डेली मन्ना
यहूदा च्या जीवनाकडून धडा- १
Wednesday, 23rd of October 2024
15
16
203
Categories :
भविष्यसूचक शब्द
शिष्यत्व
येथेअनेक मार्ग आहेत की शिक्षण घ्यावे. एक मार्ग की शिक्षण घ्यावे तो हा की दुसऱ्यांच्या जीवनाकडून शिकावे. आज, कोणत्याही आई-वडिलांना त्यांच्या लेकरांचे नाव यहूदा ठेवावयास आवडणार नाही (यहुद हो, पण यहूदा नाही) कारणत्यासाठी तेथे कारण आहे.
यहूदाइस्कर्योत हा येशूचा एक विश्वासू प्रेषित होता आणि तरीसुद्धा त्याने प्रभूला फसविले आणि विश्वासाला नाकारले. त्याच्या जीवनाच्या कथेने आपल्या हृदयांत एक शांतचित्त संबंध बिंबविले पाहिजे आणि आपल्याला व्यक्तिगत मननासाठी कारण दिले पाहिजे.
१. यहूदा ने बदलण्यास विरोध केला
यहूदा ला प्रभूने बोलाविले होते, तो त्याच्या मागे तीन वर्षे चालला, त्यास संदेश देताना आणि शिकविताना ऐकले ज्यानेह्या कालखंडात लाखो लोकांवर प्रभाव टाकला होता.
त्याने स्वयं पाहिले होते की येशू पाण्यावर चालला होता, वादळी समुद्राला शांत केले होते, हजारोंना पाच भाकरी आणि काही मास्यांच्या तुकड्यांनी पोट भरून भोजन दिले होते, लोकांना मृत्युमधून पुन्हा उठविले होते. केवळ एवढेच नाही, त्याने सुद्धा प्रभु कडून भूतांना काढण्याचे आणि आजारी लोकांना स्वस्थ करण्याचे सामर्थ्य प्राप्त केले होते (मत्तय १०: १). आणि प्रभूने त्यास सेवाकार्याची आर्थिक जबाबदारी सांभाळण्याचे कार्य सुद्धा सोपविले होते.
पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की जेव्हा प्रभूने त्याचे बारा शिष्य निवडले, त्याने भविष्यात्मक इशारा दिला होता. येशूने त्यांना उत्तर दिले, "तुम्हां बारा जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हांतील एक जण सैतान आहे. हे तो शिमोन इस्कर्योत ह्याचा मुलगा यहूदा ह्याच्याविषयी बोलला, कारण तो बारा जणांपैकी एक असून त्याला धरून देणार होता. (योहान ६: ७०-७१)
दु:खद भाग हा की यहूदा ने सैतान अशी सुरुवात केली आणि शेवट ही सैतान म्हणूनच केला. सुवार्ता आज ही आहे की, आपल्याला वाईट सुरुवात असू शकते परंतु आपल्याला गौरवी भविष्य असणार.
दु:खद, आहेकी यहूदा ने जेऐकले आणि पाहिले होते त्याने त्यास बदलले नाही. येथे आज सुद्धा असे अनेक लोक आहेत.
ते उपासनेला येतात, अनेक गोष्टी होताना पाहतात. ते पाहतात की नदी अगदी त्यांच्यासमोरून वाहत आहे परंतु ते त्यामध्ये कधी डुबकी लावत नाहीत. हे मला सांगते की हे केवळ पुरेसे नाही कीतेथे असावे जेथे येशू आहे. हे पुरेसे नाही की येशूच्या भोवती घुटमळावें. हे पुरेसे नाही की केवळ वचन ऐकावे.
बायबल हे म्हणत आपल्याला आज्ञा देत आहे:
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे; तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो, आणि आपण कसे होते हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्राच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यांत धन्यता मिळेल. (याकोब १: २२-२५)
जेव्हाकेव्हा तुम्ही उपासनेला जाता, याची खात्री करा कीतुमच्याकडे बायबल आहे (डिजिटल किंवा पुस्तकी काहीही चालेल). नोंद घ्या आणि संपूर्ण आठवडाभर त्यावर मनन करा.
याची निश्चिती करा की संदेशाला तुमच्या जीवनात आत्मसात कराल. जेव्हा तुम्ही असे करता, तुम्ही हे पाहाल की अडथळ्याच्या गोष्टी आणि गरिबीच्या पद्धती तुमच्या जीवनातून उखडून पडतील.
प्रार्थना
1. प्रभु, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या परमेश्वरा मी माझे विचार तुला समर्पित करतो. देवाच्या पवित्र आत्म्या, तुझ्या अंत:करणात काय आहे त्याने मला प्रेरणा दे.
2. पित्या, येशूच्या नांवात, सर्व प्रकारच्या गर्वा पासून मला मोकळे कर. मला तो मार्ग दाखव ज्याद्वारे मी गेले पाहिजे. तुझ्या ज्ञानाला माझे नेत्र आणि तुझ्या चांगल्या सल्ल्यासाठी माझे कान उघड!
2. पित्या, येशूच्या नांवात, सर्व प्रकारच्या गर्वा पासून मला मोकळे कर. मला तो मार्ग दाखव ज्याद्वारे मी गेले पाहिजे. तुझ्या ज्ञानाला माझे नेत्र आणि तुझ्या चांगल्या सल्ल्यासाठी माझे कान उघड!
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रीति साठी शोध● पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात्मक इतर दानास मिळविण्याचा मार्ग मिळवा
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे
● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● आध्यात्मिक दरवाजे बंद करणे
● याबेस ची प्रार्थना
● साधारण पात्रा द्वारे महान कार्य
टिप्पण्या