुम्ही यशाची अपेक्षा करत आहात त्याच्या नावाचा उल्लेख करा) (अनुवाद ११:२४)
११. माझे हस्तगत केलेले आशीर्वाद, गौरव आणि सद्गुणांवर येशूच्या नावाने हक्क दाखवतो आणि त्यांना पुन्हा प्राप्त करतो. (योएल २:२५)
१२. करुणा सदन सेवाकार्य नवीन प्रदेशात वाढण्यासाठी कृपा करून प्रार्थना करा. (यशया ५४:२-३)
Join our WhatsApp Channel
Most Read
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
● हेतुपुरस्सर शोध
● अंतिम क्षण जवळ येण्यास सुरुवात होते
● विश्वासासह विरोधकांना सामोरे जाणे
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● तुमची नवीन वाटचाल थांबविली जाऊ शकत नाही
टिप्पण्या