डेली मन्ना
प्रार्थनारहित जीवन जगण्याचे पाप
Saturday, 17th of August 2024
26
22
570
Categories :
प्रार्थना
काय तुम्ही कल्पना करू शकता काय कोणी तुमचाचांगला मित्र होण्याचा दावा करीत आहे आणि तुमच्यासोबत कधीही बोलत नाही? जी काही मित्रता होती ती निश्चितपणे निघून गेली आहे. त्याचप्रमाणे, देवाबरोबर संबंध हे संपर्का विना नष्ट होतात.
प्रार्थनारहित राहणे हे पाप आहे. आपल्याला ह्याविषयी प्रामाणिक असले पाहिजे. संदेष्टा शमुवेल ने हे स्पष्ट केले जेव्हा त्याने इस्राएल लोकांना हे आश्वासन दिले की तो त्यांच्यासाठी प्रार्थना करेल.
याहूनही अधिक, माझ्यासाठी, हे असे होऊ नये की मी तुम्हांसाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा प्रती अपराध घडू नये. (1 शमुवेल 12:23).
शमुवेल ने हे ओळखले की देवाच्या लोकांसाठी प्रार्थना न करण्याची चूक करणे हे देवा विरुद्ध पाप असे आहे. जर तुम्ही पास्टर, एका गटाचे नेते, जे-12 पुढारी आहात, तर मला तुम्हाला स्पष्टच सांगू दया, लोकांसाठी प्रार्थना करण्यात चुकणे ज्यांस देवाने तुम्हाला दिले आहे हे पाप आहे ज्याकडून तुम्हाला फिरावयाचे आहे.
जेव्हा पुढारी देवाच्या लोकांकरिता प्रार्थना करीत नाहीत तर आपणआत्म्याच्या स्तरात एक सुचना पाठवीत आहोत कीज्या लोकांचे आम्ही पुढारीपण करीत आहोत त्यांची काळजी करीत नाहीत. प्रभु येशूने अशा लोकांना, "मेंढपाळावाचून असलेली मेंढरे"असे पाहिले (मत्तय 9:36). परुशी लोक हे त्यांच्याच गोष्टींत पूर्णपणे व्यस्तहोते कीदेवाच्या लोकांचा खरेचविचार करावा.
प्रार्थना करण्यात चुकणे हे प्रभु साठी कमी प्रेम असण्याचे सूचक आहे. प्रार्थनारहित असणे हे सुचविते की जगिकता ही न जाणो केव्हा आपल्यात आली आहे.
मी हे नेहमी पाहिले आहे की स्वस्थता,सुटका आणि भविष्यात्मक सभा ह्या मोठया संख्येने जमावाला आकर्षितात कारण प्रत्येक जण स्वस्थता, सुटका आणि जीवनाविषयी भाकिते वगैरे यांची अपेक्षा करतात (यात काहीही चूक नाही).
तथापि, लोकांना मध्यस्थी करण्यास बोलवा आणि सामान्य भावना ही काहीतरी गमाविले आहे असे त्यांना वाटते.
काय मी तुम्हाला काही सांगू शकतो? जेव्हा प्रार्थनारहित असणे हे आमच्या जीवनात असते आपण एकमेकांवर प्रीति करण्यात चुकत आहोत याचे दोषी राहतो आणि हेच एकमेकांसाठी मध्यस्थी करण्यात कमी पडणे हे प्रकर्षाने दिसून येते.
मत्तय 26:41 मध्ये प्रभु येशूने आपल्याला चेतावणी दिली आहे, "जागृत राहा आणि प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडू नये." प्रार्थनारहित असणे हे परीक्षेच्या बाणास आपल्याला मारू देईल जे आपल्याला पापात खोल आणि खोलवर नेते.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करण्यात ज्यावेळी चुकलो आहे त्याची मला क्षमा कर.
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या जीवनात प्रार्थने विरुद्ध असणारे प्रत्येक अडथळे आणि प्रतिरोध हे उपटून टाकले जावोत.
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या जीवनात प्रार्थनारहित असण्याच्या आत्म्याला तुझ्या अग्नि द्वारे भस्म केले जावो.
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रत्येक सैतानी द्वार जे माझ्या प्रार्थनामय जीवनास अडथळा करण्यास उघडले गेले आहे ते येशूच्या रक्ता द्वारे बंद करतो.
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या जीवनात प्रार्थने विरुद्ध असणारे प्रत्येक अडथळे आणि प्रतिरोध हे उपटून टाकले जावोत.
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या जीवनात प्रार्थनारहित असण्याच्या आत्म्याला तुझ्या अग्नि द्वारे भस्म केले जावो.
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रत्येक सैतानी द्वार जे माझ्या प्रार्थनामय जीवनास अडथळा करण्यास उघडले गेले आहे ते येशूच्या रक्ता द्वारे बंद करतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका -२● वचनामध्ये ज्ञान
● तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
● तुमची प्रमाणता उंचवा
● मध्यस्थी करणाऱ्यांसाठी एक भविष्यात्मक संदेश
● एक आदर्श व्हा
● आजच्या वेळेत हे करा
टिप्पण्या