"तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे." (१ पेत्र. २:५)
यरुशलेमेस कराराच्या कोशाचे परत आणण्याचे राजा दाविदाचे हर्षोल्हासाचे दृश्य दैवी आत्मीयता आणि नम्रतेचे ज्वलंत चित्र रेखाटते. दावीद, शाही पोशाखात नाही, तर सामान्य याजकाच्या पोशाखात सजलेला, प्रभूच्या कराराच्या कोशासमोर आवेशाने नाचत होता, जे प्रभूसाठी असलेले त्याचे प्रेम आणि भक्तीचे चित्रण स्पष्ट करते. (२ शमुवेल ६:१४)
त्याची पत्नी मीखलने, जेव्हा त्याचे हे बेभानपणे उपासनेचे सार्वजनिक प्रदर्शन पाहिले, तेव्हा ती रागात आली. राजा आपला राजेशाही थाट सोडून सामान्य लोकांबरोबर पूर्णपणे मिसळला आहे असे तिला वाटले (२ शमुवेल ६:१६). तरीही, हीच नम्रता आणि उत्कट उपासनेची देवाला आपल्याकडून इच्छा आहे- त्याचे राजकीय याजकगण (१ पेत्र. २:९).
जेव्हा आपण जे देवाची लेकरे, उपासना करण्यासाठी एकत्र येतो, तेव्हा आपण एका दैवी मंडळीमध्ये प्रवेश करतो जेथे सांसारिक पदव्या आणि पदांना काही अर्थ नसतो. त्याच्या उपस्थितीत, आपण बैंकर, वकील इत्यादी नाही; आपण आपल्या याजकीय भुमिकेमध्ये एक होतो, आपण आपल्या राजाला स्तुती सादर करतो. हे ते ठिकाण आहे जेथे प्रत्येक विश्वासणारा, आध्यात्मिक समानतेचे एफोद वस्त्र घालून असतो, आणि एकत्र मिळून राजांचा राजा आणि प्रभूंच्या प्रभूची मोठ्याने स्तुती करतो.
पृथ्वीवरील चर्च हे स्वर्गीय सिंहासनाच्या खोलीचे प्रतिबिंब आहे. हे ते ठिकाण आहे जेथे विविध पार्श्वभूमी आणि स्थिती सामंजस्यपूर्ण उपासनेत एकत्र होतात, जे स्वर्गाच्या राज्याचे सार मूर्त रूप देते जेथे प्रत्येक वंश, भाषा आणि राष्ट्र कोकऱ्यासमोर उभे राहतील, अनंतकाळची स्तुती करतील. (प्रकटीकरण ७:९)
प्रकटीकरण ४:१० मध्ये पवित्र शास्त्र सांगते, "तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील 'राजासनावर जो बसलेला' त्याच्या पाया पडतात; जो 'युगानुयुग जिवंत' त्याला नमन करतात; आणि आपले मुकुट राजसानापुढे ठेवतात." त्याचप्रमाणे, आपल्याला आपले सांसारिक भेद सोडून आध्यात्मिक ऐक्याची वस्त्रे परिधान करण्यास बोलावले आहे, की महान प्रमुख याजक- येशूची उपासना करण्यास आपल्या स्वतःला मग्न करावे.
आज, तुमच्या उपासनेचा दृष्टीकोन तपासा. तुम्ही तुमचे राजकीय वस्त्र पांघरून आहात किंवा तुम्ही स्वतः 'तलम एफोदाचे' वस्त्र घालून शुद्ध उपासनेत राजकीय याजकांत येऊन मिळत आहात का?
प्रार्थना
प्रभू, आमची सांसारिक वस्त्रे काढून टाकण्याची आणि तुझे याजक म्हणून आमची भूमिका स्वीकारण्याची कृपा आम्हांला दे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला तुझ्या राज्यात एक सहकारी याजक म्हणून पाहून आमची अंत:करणे उपासनेत एकरूप होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस २२:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● दबोरा च्या जीवनाकडून शिकवण
● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
● महाकाय लोकांचे वंशज
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
टिप्पण्या