अनेक वेळेला, लोकांना काही निश्चित व्यक्ति त्यांच्यापुढे असतात, ज्यांच्याकडे ते आदर्श म्हणून पाहत असतात व त्यांच्यासारखे होण्याची इच्छा करतात, अशा व्यक्तींना आदर्श उदाहरण असे म्हणतात. ते पाळक, कामाच्या ठिकाणी बॉस, व्यवसायातील बलाढय व्यक्ति, राष्ट्रांचे राष्ट्रपती, विद्यानिष्ठ व्यक्ति, प्रसिद्ध कलाकार वगैरे., असू शकतात. तथापि, आपल्या ख्रिस्ती म्हणून चालण्यात, येथे कोणीतरी आहे ज्याकडे आपण अंतिमतः पाहतो-येशू ख्रिस्त, आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा. तो आपला सिद्ध आदर्श उदाहरण आहे. (इब्री १२:२)
हा आपला आदर्श, प्रभु येशू ख्रिस्त, हा प्रार्थना करणारा व्यक्ति होता जेव्हा तो येथे पृथ्वीवर होता जेथे आज आपण आहोत. त्याने आपल्या डोळ्यासमोर एक पद्धत ठेवली आहे ज्याचे आपल्याला अनुकरण करावयाचे आहे की देवा बरोबर निरंतर संपर्कात राहावे, प्रार्थने द्वारे. आणि ते प्रार्थने मध्ये संगती ठेवण्याद्वारे आहे.
आपण बायबल मध्ये अनेक प्रसंग पाहतो जेथे त्यास चांगला वेळ घालवायचा होता केवळ यासाठी की तो प्रार्थना करू शकेल. लूक ९:२८ मध्ये असा एक प्रसंग नोंदला आहे, "ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला." त्याप्रमाणेच आपण आणखी एक प्रसंग पाहतो, "त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला." (लूक ६:१२)
इतर वेळेला सुद्धा, येशूने जमावास शिकविल्यावर व प्रचार केल्यावर तो स्वतःला वेगळा करीत असे की देवाबरोबर बोलावे. हे सर्व एकत्रितपणे आपल्याला प्रगट करते की देवा बरोबर निरंतर, प्रार्थने द्वारे बोलल्यावाचून आपण राहू शकत नाही. हे अनिवार्य आहे.
खऱ्या अनुकरणात केवळ बाह्य आचरणाच्या पद्धतींचे अनुकरण करणेच सामाविलेले नाही परंतु त्या कार्या मागील हेतू ला प्रदर्शित करणे सुद्धा सामाविलेले आहे. येशूच्या प्रार्थनामय जीवनाचे अनुकरण करणे हे चांगले आहे कारण तो आपले सिद्ध उदाहरण आहे. तथापि, आपण केवळ अनुकरण करण्याच्या पलीकडे जायला पाहिजे आणि ते 'का' यावर विचार केला पाहिजे? जेव्हा आपण "येशूने प्रार्थना का केली" यावर विचार करतो, आपले अनुकरण करणे हे सातत्य, सामर्थ्य व चारित्र्य जे प्रभु येशूने त्याचे जीवन व सेवे द्वारे प्रदर्शित केले ते सुद्धा घेऊन चालेल. प्रभु येशूने प्रार्थना केली कारण तो पित्याला फारच प्रेम करीत होता.
प्रीतीच्या प्रेरणे शिवाय, आपले सर्व अनुकरण करणे हे केवळ एक गोंगाट होऊन जाईल. ते कदाचित पृथ्वीवरील पुरुष व स्त्रियांना प्रभावित करेल परंतु परमेश्वरा समोर ते केवळ एक गोंगाट असेल. (१ करिंथ १३:१)
प्रीति मध्ये दररोज प्रार्थना, उपासना, वचन व त्याच्या आज्ञा पाळण्या द्वारे परमेश्वरा बरोबर दररोज व्यक्तिगत संबंध असणे सामाविलेले आहे. जर येथे परमेश्वरा बरोबर व्यक्तिगत संबंध नसेल तर आपण कदाचित केवळ एक चांगली नक्कल करणारे कलाकार असेच होऊन जाऊ. परमेश्वराचे खरेच अनुकरण करण्यात त्याचे ओझे आपणांवर घेणे व दररोज त्याच्यापासून शिकणे सामाविलेले आहे. ह्याचवेळी आपण त्याच्या विश्रामात प्रवेश करतो. (मत्तय ११:२९)
मी तुम्हांला प्रोत्साहन देत आहे की आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे कृती व हेतू मध्ये अनुकरण करावे. जेव्हा तुम्ही असे करता, मी प्रार्थना करेन की परमेश्वर तुम्हाला अधिक आणि अधिक सामर्थ्यशाली करो.
प्रार्थना
पित्या, मी तुझ्या ऱ्हीमा शब्दासाठी तुझा धन्यवाद करतो. कृती व हेतू मध्ये प्रभु येशूचे अनुकरण करण्यास मला साहाय्य कर. परमेश्वरा मला समर्थ कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मोठी कार्ये● शेवटची घटका जिंकावी
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
● महान पुरुष आणि स्त्रिया का पतन पावतात - ६ (आपल्या विचारांना बंदी बनवने)
● बीभत्सपणा
● गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही
● सुवार्ता घेऊन जाणारे
टिप्पण्या