देवाचा आत्मा हा पवित्र आत्म्याचे शीर्षक आहे जो ह्याशी जुडलेला आहे
१. सामर्थ्य
२. भविष्यवाणी आणि
३. मार्गदर्शन
जुन्या करारात आत्म्याचे पहिले शीर्षक हे देवाचा आत्मा असे आहे. आपण देवाचा आत्मा असे पहिल्यांदा ह्या नावाने उत्पत्ति मध्ये पाहतो.
प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली (तयार केले, रचले, आकार दिला). आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत(फिरत, पांघरून)राहिला होता.(उत्पत्ति १: १-२ ऐम्पलीफाईड बायबल)
ह्यावचनानुसार, आपण हे पाहू शकतो की पवित्र आत्मा हा सृष्टी निर्माण करण्यात कार्यरत होता. पवित्र शास्त्र सांगते की देवाचा आत्मा खोल पाण्यावर तळपत राहिला होता.
ऐम्पलीफाईड बायबल तळपत होता याचे दोन अर्थ देते: फिरत होता, पांघरून होता.
हे स्पष्टपणे एक पक्षी घरट्या मध्ये बसलेला आहे, आणि अंड्यावर झाकून व पसरून राहिला आहे ही कल्पना देते, नवीन जीवनासाठी काळजी घेत आहे. तेच शब्द वापरले आहे हे वर्णन करण्यासाठी अनुवाद ३२: ११ मध्ये, की कसे "गरुड पक्षीण आपले कोटे हालविते, आपल्या पिलांवर तळपत असते."
नंतर तोच आत्मा शौल वर आला आणि त्याच्याकडून भविष्यवाणी करून घेतली. (१ शमुवेल १०: १० पाहा)
तो जखऱ्या वर सुद्धा आला, आणि त्यास देवाचे वचन घोषित करण्यास समर्थ केले. (२ इतिहास २४: २० पाहा)
इस्राएलच्या पुनर्स्थापने विषयी यहेज्केल ला दृष्टांत हा "देवाच्या आत्म्या द्वारे" देण्यात आला. (यहेज्केल ११: २४)
रोम ८: १४ मध्ये पवित्र शास्त्र घोषित करते, "कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत."
देवाच्या आत्म्याने विश्व निर्माण केले आहे. तो भविष्यवाणी चा आत्मा आहे. तो सामर्थ्याचा आत्मा आहे आणि तो मार्गदर्शनाचा आत्मा आहे. तुम्हाला ठाऊक आहे काय तुम्ही(तुमचे शरीर) देवाचे मंदिर आहाआणि देवाचा आत्मा तुम्हांमध्ये वास करतो. (१ करिंथ ३: १६)
तर मग एक ख्रिस्ती म्हणून, आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे हे जाणून की आपले शरीर हे जिवंत परमेश्वराचे मंदिर आहे, मूल्यवान आणि ख्रिस्ता सह आपल्या संबंधाची एक साक्ष इतरांनी पाहावी म्हणून.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरीता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
माझे शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि देवाची संपूर्ण पूर्णतः मजमध्ये निवास करते. मीमाझ्या शरीरात आणि माझ्या आत्म्यात देवाचे गौरव करतो जे त्याचे आहे. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, मी विनंती करतो की तू माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या हृदयास स्पर्श कर की ख्रिस्ताचे सत्य स्वीकारावे. "त्यांना असे हृदय दे की येशू ख्रिस्ताला प्रभू, परमेश्वर आणि तारणारा म्हणून ओळखावे. त्यांना मनापासून तुझ्याकडे वळण्यास प्रेरित कर.
माझ्या खांद्यावरून प्रत्येक भार काढून टाकले जावो आणि माझ्या मानेवरील प्रत्येक जू आणि अभिषेकामुळे प्रत्येक जू नष्ट केले जाईल. (यशया १०:२७)
आर्थिक प्रगती
पित्या, मी तुझे आभार मानतो, कारण हा तूच आहे जो मला सामर्थ्य देतो की संपत्ती प्राप्त करावी. संपत्ती निर्माण करण्यासाठी सामर्थ्य हे आताच मजवर येवो. येशूच्या नावाने. (अनुवाद ८:१८)
माझा वारसा हा कायमचा असेल. विपत्काली मी लज्जित होणार नाही: आणि दुष्काळाच्या दिवसांत, मी आणि माझ्या कुटुंबाचे समाधान करण्यात येईल. (स्तोत्र ३७:१८-१९)
माझा देव आपल्या संपत्यनुरूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील." (फिलिप्पै. ४:१९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, पास्टर मायकल, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, संघाचे सदस्य आणि करुणा सदन सेवाकार्याशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला समृद्ध कर.
राष्ट्र
पित्या, तुझे वचन म्हणते, राज्यकर्त्यांना त्यांच्या सन्मानाच्या उच्च पदांवर बसविणारा तूच आहे आणि नेत्यांना त्यांच्या उच्च पदांवरून काढून टाकणारा देखील तूच आहे. हे परमेश्वरा, आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात योग्य पुढारी निर्माण कर. येशूच्या नावाने. आमेन.
पित्या, तुझा आत्मा भारतातील प्रत्येक शहर आणि राज्यावर वाहू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – १● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात
● ओरडण्यापेक्षा दयेसाठी रडणे
● वाईटपद्धतींनानष्ट करणे
● विश्वासात स्थिर उभे राहावे
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
● चालण्यास शिकणे
टिप्पण्या