english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी
डेली मन्ना

सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी

Wednesday, 19th of April 2023
29 25 1249
Categories : उपास व प्रार्थना
तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही. (उपदेशक ४:१२). हे वचन विवाह समारंभावेळी सामान्यपणे संबोधले जाते, जे नवरी, नवरा आणि प्रभू मधील एकतेच्या शक्तीचे प्रतीक म्हणून दर्शविते. तथापि, या तीन पदरी दोरीचे महत्त्व वैवाहिक संबंधाच्याही पलीकडील आहे, ज्यामध्ये अधिक गहन अर्थ आहे जे संपूर्ण बायबलमध्ये पाहिले जाऊ शकते.

विश्वासणाऱ्याच्या जीवनात, तीन पदरी दोरी विश्वास, आशा आणि प्रीतीद्वारे अभिव्यक्त होते, जसे १ करिंथ १३:१३ मध्ये वर्णन केले आहे. हे गुण आध्यात्मिक वाढ आणि संयमसाठी महत्वाचे आहेत, आणि एकत्रितपणे ते देव व इतरांबरोबर ख्रिस्ती नातेसंबंधाचा गाभा बनविते. या तीन पदरी दोरीचा प्रत्येक पैलू हा एकमेकांशी जुळलेला आहे आणि दुसऱ्यांवर अवलंबून आहे, ज्यामुळे ते यास शक्तिशाली आणि टिकावू बनविते.

मत्तय ६ मध्ये, देवाचे लेकरू म्हणून जगण्याचे महत्वाचे घटक येशू त्याच्या अनुयायांना शिकवीत आहे, त्यामध्ये दानधर्म, प्रार्थना आणि उपासाच्या महत्वावर जोर देत आहे.

जेव्हा तुम्ही दानधर्म करता .... (मत्तय ६:२)
जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ..... (मत्तय ६:५)
जेव्हा तुम्ही उपास करता .... (मत्तय ६:१६)

लक्षात घ्या हे "जर" असे म्हणत नाही पण जेव्हा असे म्हणते. प्रभू येशू या आचरणास पर्यायी म्हणून सादर करीत नाही परंतु एका विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा आंतरिक पैलू म्हणून सादर करतो.

जेव्हा ख्रिस्ती व्यक्ति शुद्ध अंत:करणाने दानधर्म करतात, तेव्हा ते देवाची प्रीती व उदारतेस प्रतिबिंबित करतात, ज्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला दिले की मानवजातीचा उद्धार करावा (योहान ३:१६). प्रभू येशूने आपल्याला शिकविले आहे की प्रामाणिकपणे आणि नम्रतेने प्रार्थना करावी, इतरांना प्रभावित करण्यास किंवा केवळ पोकळ बडबड करण्यासाठी नाही. प्रार्थनेद्वारे, आपण देवाबरोबर घनिष्ठ संबंध विकसित करतो, आणि आपल्या सर्व गरजांसाठी त्याच्यावर अवलंबून राहण्यास शिकतो. उपास आपल्याला साहाय्य करते की आपल्या आध्यात्मिक वाढीवर लक्ष केंद्रित करावे, जगिक अडथळ्यांपासून मुक्त राहावे आणि त्याच्या इच्छेची गहन समज प्राप्त करावी.

जेव्हा एकत्र मिळून आचरणात आणले जाते, तेव्हा दानधर्म, प्रार्थना, व उपास हे एक शक्तिशाली तीन पदरी दोरी निर्माण करते जे देवाबरोबर ख्रिस्ती व्यक्तीचा विश्वास व संबंधाला मजबूत करते. (उपदेशक ४:१२)

मार्क ४:८, २० मध्ये, प्रभू येशू, तीस पट, साठ पट आणि शंभर पट प्राप्तीबद्दल चर्चा करतो, आध्यात्मिक आशीर्वादामध्ये विलक्षण वाढीचे उदाहरण देतो जेव्हा विश्वासणारा प्रार्थना, दानधर्म, आणि उपासामध्ये व्यस्त असतो.

मी विश्वास ठेवतो जेव्हा एखादा विश्वासू प्रार्थना करतो, तेव्हा ते त्यांची अंत:करणे देवाचे मार्गदर्शन आणि आशीर्वादासाठी उघडे करतात, संभाव्यतः तीसपट परत प्राप्ती मोकळे करतात. प्रार्थनेला दानधर्मासह जोडणे हे विश्वासणाऱ्याचे देवाच्या पुरवठ्यामध्ये विश्वासाला प्रदर्शित करते आणि त्याचा परिणाम साठ पट आशीर्वादामध्ये होऊ शकतो. तथापि, एखादा ख्रिस्ती व्यक्ति जेव्हा प्रार्थना आणि दानधर्माबरोबर उपासाला त्यात जोडतो, तेव्हा ते एक वातावरण निर्माण करते जे शंभर पट मिळकतीस आमंत्रित करते, जे अतुलनीय आध्यात्मिक विपुलता आणि वाढीस मोकळे करते. मी ऐकतो की आत्मा म्हणतो, "१०० पट मिळकतीसाठी तयार राहा.'

