स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करितो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. (स्तोत्र १८:३)
दावीदाने म्हटले, "परमेश्वराचा मी धावा करितो." परमेश्वराचा धावा करणे हे प्रार्थनेचा संदर्भ देते. एक जुनी चीनी म्हण आहे जी म्हणते, "जर तुम्ही एका मनुष्याला मासा देता, तुम्ही त्यास एका दिवसासाठी तृप्त करता, मासे धरण्यास त्या मनुष्यास शिकवा, आणि तुम्ही त्यास आयुष्यभरासाठी भोजन पुरविता." जर तुम्ही योग्यप्रकारे प्रार्थना करण्यास शिकला, तर ते केवळ तुमच्या व तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वादाचे असणार नाही परंतु पिढया ज्या तुमचे अनुकरण करतात.
यिर्मया ३३:३ म्हणते, "मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठया व गहन गोष्टी तुला सांगेन."
आपल्यापैंकी अनेक जण प्रार्थना करतात परंतु आपण खात्रीशीर नसतो किंवा आत्मविश्वासी राहत नाही की परमेश्वराने खरेच आपल्याला ऐकले आहे. चला आपण असे म्हणू तुम्ही एका घरासाठी प्रार्थना करीत आहात आणि मग परमेश्वर तुम्हाला स्वप्नात किंवा दृष्टांतात दाखवितो की तुमचे घर आणि इतर गोष्टी कोठे आहेत? हे तुम्हाला परमेश्वरावर विश्वास व आत्मविश्वासाच्या स्तरावर घेऊन जाईल जे लक्षात घेण्याजोगे असेल. घर येण्यात जरी उशीर होत असेल, तुम्ही गडबडणार किंवा अस्थिर होणार नाही. हे याकारणासाठी की परमेश्वराने ते तुम्हाला अगोदरच दाखविले आहे. प्रार्थनेचे हे भविष्यात्मक परिमाण आहे.
दुसरी गोष्ट जी घडेल जेव्हा तुम्ही परमेश्वराचा धावा कराल ती ही: तुमच्या शत्रूपासून तुमचा बचाव होईल. (स्तोत्र १८:३)
शत्रू हे भौतिक किंवा आध्यात्मिक (जसे सैतानी शक्ति) असू शकतात. प्रार्थना ही तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना शत्रूपासून (दृश्य व अदृश्य) सुटका आणेल.
एक कुटुंब होते जे रात्रीच्या वेळी एक सावली पाहत असे. ते फारच हताश होते आणि त्यांनी अनेक उपाय करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस त्यांनी मला फोन केला की त्यांच्याघरी यावे (जे दुसऱ्या राज्यात होते). माझ्या व्यस्त कार्यक्रमामुळे, मी त्यांना सांगितले की मी येऊ शकत नाही. ते फारच निराश झाले. तथापि, मी त्यांना सांगितले की ज्या सुचना मी त्यांना देत आहे जर त्यांनी त्या पाळल्या, तर ते सुटका प्राप्त करतील.
नाखुषीने त्यांना सहमती दर्शविली. मी त्यांना सांगितले की संपूर्ण कुटुंबाने दोन दिवस उपास व प्रार्थना करावी. त्या संपूर्ण दिवसभरात त्यांनी त्यांच्या घराला अभिषेक करावयाचा आहे व परमेश्वराची उपासना करीत वेळ घालवावा. दुसऱ्या दिवशी, माझा फोन वाजला. तो त्या घराचा मनुष्य होता. तो आनंदाने ओरडत होता व म्हणाला, "पास्टर मायकल, आता माझ्या घरात कोणतीही सावली दिसत नाही. प्रभु येशूने आम्हांला मुक्त केले आहे."
जे हे वाचत आहे त्या माझ्या प्रिय मित्रांनो. परमेश्वर कोणाचा पक्षपात करीत नाही. जे कोणी तुम्ही असा-श्रीमंत किंवा गरीब. जर तुम्ही परमेश्वराचा धावा करता:
१. तो तुम्हाला गोष्टी दाखवेल.
२. तो तुमचा भौतिक व आध्यात्मिक शत्रूंपासून बचाव करील.
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, तुझ्या पराक्रमी सामर्थ्याने, येशूच्या नावाने, माझी प्रगती आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीला अडथळा करणाऱ्या प्रत्येक शक्तीला उध्वस्त कर.
माझ्या प्रगतीला अडथळा आणणारा प्रत्येक सैतानी अवरोध, येशूच्या नावाने अग्नीद्वारे विखरला जावो.
कौटुंबिक तारण
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांना प्रचार करण्यास मला समर्थ कर. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या, येशूच्या नांवात मी तुला धन्यवाद देतो की तूं मजसाठी व माझ्या कुटुंबासाठी द्वार उघडेल जे कोणी बंद करू शकणार नाही. (प्रकटीकरण ३:८)
चर्च वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रार्थना करतो की, हजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम च्या प्रत्यक्ष प्रसारणकडे यावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. असे होवो की त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नाव उंचाविले जावो व त्यास गौरव मिळो.
देश
पित्या, येशूच्या नांवात, व येशूच्या रक्ता द्वारे, दुष्टांच्या डेऱ्यांमध्ये तुझा बदला मोकळा कर आणि एक राष्ट्र म्हणून आमचे गमाविलेले गौरव पुनर्स्थापित कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ११ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● आदर्श होऊन पुढारीपण करा
● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
● उपासाचे जीवन-बदलणारे लाभ
● तुमच्या पदोन्नतीसाठी तयार राहा
● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● नम्रता हे कमकुवतपणा समान नाही
टिप्पण्या