बीज कडे सामर्थ्य व शक्ति आहे की तुमच्या जीवनाच्या प्रत्येक घटकांना प्रभावित करावे-तुमचे आध्यात्मिक, शारीरिक, भावनात्मक, आर्थिक व सामाजिक जीवन हे सर्व तुम्ही भूतकाळात जे बीज पेरले आहे त्यानुसार चालविले जाते. मुलेबाळे ही आई-वडिलांनी भूतकाळात जे बीज पेरले आहे त्याने प्रभावित होतात.
जलप्रलय नंतर परमेश्वराने हे बोलत म्हटले:
"पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची राहणार नाहीत." (उत्पत्ति ८:२२)
एक सर्वात प्रमुख नियम जो परमेश्वराने सिद्ध केला आहे की पृथ्वीला चालवावे तो "पेरणी व कापणी करण्याचा नियम" आहे. काही त्यास "कारण व परिणाम" चा नियम म्हणतात, काही त्यास "पेरण्याचा व कापणी करण्याचा" नियम म्हणतात. कोणतेही नांव तुम्ही त्यास दया तो विषय नाही.
बीज चे महत्त्व काय आहे?
बीज हे परमेश्वराद्वारे एक माध्यम म्हणून आदेशित केले गेले आहे की येथे वाढ, जपणूक व बहुगुणीत होणे आहे. झाडांना निर्माण केले गेले आहे की फळ निर्माण करावे परंतु त्या फळाच्या आतमध्ये आणखी एका झाडासाठी बीज असते. देवाची योजना ही होती की जेव्हा त्याने काहीतरी एकदा निर्माण केले, त्यानंतर त्या गोष्टीने त्या बीज च्या सामर्थ्याने पुन्हा निर्माण करावे व केले पाहिजे. विविध प्रकारचे बीज
१. बीज जे सृष्टि मध्ये आहे
तेव्हा देव बोलला, "हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपआपल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमि आपल्यावर उपजवो; आणि तसे झाले. हिरवळ, आपआपल्यापरी बीज देणारी वनस्पती व आपआपल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली; देवाने पाहिले की हे चांगले आहे." (उत्पत्ति १:११-१२)
सृष्टि निर्माण करण्यादरम्यान, देवाने याची खात्री केली की झाडे व इतर सजीव गोष्टींमध्ये "बीज" चे सामर्थ्य असावे. बीज प्रत्येक सृष्ट वस्तूला त्याच्या प्रकारानुसार पुन्हा निर्माण करण्यास समर्थ करते. प्रत्येक सजीव गोष्ट जी देवाने निर्माण केली त्यामध्ये बीज हे होते. त्याने प्रत्येक बीज मध्ये सामर्थ्य ठेवले की उपज निर्माण करावी- प्रत्यक्षात त्यानुसार निर्माण करावे व ते बहुगुणीत करावे.
परमेश्वराने वनस्पतिचे प्रकार निर्माण केले की स्वतःहून निर्माण करावे. पुन्हा निर्माण करण्याच्या सामर्थ्याशिवाय, फळ जे देवाने एदेन बागे मध्ये निर्माण केले ते सृष्टि निर्माण केल्या नंतर लगेचच नष्ट झाले असते.
देवाने जेव्हा प्राण्यांना निर्माण केले, त्याने त्यांना सामर्थ्य दिले की स्वतःहून पुन्हा निर्माण करावे. याकारणामुळे, अनेक प्राण्यांना हे शक्य झाले की असंख्य असे वाढावे. प्राण्यांना परमेश्वरा द्वारे निर्माण केले गेले की त्यांच्या प्रकारानुसार पुन्हा निर्माण करावे.
२. पुन्हा प्रजनन
उत्पत्ति ३:१५ म्हणते, "आणि तूं व स्त्री, तुझी संतति व तिची संपत्ति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तूं तिची टाच फोडिशील."
परमेश्वराने आपण मानवाला पुन्हा निर्माण करण्याचे सामर्थ्य दिले आहे. आपल्या मुलाबाळांना "बीज" हे म्हटले जाऊ शकते. आपली मुलेबाळे ही बीज आहेत. बीज द्वारे आपण बहुगुणीत होतो व वाढतो व पृथ्वीला भरून टाकतो. पृथ्वीवरील प्रत्येक सजीव प्राणी पुन्हा एकदा बीज द्वारे निर्माण करतो.
प्रार्थना
पित्या, बीज च्या सामर्थ्याचे प्रकटीकरण जे तूं मला दिले आहे त्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. मी विश्वासा मध्ये व विश्वासाद्वारे पेरतो. विपुल उत्पादन आता व सार्वकालिकतेमध्ये यासाठी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवदुतांकडे आपण प्रार्थना करू शकतो काय?● हे काही प्रासंगिक अभिवादन नाही
● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
● सर्वांसाठी कृपा
● प्रकाश हा वचना द्वारे येतो
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
टिप्पण्या