पवित्रता ही ख्रिस्ती विश्वासामध्ये खोलवर रुजलेली संकल्पना आहे, अनेकदा एक उदात्त आदर्श मानले जाते जे अगम्य वाटू शकते. तथापि, पवित्रतेचे दोन पैलू आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे.
१. स्थिति आणि
२. वर्तणूक
चला या पैलूंमध्ये खोलवर जाऊ या आणि देवासोबत विश्वासणाऱ्यांचा चालण्याचा आज त्यांचा अर्थ काय आहे हे शोधू या.
स्थिति पवित्रता
जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करता, तेव्हा काहीतरी अविश्वसनीय घडते-तुमची आध्यात्मिक स्थिति बदलते. तुम्हांला आता देवाच्या दृष्टीसमोर पापी म्हणून पाहिले जात नाही; त्याऐवजी, तुम्हांला पवित्र आणि निर्दोष असे पाहिले जाते. जसे इफिस १:४ म्हणते, “त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले.”
तुम्ही कदाचित विचार कराल, मी? पवित्र? परंतु मी आज देखील दररोज पापाशी संघर्ष करत असतो!” आणि तुम्ही एकटे नाहीत; हा एक संघर्ष आहे ज्यास प्रत्येक विश्वासणारा तोंड देतो. तरीही, स्थिति पवित्रता हे एक दान आहे, हे असे काहीही नाही जे आपण स्वतःहून प्राप्त करतो. वधस्तंभावरील प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे, देव आपल्याला स्वच्छ, शुद्ध व पवित्र असे पाहतो. जसे २ करिंथ. ५:२१ आपल्याला आठवण देते, “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.”
वर्तणुकीची पवित्रता
जेव्हा स्थिति पवित्रता ही तात्काळ आणि कायम आहे त्याचवेळेस वर्तणुकीची पवित्रता हा प्रवास आहे. पवित्रतेचा हा पैलू आपली कृती, निवडी आणि जीवनशैलीशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, लग्नाचे साधर्म्य लक्षात घ्या. ज्या दिवशी तुमचा विवाह होतो, तुमची स्थिति ‘विवाहित’ म्हणून बदलते. तथापि, तुम्ही जसे काही एकटे आहात असेच जगत राहता, तेव्हा तुमच्या नवीन स्थितीशी तुमची वर्तणूक विरोधात जाते.
त्याचप्रमाणे, जसे विश्वासणारे हे ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पवित्र केलेले आहेत, तेव्हा आपल्या कृतींनी आपली नवीन ओळख प्रतिबिंबित केली पाहिजे. १ पेत्र. १:१६ म्हणते, “कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे,” ही देवाची आज्ञा आहे की पवित्र जीवन व्यतीत करावे जे ख्रिस्तामध्ये आधीच आपले आहे.
स्थिति आणि वर्तणूकीमधील ताटातूट ज्याप्रमाणे विवाहित व्यक्तीने “इतरत्र सहवास करणे” हे त्याच्या वैवाहिक स्थितीचा विरोधाभास करते. एक ख्रिस्ती व्यक्ती जो पाप करत राहतो तो त्याच्या स्थिति पवित्रतेशी विरोध करत राहतो. रोम. ६:१-२ मध्ये प्रेषित पौल या ताटातूटीवर विचार मांडत आहे, “तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार?”
दोघांना समरूप करणे
आपले ध्येय हे आपल्या स्थिति पवित्रतेबराबर आपली वर्तणूक पवित्रता समरूप करण्याची असली पाहिजे. हे परिपूर्णता प्राप्त करण्याबद्दल नाही, परंतु विश्वासाद्वारे आधीच आपल्यात असलेल्या ख्रिस्तासारख्या गुणधर्माना मूर्त रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याबद्दल आहे. गलती. ५:२२-२३, “आत्म्याच्या फळाबद्दल” वर्णन करते, “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे.” ही गुणधर्मे स्वाभाविकरित्या आपल्यात विकसित झाली पाहिजेत जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या अधीन होतो.
अखंड कृपा
सुदैवाने, जेव्हा आपण चूक करतो,- आणि आपण तसे नक्कीच करणार-तेव्हा देवाची कृपा ही पुरेशी आहे. १ योहान १:९ आपल्याला खात्री देते, “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील.” परंतु कृपा ही पाप करण्यासाठी परवानगी नसावी, त्याऐवजी त्याने आपल्याला दररोज अधिक पूर्णपणे देवाचा आदर करायला प्रेरित केले पाहिजे.
नेहमी, लक्षात ठेवा, पवित्रता ही निर्दोष परिपूर्णतेची स्थिति नाही तर दररोज ख्रिस्तासारखे बनण्याचा प्रवास आहे.
स्थिति पवित्रतेद्वारे, आपण आधीच वेगळे केलेले आहोत, वर्तणूक पवित्रतेद्वारे, आपण जगामध्ये या दैवी ओळखनुसार जगतो.
जेव्हा हे दोन पैलू एक होतात, तेव्हा आपण ख्रिस्तासाठी प्रभावी दूत होतो, आणि आपली जीवने ही त्याच्या कृपेच्या परिवर्तनशील शक्तीची साक्ष होतात.
प्रार्थना
आपल्या अंत:करणापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे मला स्थिति पवित्रता देण्यासाठी तुझे आभार. शत्रूच्या प्रत्येक कपटी योजनेच्या विरोधात मी या पवित्रतेला ढाल म्हणून दावा करतो (इफिस. ६:१६). तुझ्या दृष्टीसमोर पवित्र व निर्दोष असण्याच्या माझ्या स्थितीला मी ओळखतो. येशूच्या नावाने.
२. प्रभू परमेश्वरा, तुझे वचन मला आज्ञा देते की पवित्र असावे जसे तू पवित्र आहेस (१ पेत्र. १:१६). ख्रिस्तामधील माझ्या पवित्र स्थितिशी माझी वर्तणूक आणि कृती एक करण्यास मला मदत कर. माझ्या जीवनातील ते काहीही उपटून टाक जे शत्रूला स्थिरावण्यास जागा देते. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्र आत्म्या विरुद्ध निंदा म्हणजे काय आहे?● दिवस १६ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● स्वर्गाचे आश्वासन
● परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय
● शरण जाण्याचे ठिकाण
● पापी रागाचे स्तर उघडणे
● स्वप्ना मध्ये देवदूताचे प्रगट होणे
टिप्पण्या