धार्मिकतेचा आत्मा हा सैतानी आत्मा आहे जे धार्मिक कार्यास आपल्या जीवनात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यास बदली करावयास पाहते.
हे लक्षात ठेवा: केवळ धार्मिक कार्ये ही केवळ मनाचे समाधान करतात आणि व्यक्तीच्या जीवनात काहीही प्रकट बदल आणीत नाहीत. ना ही ते आपल्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात बदल आणते.
याउलट, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये एक बदल आणते जे स्पष्टपणे आपल्या सभोवतालच्या लोकांना दिसून येते. ते त्यांच्यामध्ये सुद्धा बदल आणते.
धार्मिकतेच्या आत्म्याचे मुख्य ध्येय हे चर्च ला "सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी असे असावे," असे पाहिजे असते. (२ तीमथ्यी ३:५)
धार्मिकतेचा आत्मा हा"परुशी व सदुकी लोकांचे खमीर" आहे (मत्तय १६:६), ज्याविषयी प्रभूला पाहिजे की त्याच्या शिष्यांनी सावधान राहिले पाहिजे.
धार्मिकतेचा आत्मा हा तुम्हावर प्रभाव करीत आहे हे तुम्ही कसे ओळखावे:
१. एकव्यक्ति जो बायबल चे अनेक अध्याय वाचण्यात फार गर्व करतो परंतु जे वाचले आहे ते आचरणात आणीत नाही. वास्तवात असा व्यक्तिथोडयावेळा नंतर हे सुद्धा आठवत नाही की त्याने किंवा तिने काय वाचले होते.
२. अनेक जन देवाच्याअनेक सेवकांकडून संदेश ऐकतात (यात काहीही चूक नाही) पंरतु पुन्हा, जे ऐकले आहे त्यासाठी काहीही कृती किंवा प्रतिसाद नसतो.
३. देवाच्या अनेक पुरुष व स्त्रियांकडून आध्यात्मिक पुस्तके वाचणे, अनेक सभांना व उपासनेला नियमितपणे हजर राहणे, हे सर्व करणे यात काहीही चूक नाही, परंतु जे शिकले आहे त्याचेपालन कोठे आहे.
४. (सर्वात चांगले) व्यक्ति जो धार्मिकतेच्या आत्म्याने प्रभावित झाला आहे तो सर्व उपदेश, प्रोत्साहन व सुधारणेचे शब्द ऐकतो व म्हणतो, "मला वाटते की तो व्यक्ति येथे पाहिजे होता. हा संदेश त्याच्या (तिच्या) साठी आहे."
धार्मिकतेचा आत्मा हे ब्रेड मधील खमीर प्रमाणे कार्य करते. ते ब्रेड मध्ये आणखी काही सत्व किंवा पोषकता टाकत नाही, ते केवळ त्यास फुगविते. धार्मिकतेच्या आत्म्याचे असे कार्य आहे.
ते चर्च चे जीवन व कार्यात काही भर घालीत नाही परंतु केवळ मनुष्याच्या गर्वाला फुगविते जे एदेन बागे मध्ये मनुष्याच्या पतनाचे कारण झाले.
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
येशूच्या नांवात, मी आदेश देतो कीमी देवाच्या मार्गात वाढत आहे. कोणतेही शस्त्र जे माझ्या विरोधात बनविले आहे ते संपन्न होणार नाही.
कौटुंबिक तारण
येशूच्या नांवात, मी आदेश देतो की मी, माझ्याकुटुंबाचे सदस्य, व माझे चर्च हे सिद्धांतांचे प्रत्येक वारे व मनुष्याच्या कपट योजनासह गडबडणार नाही किंवा त्याने भारावून जाणार नाही.
येशूच्या नांवात, मी आदेश देतो की मी, माझ्याकुटुंबाचे सदस्य, व माझे चर्च हे फसवणुकीच्या कपटयुक्त योजनांच्या धूर्त लबाडीच्या विरोधात संरक्षित केले जावो आणि आम्ही स्पष्टपणे लपलेले असत्य पाहावे व त्यास पूर्णपणे अस्वीकार करावे.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
ख्रिस्त येशू द्वारे माझा पिता गौरवाच्या द्वारे माझी व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांची सर्व गरज पुरवेल.
केएसएम चर्च वाढ
पित्या, पास्टर मायकल व त्याच्या संघाच्या सदस्यांना तुझ्या आत्म्याद्वारे नवीन अभिषेक कर ज्याचा परिणाम तुझ्या लोकांमध्ये चिन्हे व चमत्कार व सामर्थ्याची कार्ये होवो. ह्याद्वारे लोकांना तुझ्या राज्यात आण. येशूच्या नांवात.
देश
पित्या, येशूच्या नांवात मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची अंत:करणे तुझ्याकडे वळो. त्यांनी त्यांच्या पापाचा पश्चाताप करावा व तुला प्रभु व तारणारा म्हणून स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३
● तुमच्या भविष्यासाठी देवाची कृपा आणि उद्देश स्वीकारणे
● परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया
● आत्म्याद्वारे मार्गदर्शित होणे याचा काय अर्थ आहे?
● हेतुपुरस्सर शोध
● तुमच्या पदोन्नतीसाठी तयार राहा
टिप्पण्या