हरविलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही. (स्तोत्र ११९:१७६)
लोक जे जंगलात हरवले जातात सामान्यपणे गोल-गोल भटकत राहतात जेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेच्या मार्गानुसार जाण्याचा प्रयत्न करतात, नेहमी तेथेच त्यांचा शेवट होतो जेथून त्यांनी सुरुवात केली होती. ते इतके परिश्रम करतात परंतु कोठेही न पोहोचण्यात त्यांचा अंत होतो.
ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल. (नीतिसूत्रे २१:१६) हे मला याची आठवण देते जेव्हा इस्राएली लोक आश्वासित भूमीकडे जाण्याच्या त्यांच्या मार्गात भटकत राहिले होते. आपण एक विश्वासणारे म्हणून आपल्यासाठी हा एक मोठा धडा आहे. हे इतके सोपे आहे की मार्गावरून भटकून जावे, आपले तर्क व इच्छा यांच्या नुसार चालण्याचा प्रयत्न करीत.
पुरेसे आहे याविषयी, इतर काय विचार करतात याविषयी, व आपल्या स्वतःच्या लोकांचे संरक्षण करण्याविषयी चिंता करीत आपण चक्रात फिरत राहतो. आपल्या स्वतःच्या विचाराच्या मार्गानुसार चालत, आपण कोठेही पोहचत नाही.
परमेश्वर समजतो आपण कोण आहोत आणि तो शांतपणे वाट पाहत आहे की आपण त्याच्याकडे पाहावे. तुम्ही देवाकडून जन्मला आहात की देवा द्वारे चालविले जावे (१ योहान ५:४ वाचा). तुम्ही स्वतंत्र जीवन जगावे अशी अपेक्षा नाही परंतु जो महान आहे त्यावर पूर्णपणे अवलंबून राहावे जो तुमच्यामध्ये राहतो-पवित्र आत्मा.
आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपआपला मार्ग धरिला होता, अशा आम्हां सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले. (यशया ५३:६)
भीती, केवळ जे आपल्याला ठाऊक आहे,यावर आधारित निर्णय करण्याऐवजी, परमेश्वर काय म्हणत आहे जे त्याने त्याच्या वचनात दिले आहे त्यावर अवलंबून राहण्याद्वारे आपण विश्वासाचा निर्णय करू शकतो. प्रभु येशूने तुमच्या संभ्रमाच्या दिवसाची किंमत भरली आहे आणि भटकणे आता संपले आहे.
प्रार्थना
१.२०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळवार/गुरुवार/शनिवार) आम्ही उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
मी देवापासून जन्मलेला आहे की नैसर्गिक परिस्थितींच्याही वर आणि त्याहीपलीकडे जगावे. देवाचे वचन हे माझ्या जीवनात मार्गदर्शक आहे. मी विश्वास ठेवतो, कबूल करतो, कार्य करतो, आशा करतो आणि देवाचे वचन प्रकट करतो. येशूच्या नावाने. आमेन. (असे बोलत राहा)
कुटुंबाचे तारण
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)
आर्थिकतेचा नवीन मार्ग
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील (फिलिप्पै ४:१९). मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तूं तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देतो की आमच्या मार्गामध्ये आम्हांला सुरक्षित ठेवावे आणि आम्हांला मार्गदर्शन करावे. पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्यांसाठी तुझे पवित्र दिव्यदूत पाठिव, येशूच्या नांवात. त्यांच्या विरोधातील अंधाऱ्या शक्तीचे प्रत्येक कार्य नष्ट कर.
देश
पित्या, असे होवो की तुझी शांती व धार्मिकतेने आमच्या देशाला भरून टाकावे. आमच्या देशाच्या विरोधातील अंधार व विनाशकारी सर्व शक्ती ह्या नष्ट केल्या जावोत. असे होवो की आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात प्रभु येशूचे शुभवर्तमान हे पसरवो. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● हे काही प्रासंगिक अभिवादन नाही● वाट पाहण्यामुळे एका राष्ट्राचा उद्धार केला गेला
● दिवस ०९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● परिस्थितीच्या दयेखाली कधीही जाऊ नये
● बुद्धिमान व्हा
● लहान गोष्टी मोठ्या उद्देशांना जन्म देतात
● २१ दिवस उपवासः दिवस २०
टिप्पण्या