डेली मन्ना
तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
Monday, 8th of May 2023
26
21
699
Categories :
मानवी हृदय
राजा शलमोन ने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिले:
सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. (नीतिसूत्रे ४:२३)
शब्द 'कर' याचा अर्थ रक्षण कर. आपल्याला परिश्रमपूर्वक आपल्या अंत:करणाचे रक्षण करावयाचे आहे.
सर्व गोष्टींपेक्षा आपल्या अंत:करणाचे रक्षण कर, कारण ते तुमच्या जीवनाचा मार्ग निश्चित करते. (नीतिसूत्रे ४:२३)
वाक्प्रचार "सर्व गोष्टींपेक्षा" याकडे लक्ष दया, याचा अर्थ हा आहे की आपल्या अंत:करणाच्या कार्याचे रक्षण करणे हे दररोजच्या आपल्या यादीतील सर्वात प्रथम कार्य असले पाहिजे.
तुम्ही कदाचित शरीराचे रक्षण करण्यावर शिकवण ऐकली असेन आणि ते चांगले आहे परंतु आपल्याला अंत:करणाचे रक्षण करण्याची सुद्धा गरज आहे.
हे महत्वाचे आहे हे ओळखणे की जेव्हा बायबल हृदयाबद्दल उल्लेख करते, तेव्हा ते एखाद्या शारीरिक अवयवाबद्दल संबोधन करीत नाही जे रक्तप्रसारणास जबाबदार आहे. त्याऐवजी, ते आपल्या आंतरिक मनुष्यास बोलते –आपल्या आध्यात्मिक मनुष्यास. परिणामस्वरूप, आपल्या हृदयाचे रक्षण करण्याचा अर्थ म्हणजे आपल्या आंतरिक जीवाचे रक्षण करणे, जे आपले मन, विचार, भावना आणि इच्छांना सामावून आहे. हे आध्यात्मिक संरक्षण देवाबरोबरच्या आपल्या संबंधाची पवित्रता आणि अखंडता टिकवून ठेवण्यास मदत करते, जे विकासाला चालना देते, आणि प्रभूसोबतचे आपले नाते जोपासते.
आपल्या अंत:करणाचे रक्षण करण्याची आपल्याला का गरज आहे?
१. कारण तुमचे अंत:करण (आंतरिक मनुष्य) हे अत्यंत मूल्यवान आहे
मागे कधीतरी मी कॅनडा मध्ये होतो. ते एक सुंदर ठिकाण आहे जेथे मी राहत होतो आणि तेथील घरधनी हे फारच दयाळू होते. त्यांनी खरेच आमची चांगली काळजी घेतली. परमेश्वर त्यांना सर्व बाबतीत आशीर्वाद देवो.
आता मी पाहिले की ते त्यांचा कचरा योग्यपणे वेगळा करीत असत आणि प्रत्येक बुधवारी रात्री रस्त्यावर पैकेज करून ठेवत असत. गुरुवारी सकाळी कचरा उचलणारे वाहन ते तेथून घेत असत. संपूर्ण रात्र ती कचऱ्याची पिशवी कोणतेही रक्षणा शिवाय तेथे असे. का? सरळपणे कारण ते अनुपयोगी होते. कल्पना ही सरळ आहे. अनुपयोगी वस्तूंचे कोणी रक्षण करीत नाही.
तर मग, सर्व गोष्टींपेक्षा आपल्या अंत:करणाचे रक्षण कर ही जर देवाची आज्ञा आहे, तर कोणी समजू शकतो की त्याच्या दृष्टीसमोर आपली अंत:करणे किती मूल्यवान असणार.
आपले अंत:करण (आपला आंतरिक मनुष्य), हे प्रत्यक्षात आपण कोण आहोत ते आहे. ते आपल्या सत्वाचे केंद्रस्थान आहे. हे येथेच आपली सर्व स्वप्ने, आपल्या इच्छा, आणि आपले आवेश राहतात. हा आपला तो भाग आहे जो परमेश्वर व इतर लोकांबरोबर जुळतो व त्यांच्याशी संभाषण करतो.
आम्ही एका सेमिनार मध्ये होतो ज्यास 'अंत:करणाचे बोलणे" म्हटले आहे, जेथे एक प्रसिद्ध हृदयतज्ञाने सांगितले की आपल्याला आपल्या शारीरिक अंत:करणाची काळजी घेण्याची कशी गरज आहे जर आपल्याला एक स्वास्थ्यपूर्ण जीवन जगावयाचे आहे. त्याचप्रकारे, आपले आध्यात्मिक अंत:करण "आपले आंतरिक मनुष्यत्वाकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण ते अत्यंत मूल्यवान आहे."
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
पित्या, परमेश्वराच्या भयाचा आत्मा माझ्या अंत:करणात मोकळा कर म्हणजे मी तुझ्यापासून दूर जाऊ नये (यिर्मया ३२:४०).
पित्या, तुझ्या वैभवाच्या प्रकटीकरणाने माझ्या अंत:करणाला स्पर्श कर, म्हणजे मी तुझ्या समोर कदाचित आदरयुक्त भीति सह जगावे.
पित्या, तुझ्या पवित्र उपस्थितीला मोकळे कर जे माझ्या आत्म्याला तुझ्या गौरवी वैभवासमोर थरथर कापावयास लावते.
माझ्या अंत:करणास तुझे अंत:करण व वचनाशी एक कर, आणि परमेश्वराच्या भयात मला हर्ष करू दे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- २● वचनाची सात्विकता
● असामान्य आत्मे
● शर्यत धावण्यासाठी योजना
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
● स्तुति वृद्धि करते
● आत्मे जिंकणे-ते किती महत्वाचे आहे?
टिप्पण्या