आता तरी परमेश्वराचे वचन ऐका; मनपूर्वक मजकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. (योएल २:१२)
मनपूर्वक मजकडे वळा
परमेश्वराकडे कोणी कसे मनपूर्वक वळतो?
१. पश्चाताप- पश्चाताप हा जगाकडून वचनाकडे वळणे आहे.
२. उपास- हे रडणे व शोक करण्यासह आहे.
त्यामुळे आता सुद्धा, परमेश्वर म्हणतो, वळा व माझ्याकडे तुमच्या संपूर्ण अंत:करणासह, उपास सह, रडण्यासह व शोक सह सतत येत राहा [जोपर्यंत प्रत्येक अडथळे हे काढले जातात व तुटलेली संगती ही पुनर्स्थापित केली जाते.] (योएल २:१२ ऐम्पलीफाईड)
माझ्याकडे सतत येत राहा.........ही सतत चालणारी प्रक्रिया आहे [जोपर्यंत प्रत्येक अडथळे हे काढले जातात व तुटलेली संगती ही पुनर्स्थापित केली जाते.]
तर मग आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा (योएल २:१३)
यहूदी संस्कृती मध्ये शोक करण्याचे एक भावना ही वस्त्रे फाडणे होते. ही पद्धत यहूदी लोकांमध्ये आजही चालू आहे.
दु:ख प्रगट करण्याच्या बाह्य देखाव्यापेक्षा, पापा साठी खरा शोक व अंत:करणाचा प्रामाणिक पश्चाताप हा अधिक महत्वाचा आहे. संदेष्टा योएल ने देवाची आज्ञा पुन्हा सांगितली: "तर मग आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा" (योएल २:१३).
बाह्य विधींपेक्षा परमेश्वर अंत:करणाच्या परिस्थिती वर अधिक प्रसन्न होतो.
आपल्या परमेश्वराकडे वळा, कारण तो कृपाळू, कन्हवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणिल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. (योएल २:१३)
देवाचा चांगुलपणा व दया जाणणे हे खऱ्या पश्चातापासाठी आणखी एक प्रेरणा आहे. आपण त्याच्याकडे आत्मविश्वासाने येतो की तो स्वस्थ व क्षमा करेल, आणि हे की तो मग तो जो न्याय त्याने घोषित केला आहे त्यापासून परावृत्त होईल.
"परमेश्वर हा इतक्या हलक्या प्रतीचा विचार करतो की जर मी त्याच्याकडे वळले नाही, तर तो मला नष्ट करेल" ह्या कल्पनेने आपण पश्चाताप करीत नाही. त्याऐवजी "परमेश्वर इतका कृपाळू, कन्हवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे की जर मी त्याजकडे वळलो तर तो ज्यास मी पात्र आहे त्यापासून तो मला वाचवितो." शेवटी, हा तो त्याचा चांगुलपणा आहे, जो आपल्याला पश्चातापाकडे नेतो. (रोम २:४)
लूक ५:१-११ मध्ये, जेव्हा प्रभु येशू पेत्राच्या नावे मध्ये आला व त्यास त्याची जाळी टाकण्यास सांगितले. त्याचा परिणाम पेत्राला अभूतपूर्व मासे मिळण्यात झाला-नाव मास्यांनी भरून गेली. पेत्राने जेव्हा हे पाहिले, तो ताबडतोब येशूच्या चरणाजवळ पडला, व म्हणाला, माझ्यापासून दूर जा, कारण मी एक पापी मनुष्य आहे, हे परमेश्वरा!"
प्रभूचा पेत्राच्या प्रती हा चांगुलपणा होता ज्याने त्यास पश्चातापाकडे नेले. आणि म्हणून हे आपल्यासोबत सुद्धा असेच असले पाहिजे.
प्रार्थना
१.जसे आपल्यातील बहुतेकांना ठाऊक आहे की आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मला तुझे वचन व प्रार्थने मध्ये वाढण्यास साहाय्य कर. पवित्र आत्म्या तुझ्या अग्निद्वारे माझ्या प्रार्थनेची वेदी प्रज्वलित कर.
कुटुंबाचे तारण
पित्या तुझी दया प्रदिवशी नवीन आहे यासाठी तुझा धन्यवाद. खरोखर आमच्या आयुष्याच्या सर्व दिवस माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर तुझा चांगुलपणा व तुझी दया सतत राहिल आणि मी परमेश्वराच्या उपस्थितीत सतत निवास करेन. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मला माझ्या प्रभु येशूची कृपा ठाऊक आहे; तो धनवान असता माझ्याकरिता दरिद्री झाला; अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने मी आणि माझ्या कुटुंबाचे सदस्ये त्याच्या राज्याकरिता धनवान व्हावीत. (२ करिंथ ८:९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, व त्यांच्या संघातील सर्व सदस्ये चांगल्या स्वास्थ्य मध्ये राहावीत. असे होवो की तुझी शांति त्यांच्या जीवनात व त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाला घेरून राहो. असे होवो की करुणा सदन सेवाकार्ये प्रत्येक भागामध्ये वाढत जावो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परिवर्तनाची किंमत● तुमच्या प्रार्थनेच्या जीवनास प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहारिक पायऱ्या
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे-२
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
● दुर्मिळ गोष्ट जी आज मिळते
● तुमची नियती बदला
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- १
टिप्पण्या