आपल्या आध्यात्मिक प्रवासात एखाद्या क्षणी, आपण सर्वांनी अदृश्य युद्धाचा भार अनुभवला आहे-एक आध्यात्मिक युद्ध जे आपल्या रक्तमांसाबरोबर युद्ध करीत नाही तर अगदी आपल्या आत्म्याशी.
तुमच्यावर असा हल्ला का होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सत्य हे साधेसरळ पण गहन आहे: सैतानाने तुमच्यावर इतक्या जोराने हल्ला केला नसता जर तुमच्यात काहीतरी मौल्यवान नसते.
ज्याप्रमाणे चोर रिकामी घर फोडण्यात वेळ वाया घालवत नाही, त्याप्रमाणेच शत्रू त्या लोकांबद्दल अधिक विचार करत नाही ज्यांच्याजवळ मोठी क्षमता किंवा उद्देश असत नाही.
"कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातंल्या दुरात्म्यांबरोबर आहे." (इफिस. ६:१२)
प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या हृदयात एक दैवी खजिना असतो- दान, उद्देश आणि देवाने दिलेली क्षमता. शत्रूला विश्वासणाऱ्याची शक्ती ठाऊक असते जे देवाने त्यांना दिलेल्या उद्देशात चालतात, आणि म्हणून, ते त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहचण्यापूर्वी तो त्यांना अडथळा आणि नष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
मोशेच्या कथेचा विचार करा. त्याच्या अगदी जन्मापासून, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. फारोने इब्री लोकांच्या लहान बाळांना मारण्याचा आदेश दिला होता, याची भीत बाळगली होती की इस्राएली लोक संख्येने वाढत आहेत. परंतु देवाकडे मोशेसाठी योजना होती, एक उद्देश इतका महत्वाचा की शत्रूने ते सुरुवातीपासून हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. मोशे, विषम परिस्थिती असतानाही, केवळ त्यास वाचवण्यात आले नाही परंतु फारोच्या राजवाड्यात त्याचे संगोपन झाले, नंतर त्याच्या लोकांना स्वतंत्र करण्यात मार्गदर्शन केले.
"मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे." (यीर्मया १:५)
मोशेसारखे, तुमची रचना करण्यापूर्वी देवाला तुमची ओळख होती. तुमच्यात जी क्षमता आहे ती अफाट आहे. परंतु यास ओळखणे हे केवळ अर्ध्या युद्धासारखे आहे. दुसरा अर्धा भाग हा अपरिहार्य आध्यात्मिक युद्धासाठी तयारी आहे जे तुम्हांला तुमच्या नाशिबापासून ओढून काढण्यासाठी प्रयत्न करेल.
म्हणून, मग तुम्ही कसे स्थिर उभे राहता आणि तुमच्यातील खजिना सांभाळता?
१. तुम्ही स्वतः देवाच्या संपूर्ण शस्त्रसामग्रीसह सज्ज व्हा:
"सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा" (इफिस. ६:१२)
यामध्ये, सत्य, धार्मिकता, शांतीची सुवार्ता, विश्वास, तारण, आणि देवाच्या वचनाचा समावेश आहे. प्रत्येक भाग आपले संरक्षण आणि समर्थ करण्याचे कार्य करते.
२. वचनात मुळावलेले राहा:
बायबल हे केवळ एक पुस्तक नाही; ते तुमचे शस्त्र आहे . येशूने सैतानाच्या मोहाला वचनाने लढा दिला: "असे लिहिलेले आहे,.... . वचनात हुशार राहणे तुम्हांला शत्रूच्या खोटेपणाचा सत्याने सामना करू देते.
३. एक प्रार्थनामय जीवन जोपासा:
ज्याप्रमाणे एक सैनिक मुख्य टोळीशी संपर्क ठेवून राहतो, आपल्याला देवासोबत संवाद सांभाळण्याची आवश्यकता आहे. पौल सल्ला देतो, "निरंतर प्रार्थना करा" (१ थेस्सलनीका. ५:१७). प्रत्येक परिस्थितीत, प्रार्थनेत देवाकडे वळा. मुख्य-कप्तानसोबत हा आपला सरळ संपर्क आहे.
४. स्वतः नीतिमान लोकांसोबत राहा:
त्यांच्यासोबत राहा जे प्रोत्साहन, सल्ला देऊ शकतात, आणि तुमच्यासोबत प्रार्थना करतात. "तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो" (नीतिसूत्रे २७:१७). युद्धाच्या वेळी, तुमच्या पाठीशी असलेले पथक असणे अमुल्य आहे.
"ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे." (२ करिंथ. ४:७)
ह्या युद्धाच्या मध्ये, लक्षात ठेवा की तुमच्यावर हल्ला होत आहे ही वस्तुस्थिती तुमच्यातील खजिन्याची पुष्टी आहे. प्रत्येक संकटे आणि परीक्षा हे देवाच्या राज्यात तुमच्या मूल्याची स्वीकृती आहे. शत्रू रिकामी पात्रांवर त्याचा वेळ घालवत नाही.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझी दैवी ठिणगी आमच्यात प्रज्वलित कर. आयुष्यातील युद्धाच्या मध्ये, तू आमच्यात लपवलेला खजिना आम्ही ओळखू शकावे. आम्ही जे सर्वकाही करतो त्यामध्ये तुझी प्रीती आणि उद्देशाला प्रतिबिंबित करण्यास आम्हांला साहाय्य कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● यातना-मार्ग बदलणारा● येशूला पाहण्याची इच्छा
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● स्तुति वृद्धि करते
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे
● मानवी स्वभाव
● दिवस ०८:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या