मग याकोबाने त्या ठिकाणाचे नांव पनिएल (देवाचे मुख) असे ठेविले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. (उत्पत्ति ३२:३०)
याकोबाने त्याचा भाऊ एसाव पासून त्याचा पिता याकोबाचा आशीर्वाद चालाकीने काढून घेतला होता. ह्या सर्व वर्षा दरम्यान परमेश्वर याकोबाला नियंत्रण करणारा व चालाकी करणाऱ्यापासून एक मनुष्य असे बदलत होता जो परमेश्वरावर भरंवसा करण्यास शिकत होता. तो आता एसाव ला भेटण्यास तयार होता.
तथापि, तो घाबरला होता की एसाव त्याच्याकडून व त्याच्या कुटुंबाकडून त्याच्या भूतकाळाच्या पापाचा बदला घेईल, म्हणून त्याने पुढे बक्षीस पाठविले, तर तो मागे राहिला व परमेश्वराकडून दया मागत होता.
याकोबाला एक देवदूत प्रगट झाला. आता, जर केवळ परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला असता तर तो ह्या कसोटीतून वाचला असता काय. भूतकाळ मध्ये याकोबाने ही समस्या त्याच्या मार्गाने सोडविली असती. आता, त्याला केवळ परमेश्वराचा मार्ग पाहिजे होता. त्यास परमेश्वराची इतकी अधिक गरज होती की तो देवदूताला जाऊ देत नव्हता. याकोब प्रयत्न करीत होता की परमेश्वराचा सर्व आशीर्वाद त्याच्या जीवनावर यावा.
त्याच्याकडे जे सर्व काही होतेत्याने तो परमेश्वराचा धावा करीत होता. "याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली" (उत्पत्ति ३२:२५). ह्या मनुष्याच्या प्रबळ इच्छेवर वर्चस्व करण्याचा केवळ एकच मार्ग की शारीरिकदृष्टया त्यास अस्थिर करावे. ते क्लेशदायक होते. त्याने त्यास हतबल केले.
ही शेवटची स्थिती होती की याकोबाला त्याच्या स्वतःच्या सामर्थ्यामध्ये चालण्याच्या त्याच्या जुन्या स्वभावातून काढणे. याकोबाच्या जीवनात परमेश्वराचे हे शेवटचे कार्य होते ज्याने एक नवीन नाव'इस्राएल' सहसाजरा केला. प्रक्रिया ही आता पूर्ण झाली होती.
परमेश्वर आता ह्या मनुष्याला विपुल आशीर्वाद देऊ शकत होता. त्याने त्याला एसाव कडून कृपा दिली आणि हे तुटलेले नातेसंबंध पुनर्स्थापित केले. परमेश्वराने आपल्याला जीवनात काय केले पाहिजे की नियंत्रण व चालाकी करणारा स्वभाव काढून टाकावा जो अनेक वेळा आपला हिस्सा असतो?
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, सर्व काही अर्पण करण्यास मला शिकीव. माझा वारसा प्राप्त करण्यास मला साहाय्य कर व मला पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून राहण्याकडे आण.
कुटुंबाचे तारण
धन्यवादित पवित्र आत्म्या, मलाविशेषकरून दाखव की माझ्या कुटुंबाच्या प्रत्येकसदस्यांना वचन कसे प्रचार करू. मला समर्थ कर प्रभो. योग्य वेळी, तुझ्याविषयी सांगण्यासाठी संधी प्रगट कर.येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे तेप्रभु द्वारे स्मरण करण्यात येईल. म्हणून, माझ्या जीवनातील कोणतीही अशक्य परिस्थिती प्रभु द्वारे बदलली जाईल. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रार्थना करतो की, हजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम च्या प्रत्यक्ष प्रसारणकडे यावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. असे होवो की त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे.त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नाव उंचाविले जावो व त्यास गौरव मिळो.
देश
पित्या,येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची हृदये तुझ्याकडे वळो. त्यांनी त्यांच्या पापाचा पश्चाताप करावा व येशूला त्यांचा प्रभु व तारणारा असे स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दबोरा च्या जीवनाकडून शिकवण● दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना
● येशूचे नांव
● अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-1
● तयारी नसलेल्या जगात तयारी
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
● सुटकेचा दिवस (दिवस १०)
टिप्पण्या