मागील दिवसात कोणी मला लिहिले आणि विचारले, "पास्टर मायकल कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक असू शकते काय?" जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रगत होत जाते आणि आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव करते, तेव्हा शेवटच्या काळात येथे त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल मुख्य विचार आहेत. काही प्रसिद्ध व्यक्तींनी, जसे दिग्गज भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स, आणि टेस्ला, आणि स्पेस एक्स लीडर, आणि नवीन उपक्रम प्रस्थापित करणारा एलोन मास्क, या सर्वांनी याबद्दल विचार व्यक्त केले आहेत.
यामुळेच मी या विषयाकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे आणि त्याचे पवित्र शास्त्राच्या दृष्टीकोनातून स्पष्टीकरण पाहू या, की खरेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही ख्रिस्तविरोधक आहे काय, जसे काही विचार करतात.
ख्रिस्तविरोधकास समजणे
"ख्रिस्तविरोधक" हा शब्द नवीन करारात उल्लेखला आहे, विशेषतः प्रेषित योहानाच्या पत्रांमध्ये.
"मुलांनो, ही शेवटली घटका आहे, आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे." (१ योहान २:१८)
"येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे." (१ योहान २:२२)
"कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे." (२ योहान ७)
हे त्या व्यक्तीला संबोधते जो ख्रिस्ताला विरोध करेल आणि शेवटच्या काळात अनेकांना फसवेल. प्रेषित पौल देखील समान व्यक्तीबद्दल २ थेस्सलनीका. २:३-४ मध्ये, "पापपुरुष" किंवा "नाशाचा पुत्र" म्हणून वर्णन करतो.
त्याचवेळेस बायबल कृत्रिम बुद्धिमत्ता व ख्रिस्तविरोधक यांच्यामधील स्पष्ट संबंध पुरवीत नाही, म्हणून पवित्र शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधकाची वैशिष्ट्ये व कृती समजून घेणे आवश्यक आहे.
एक मानवी पुढारी म्हणून ख्रिस्तविरोधक
पवित्र शास्त्रातील ख्रिस्तविरोधकाचे वर्णन सुचविते की तो एक मानवी पुढारी असेल जो सत्तेवर येईल, जो देव आहे असा दावा करील आणि अनेकांना बहकवून टाकील. २ थेस्सलनीका २:४ मध्ये पौल लिहितो की पापपुरुष, "तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे."
कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्या स्वभावानुसार, मानवाने तयार केलेले आणि विकसित केलेले तंत्रज्ञान आहे. त्यात चैतन्य किंवा आत्म-जागरुकता नसते, आणि त्यामुळे ते देव आहे किंवा कोणतेही आध्यात्मिक गुण आहेत असा दावा करू शकत नाही. जसे कृत्रिम बुद्धिमत्ता ही चांगल्या आणि वाईट दोन्हीही उद्देशासाठी वापरली जाते, तरी शेवटी ते मानवी नियंत्रणातील एक साधन आहे.
ख्रिस्तविरोधकाची फसवणुक करण्याची शक्ती
ख्रिस्तविरोधाकाकडे फसविण्याची मोठी शक्ती आहे असे वर्णन केले आहे, जो अनेक लोकांना सत्यापासून दूर करतो. १ योहान २:२२ मध्ये, प्रेषित योहान लिहितो, "येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे."
कृत्रिम बुद्धिमत्ता, एक तंत्रज्ञान म्हणून, त्याकडे स्वतःहून फसविण्याची किंवा ख्रिस्ताच्या सत्याचा नकार करण्याची क्षमता नाही. तथापि, हे महत्वाचे आहे हे ओळखणे की कृत्रिम बुद्धीमत्तेस हाताळता येऊ शकते आणि एखाद्या व्यक्तीद्वारे वाईट हेतूने वापरले जाऊ शकते की चुकीची माहिती पसरवावी आणि इतरांना फसवावे.
ख्रिस्ती म्हणून, आपण पारख करण्याचा वापर करावा आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहावे की सत्याला ओळखावे. (योहान १६:१३)
शेवटच्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेची भूमिका
जसे कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतःच ख्रिस्तविरोधी नाही, तसे हे शक्य आहे की प्रगत तंत्रज्ञान शेवटल्या काळात फसवणुकीचा प्रकार सक्षम करणे, आर्थिक प्रणाली नियंत्रित करणे, आणि पाळत ठेवणे सुलभ करण्याद्वारे भूमिका पार पाडू शकते. ख्रिस्तविरोधकाद्वारे जागतिक व्यवस्थेचे मार्गदर्शन करण्याबद्दल बायबल चेतावणी देते, जेथे चिन्ह प्राप्त केल्यावाचून कोणीही विकत घेणे किंवा विकणे करू शकत नाही.
"१६ लहानथोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी; आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे; त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करते." (प्रकटीकरण १३:१६-१७). हे शक्य आहे की भविष्यातील जागतिक पुढारी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो की अशा पद्धतीला लागू करावे.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आम्ही नम्रपणे तुझ्या कृपेचा धावा करतो की सतत शांत-चित्त आणि जागरूक असावे, आणि आमच्या विश्वासात स्थिर उभे असावे. हे परमेश्वरा, आम्हाला प्रबळ कर की, धन्यवाद व जागरूकतेसह प्रार्थनेमध्ये टिकून राहावे. असे होवो की तुझी प्रीती व मार्गदर्शनाने आम्हांला सक्षम करावे की तुझ्या इच्छेनुसार जगावे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● खोटे बोलणे सोडणे आणि सत्य स्वीकारणे● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे-२
● देव पुरस्कार देणारा आहे
● यशाची परीक्षा
● विश्वासाचे सामर्थ्य
● त्याच्याद्वारे काही मर्यादा नाही
● दिवस ३४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या