प्रेषित १०:३०-३१ मध्ये कर्नेल्याची कथा प्रार्थना, दानधर्म आणि उपास एकत्रित करण्याच्या सामर्थ्याचे उदाहरण देते. एक धर्मनिष्ठ माणूस म्हणून, कर्नेल्याने उपास व प्रार्थना केली आणि ते जे गरजवंत आहेत त्यांना उदारपणे दानधर्म केले. या आध्यात्मिक शिस्तीसाठी त्याच्या समर्पणाने देवाचे लक्ष वेधले, ज्यामुळे देवदूत त्यास भेटावयास आले आणि दैवी आज्ञा झाली की प्रेषित पेत्राचा शोध करावा.

कर्नेल्याच्या विश्वासूपणाच्या परिणामामुळे, पेत्राला कर्नेल्याच्या घराकडे मार्गदर्शन करण्यात आले, जेथे त्याने कर्नेल्य व त्याच्या घराण्याला सुवार्ता सांगितली. या भेटीमुळे कर्नेल्याच्या संपूर्ण घराण्यास तारण व बाप्तिस्मा घेण्याकडे नेले, अविश्वसनीय आशीर्वाद आणि आध्यात्मिक प्रभाव दर्शविले जे प्रार्थना, दानधर्म व उपास करण्याच्या जीवनशैलीचे जीवन आत्मसात करण्याकडून प्राप्त होऊ शकते. परमेश्वर पक्षपाती नाही. जर तुम्ही हा सिद्धांत आत्मसात करता, तेव्हा तुम्ही देखील तसेच अविश्वसनीय परिणाम पाहू शकाल.

करुणा सदन येथे, आम्ही उपास व प्रार्थनेमध्ये आहोत जे प्रत्येक आठवड्याच्या तीन दिवस (मंगळवार, गुरुवार आणि शनिवार) केले जातात.

या उपासाचा उद्देश:
१. करुणा सदनशी जुळलेले प्रत्येक व्यक्ति आणि त्यांच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीसाठी आहे. (मग ते नोहा ऐप वर लाइव्ह पाहत असतील, दररोजचा मान्ना वाचत असतील, इत्यादी)

२. तसेच, सर्व लोक जे करुणा सदनशी जुळलेले आहेत ते अलौकिकरित्या त्यांची आर्थिकता, नोकरी इत्यादी मध्ये आशीर्वादित व्हावेत हा आहे.

माझ्याबरोबर सामील व्हा, म्हणजे आपण  एकत्र मिळून आत्म्याच्या नवीन स्तरामध्ये प्रवेश करू या.

महत्वाचे मुद्दे:
१. दररोज उपासाची वेळ ही ००:०० तास (रात्री १२ वाजता) आणि दररोज दुपारी १४:०० (२ वाजता) तासाला संपते.

२. या कालावधी दरम्यान तुम्ही शक्य तितके पाणी प्या.

प्रार्थना
कृपा करून प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठीदोन मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ प्रार्थना करा ...

१. करुणा सदन सेवाकार्याशी जुडलेला प्रत्येक व्यक्ति, असे होवो की तुझे तारण त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, येशूच्या नांवात.

२. संपन्न होण्याचा अभिषेक मला व माझ्या कुटुंबीयांवर व प्रत्येक व्यक्ति जो करुणा सदन सेवाकार्याशी जुडलेला आहे त्यावर वर्षाव करो. येशूच्या नांवात.

३.पित्या, पास्टर मायकल त्याचे कुटुंब वसंघासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या विरुद्ध तयार केलेले कोणतेही शस्त्र संपन्न होणार नाही. त्यांना चांगल्या आरोग्या मध्ये ठेव. तुझ्या कृपेने त्यांस घेरून राहा. येशूच्या नांवात.

४. हे परमेश्वरा, येशूच्या नांवात, आध्यात्मिक दुर्लक्षतेमुळे जे सर्व काही मी गमाविले आहे ते सात-पदरी पुनर्स्थापित कर. (होशेय ४:६)

५. (हात तुमच्या शरीरावर ठेवा आणि हे बोलत राहा)देवाचे जीवन मी माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये बोलत आहे, येशूच्या नांवात. आजार व रोग हा माझा भाग नाही.

Join our WhatsApp Channel


Most Read
● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● एस्तेरचे रहस्य काय होते?
● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-२
● वातावरणावर महत्वाची समज- ४
● दिवस २१ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● तुमच्या नियतीचा विनाश करू नका!
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन