इस्राएली लोकांच्या संकटाच्या दिवसांत, एक दुष्ट स्त्री जिचे नाव ईजबेल हिने तिचा कमकुवत पती, अहाब राजाचा वापर केला की राज्यावर शासन करावे. भ्रष्ट जोडप्याने इस्राएली लोकांना बहकविले, मूर्तीपूजा आणि अन्यायास प्रोत्साहन दिले. या गोंधळात, देवाने संदेष्टा एलीयाला पाठविले की विश्वासाला पुनर्स्थापित करावे आणि लोकांना पुन्हा नीतिमत्व आणि त्याच्या भक्तीकडे मार्गदर्शित करावे.
एलीयाने बालाच्या खोट्या संदेष्ट्यांना आव्हान केले, हे म्हणत, "तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो; जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा." (१ राजे १८:२४)
संपूर्ण दिवसभर, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, खोट्या संदेष्ट्यांनी प्रतिसादाच्या आशेने, त्यांच्या दैवतांची आतुरतेने प्रार्थना केली. तथापि बालाच्या नपुंसकतेचे प्रदर्शन करून त्यांचे ओरडणे पूर्णपणे शांत झाले होते.
मग एलीया सर्व लोकांना म्हणाला, "माझ्याजवळ या"; तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली." (१ राजे १८:३०).
परमेश्वराचा शक्तिशाली संदेष्टा असून देखील, एलीयाला ठाऊक होते की जर देवाने अग्नीद्वारे उत्तर द्यावयाचे असेल तर त्यास वेदीला दुरुस्त करण्याची गरज लागेल, जी मोडलेली होती. हे लक्षात ठेवा: देवाचा अग्नी हा मोडलेल्या वेदीवर कधीही येणार नाही. अग्नीने त्यावर पडण्याअगोदर वेदीला दुरुस्त केले पाहिजे. स्वर्गातून त्यांच्यावर अग्नीचा वर्षाव होण्याअगोदर प्रेषित सुद्धा जवळपास दहा दिवस वाट पाहत होते.
असे अनेक जण आहेत जे मला हे म्हणत लिहितात, "मी प्रार्थना केली, आणि काहीही घडले नाही. देवाने उत्तर का दिले नाही? जरी मला त्यामागील सर्व कारणे ठाऊक नाहीत परंतु एक गोष्ट जी मला ठाऊक आहे ती ही की जर वेदी ही मोडलेली आहे तर अग्नी पडणार नाही –देवाकडून काहीही उत्तर मिळणार नाही.
येथे काही गोष्टी आहेत ज्या देवाच्या वेदीला दुरुस्त करण्यापासून अडथळा करतात. जोपर्यंत तुम्ही मत्सर, कटूपणा, गर्व बाळगून आहात, तोपर्यंत वेदी ही दुरुस्त केली जाणार नाही. हृदयाच्या ह्या गुप्त विषयांवर उपाय करण्यासाठी देवाकडे विनंती करा. उपास व प्रार्थना करा आणि देवाला विनंती करा की तुमच्यामधून या गोष्टी उपटून टाकाव्यात. मग देवाचा अग्नी उतरेल.
मी हे देखील पाहिले आहे की काहीही विचार न करता लोक देवाच्या पुरुष व स्त्रियांवर उघडपणे टीका करीत असतात, अनेक चर्चवर आणि सामाजिक माध्यमांवर इतर विश्वासू लोकांवर टीका करीत राहतात, आणि हे सर्व ते देवाच्या नावाने करीत असतात. जर तुम्ही आठवले की, अग्नीने पडण्याअगोदर, एलीयाने लोकांना त्याच्याजवळ बोलाविले. एक पुरुष किंवा स्त्री जे प्रीतीत चालत नाही ते देवासाठी कधीही एक योग्य वेदी बांधू शकणार नाहीत. देवाकडून काहीही उत्तर मिळणार नाही.
"तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू." (२ करिंथ. ७:१)
"नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलीया आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता....." (याकोब ५:१६-१७); काहीही शक्य आहे, जेव्हा आपण आपले जीवन प्रभूला पूर्णपणे पवित्र्याने समर्पित करण्याद्वारे प्रभूची वेदी दुरुस्त करतो. तुमचे जीवन, तुमचे कुटुंब, तुमची सेवा, तुमच्या जीवनाचे प्रत्येक क्षेत्र हे मग कधीही तसेच राहणार नाही. देव जो अग्नीद्वारे उत्तर देतो तो तुम्हांला खात्रीने उत्तर देईल.
अंगीकार
१. येशूच्या नावाने, ज्याने कालवरीच्या वधस्तंभावर त्याच्या मौल्यवान रक्ताने माझी किमत भरली आहे, सैतानी जगाबरोबर माझा कधीही कोणताही संपर्क किंवा संबंध झाला असेल त्यास मोठ्या धाडसाने मी मोडत आहे.
२. हे परमेश्वरा, मी माझे जीवन पूर्णपणे तुला समर्पित करीत आहे, आणि मी तुला माझा प्रभू, माझा तारणारा व परमेश्वर म्हणून कबूल करतो.
३. काही सौम्य संगीत वाजवा आणि प्रभूची उपासना करीत काही वेळ घालवा. (तुम्ही तुमची वेदी दुरुस्त करीत आहात.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● बीज चे सामर्थ्य - २● शर्यत जिंकण्यासाठी दोन पी
● २१ दिवस उपवासः दिवस ०६
● संयम आत्मसात करणे
● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
● शोधण्याची आणि सापडण्याची कथा
● तुम्ही कोणाबरोबर चालत आहात?
टिप्पण्या