डेली मन्ना
हुशारीने कार्य करा
Tuesday, 13th of June 2023
18
15
747
Categories :
कामाची जागा
प्राधान्यक्रम
मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमवाल तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार? (मत्तय १६:२६)
तुम्ही किती कठीण परिश्रम करता ते नाही; तर तुम्ही किती हुशारीने ते काम करता ते आहे: एका मनुष्याला सांगण्यात आले की जर त्याने कठीण परिश्रम केले तर तो श्रीमंत होईल. एकच कठीण काम जे त्याला ठाऊक होते ते खड्डे खणणे. तेव्हा त्याने त्याच्या घराच्या मागच्या बाजूला खोल खड्डे खणण्यास सुरुवात केली. तो श्रीमंत झाला नाही; त्यास केवळ चांगलीच पाठदुखी मिळाली. त्याने कठीण परिश्रम केले पण त्याने कोणत्याही प्राथमिकते शिवाय उद्देशहीन काम केले.
सर्वात महत्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो –लोक, व्यवसाय किंवा संस्था अपयशी का ठरतात? मुख्य कारण हे, प्राथमिकतेसंबंधी विचार करण्यात अपयश हे आहे. विद्यार्थी: त्याने किंवा तिने त्यांच्या प्राथमिकता-अभ्यास संबंधी विचार केला नाही परंतु सोयीस्करपणे सतत पुढे ढकलत राहिले. विवाहाचा विचार करा: कोणत्याही जोडीदाराने एकदुसऱ्याबरोबर चांगला वेळ घालविला नाही परंतु दिसणाऱ्या इतर महत्वाच्या गोष्टी करीत राहिले. हे त्याप्रमाणे आहे की मनुष्याने सर्व जग मिळविले पण आपला जीव गमाविला.
तुम्हाला असे वाटते काय तुम्ही प्रगती ही करीत नाहीत परंतु केवळ त्याच चक्रातून वारंवार जात आहात? तुम्ही जीवनाशी नेहमीच निराश झालेले आहात काय? जर तुमचे उत्तर ह्या प्रश्नांना, "होय" असेन, मग हे असे असू शकते की तुमच्या सर्व प्राथमिकता ह्या मिसळल्या आहेत. दिवसाची सुरुवात प्रार्थना व वचनासह करण्याद्वारे तुमच्या जीवनाची प्राथमिकता प्रभु येशूला करा. असे करण्याने बरीच संकटे व धक्कादायक प्रसंगापासून तुम्हाला वाचविले जाऊ शकते. आत्म्याच्या वाणी कडे तुम्ही लक्ष दयाल काय?
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
हे परमेश्वरा, तूं माझा परमेश्वर आहेस; पहाटेच मी तुझा धावा करेन. जेव्हा मी तुझे राज्य व धार्मिकता मिळविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सर्व गोष्टी मला प्राप्त होतील, येशुच्या नांवात. आमेन.
कौटुंबिक तारण
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांना प्रचार करण्यास मला समर्थ कर. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या, येशूच्या नांवात मी तुला धन्यवाद देतो की तूं मजसाठी व माझ्या कुटुंबासाठी द्वार उघडेल जे कोणी बंद करू शकणार नाही. (प्रकटीकरण ३:८)
चर्च वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रार्थना करतो की, हजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम च्या प्रत्यक्ष प्रसारणकडे यावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. असे होवो की त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नाव उंचाविले जावो व त्यास गौरव मिळो.
देश
पित्या, येशूच्या नांवात, व येशूच्या रक्ता द्वारे, दुष्टांच्या डेऱ्यांमध्ये तुझा बदला मोकळा कर आणि एक राष्ट्र म्हणून आमचे गमाविलेले गौरव पुनर्स्थापित कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● स्तुति ही जेथे परमेश्वर वास करतो
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
● दिवस ११ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● येथून पुढे अस्थिरता नाही
● इतरांना आशीर्वाद देणे सोडू नका
● लहान गोष्टी मोठ्या उद्देशांना जन्म देतात
टिप्पण्या