मी तुम्हांस शांति देऊन ठेवितो; मी आपली शांति तुम्हांस देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. (योहान १४:२७)
प्रभु येशूने म्हटले, "मी तुम्हांस शांति देऊन ठेवितो......."
शांति ही स्वयं प्रभु येशू ख्रिस्ताकडून आपल्याला बक्षीस आहे.
"येशूला आपल्यामध्ये केवळ राहावयास नाही पाहिजे परंतु त्यास आपल्यामध्ये कार्यरत असावे असे पाहिजे." जेव्हा जग विविध कार्ये किंवा जीवनशैलीच्या प्रदर्शन द्वारे शांतीचा शोध घेतात, हे समजतात की शांति ही केवळ येशू मध्येच सापडते जो सर्व शांतीचा उगम आहे.
येशूने पुन्हा म्हटले, " मी आपली शांति तुम्हांस देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही."
शांति जे जग देते ती नेहमीच तडजोड व चालाकी वर आधारित असते. तथापि शांति जी प्रभु येशू ख्रिस्त देतो ती वधस्तंभावरील त्याच्या बलिदानपूर्वक मरणावर आधारित आहे.
"त्याच्या (येशूच्या) वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांति करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले." (कलस्सै १:२३)
शांति जी ख्रिस्त आपल्याला देतो ती बलिदानपूर्वक आहे त्यामध्ये त्यास सर्वस्वाची किंमत भरावी लागली-त्याचे प्रत्यक्ष जीवन.
प्रभु येशूने पुढे असे म्हटले, "तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये."
अनेक जण मला हे म्हणत लिहितात की ते भीति, निराशा, झोप न येणे, आणि इतर तणाव संबंधी विषयांनी त्रासात आहेत.
ह्यामुळे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्य वर सुद्धा नेहमी परिणाम झाला आहे. एका तरुणाने मला हे लिहिले की त्यास दररोज ५ औषधाच्या गोळ्या खाव्या लागतात की ह्या त्रासाला तोंड दयावे. माझे लक्ष देऊन ऐक, तुझ्या सर्व भीतीला शांती ही निश्चित उपाय आहे.
माझ्या जीवनात एक अशी वेळ होती जेव्हा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मी एका प्रार्थना सभेला गेला, आणि जेव्हा मी उपासना व प्रार्थना केली, "परमेश्वरा, मी आता शेवटाला पोहचलो आहे, मी तुला शरण येतो, कृपा करून मला साहाय्य कर", त्याक्षणी, मी कोणा देवदूताला किंवा दृष्टांत पाहिले नाही, परंतु माझ्याकडे ही शांति होती जिने माझ्या अंत:करणाला भरले होते. आत्महत्येचे सर्व विचार निघून गेले होते.
जर प्रभु हे माझ्यासाठी करू शकतो, तर तो निश्चितच हे तुमच्यासाठी सुद्धा करेल. परमेश्वर कोणाचा पक्षपात करीत नाही. (प्रेषित १०:३४)
अंगीकार
१. जसे आपल्यातील बहुतेकांना ठाऊक आहे की आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
शांतीच्या परमेश्वरा, मी माझे जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. कृपा करून माझ्याबरोबर राहा, येशूच्या नांवात.
कुटुंबाचे तारण
माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनात शांतीला अडथळा करणारी प्रत्येक शक्ती उपटून काढली जावो, येशूच्या नांवात. असे होवो की तुझी शांति माझ्या व माझ्या कुटुंबांच्या जीवनात राज्य करो.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मी आणि माझ्या कुटुंबाचे सदस्ये हे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असावे. जे सर्व काही आम्ही करू ते संपन्न होईल, देवाच्या गौरवाकरिता (स्तोत्र १:३). आम्ही खचणार नाही, कारण यथाकाळी आम्ही योग्य कापणी करू. (गलती ६:९)
केएसएम चर्च
पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, व संघ सदस्यांच्या जीवनात शांतीला अडथळा करणारी प्रत्येक शक्ती, येशूच्या नांवात उपटून काढली जावो. असे होवो की तुझी शांति त्यांच्या जीवनात राज्य करो.
देश
प्रभु येशू, तूं शांतीचा राजकुमार आहे. आमच्या देशाच्या सीमेवर शांति व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो की आमच्या देशाच्या प्रत्येक शहरात व राज्यात शांति राज्य करो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● महान पुरस्कार देणारा
● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● कलंकित करणाऱ्या पापासाठी अद्भुत कृपेची आवश्यकता आहे
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे
टिप्पण्या