डेली मन्ना
स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
Thursday, 7th of December 2023
17
12
995
Categories :
Deception
स्वतःची फसवणूक ही आहे जेव्हा कोणीतरी:
ब. जे त्यांच्याकडे वास्तवात आहे त्यापेक्षा अधिक आहे असा ते विचार करतात.
अशा प्रकारच्या स्वतःच्या फसवणुकीमध्ये एखाद्याच्या मालमत्तेचा, कर्तुत्वाचा किंवा स्थितीचा अवास्तव अंदाज लावणे समाविष्ट आहे. ती भौतिक संपत्ती, बौद्धिक पराक्रम किंवा आध्यात्मिक वाढ असू शकते.
"१६ त्याने त्यांना एक दाखला सांगितला, "कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. १७ तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, 'मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही.' १८ मग त्याने म्हटले, 'मी असे करेन; मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. १९ मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.' परंतु देवाने त्याला म्हटले, 'अरे मुर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?' जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे." (लूक १२:१६-२१).
दाखल्यामधील श्रीमंत मनुष्याने विश्वास ठेवला की त्याची संपत्ती व मालमत्ता त्याच्या भविष्यासाठी शास्वती देईल, परंतु खऱ्या आध्यात्मिक श्रीमंतीला व देवाबरोबरच्या त्याच्या संबंधाला ओळखण्यास तो चुकला. मनुष्याला देवा द्वारे मूर्ख म्हणण्यात आले कारण तो श्रीमंत होता म्हणून नाही परंतु तो अनंतकाळाची कोणतीही जाणीव आणि तयारी न करता जगला. त्याची या विचाराने फसवणूक झाली की त्याच्याकडे जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी पुष्कळ आहे.
पाळक म्हणून, मला एका मनुष्याच्या सुंदर, संपन्न घरात आमंत्रित केले होते जो नुकतेच परदेशात जहाजावर काम करून पुन्हा स्वदेशी आला होता. तो मनुष्य गर्व व उद्धटपणाने पूर्ण भरलेला होता, त्याने त्याच्या प्राप्ती विषयी गर्व करण्यास सुरुवात केली, त्याच्या यशाचे श्रेय केवळ त्याचे कठीण परिश्रम व दृढ निश्चयास देत होता. त्याने मला त्याच्या घराचे एक भव्य दर्शन करविले, त्यात अद्भुत सामान आणि महागड्या कलाकृतींनी भरलेल्या वस्तू होत्या.
आमच्या संभाषणादरम्यान, तो मनुष्य परमेश्वर व त्याच्या सेवकांना कमी लेखत होता, हा हक्क दाखवत होता की आठवड्यातून केवळ एक तास देवाला देणे हे पुष्कळ असे आहे. त्या मनुष्याच्या गैरसमजुतीच्या विश्वासाची जाणीव घेऊन, मी सौम्यपणे त्यास सुधारले आणि त्यास देवाविरुद्ध बोलण्यापासून सावध केले, कारण त्याचे गंभीर परिणाम होऊ शकले असते. मी त्यास याची आठवण देखील करून दिली की त्याची प्राप्ती आणि मालमत्ता ही खरोखर देवाकडून बक्षीस असे आहे.
मनुष्य मजवर हसला, त्याने यावर जोर दिला की सर्व काही त्याने स्वतः प्राप्त केले आहे आणि हे की त्याच्या यशामध्ये देवाचा काहीही भाग नाही. माझ्या सल्ल्यानुसार तो अविचल आणि बिनधास्त राहिला. काही महिन्यानंतर, मला बातमी मिळाली की हा मनुष्य अचानकपणे हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला आहे.
"मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे, व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही." (प्रकटीकरण ३:१७)
लावदिकीया येथील मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या गरीब होती, परंतु त्यांच्या आध्यात्मिक स्थितीच्या त्यांच्या स्वतःच्या दृष्टीकानाने ते फसविले गेले होते. त्यांनी स्वतःमध्येच पाहिले, आणि धन व श्रीमंती पाहिली आणि विश्वास ठेवला की त्यांना यापेक्षा अधिक कशाचीही गरज नाही. ते आध्यात्मिक नम्रतेपासून फार दूर होते ज्याबद्दल येशूने मत्तय ५:३ मध्ये प्रशंसा केली, हे म्हणत, "जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे."
तथापि, प्रभू येशूने, त्यांची खरी आध्यात्मिक स्थिती पाहिली, आणि त्यांना गरज आहे हे पाहिले. त्याने त्यांच्या आत्म्याकडे निरखून पाहिले आणि त्यांच्या दारिद्र्याकडे पाहिले. त्याने पुन्हा पाहिले आणि त्यांच्या दैन्यावस्थेकडे पाहिले. तिसऱ्या वेळेला, येशूने त्यांच्या हृदयात डोकावून पाहिले आणि त्यांना आत्म्याने गरीब असे पाहिले. जेव्हा तो त्यांची सतत तपासणी करीत होता, तेव्हा त्याने पाहिले की ते सत्याला आणि त्यांच्या आध्यात्मिक गरजेच्या गहनेतेसाठी देखील आंधळे होते. शेवटी, येशूने त्यांना प्रकट केले की ते आध्यात्मिकदृष्ट्या उघडेवाघडे, खरी श्रीमंती आणि धार्मिकता नसलेले, जे त्याच्याबरोबरच्या घनिष्ठ संबंधापासून येते.
यश आणि संपन्नतेचा त्यांचा बाह्य देखावा असताना देखील, लावदिकीया येथील लोक त्यांच्या आध्यात्मिक दारिद्रयाबद्दल ते गाफील होते. आपण स्वावलंबी आहोत या विचाराने त्यांची फसवणूक झाली होती, परंतु प्रत्यक्षात, त्यांच्याकडे एका गोष्टीची उणीव होती जी खरेच महत्वाची होती: परमेश्वराबरोबर नम्र व खरा संबंध. आपल्या स्वतःच्या हृदयाचे आणि मनाचे सतत परीक्षण करणे हे आपल्या सर्वांसाठी एक स्पष्ट स्मरणपत्र आहे, याची खात्री बाळगत की आपली स्वतः फसवणूक होणार नाही आणि त्याच भ्रमांना बळी पडणार नाही ज्यांनी लावादिकीया येथील मंडळीला त्रास दिला होता.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझ्या अमर्याद ज्ञानामध्ये, माझी स्वतःची फसवणूक होण्यापासून मुक्त कर. मला नम्रता दे की माझे आध्यात्मिक दारिद्र्य ओळखावे आणि तुझ्या सत्याचा धावा करावा. मी जो मुळात आहे त्या मला पाहण्यासाठी माझे डोळे उघड आणि मला तुझ्या धार्मिकतेच्या मार्गामध्ये मार्गदर्शन कर. असे होवो की मी तुझी कृपा व ज्ञानाला बिलगून राहावे, सत्यात आणि प्रीतीत चालावे. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● येशूचे रक्त लावणे● विचार करण्यास वेळ घ्या
● येशू एक बाळ म्हणून का आला
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- २
● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
टिप्पण्या