हे महत्वाचे आहे हे लक्षात घेणे की पवित्र शास्त्रात ज्या प्रीति विषयी म्हटले आहे ते मानसिक भावना नाही, हे मुख्यतः कृतीचे शब्द आहेत. हे केवळ भावना नाहीत जे तुम्हाला उचंबळून आणते. पवित्र शास्त्र स्पष्टपणे आपल्याला आज्ञा देते, "केवळ शब्द किंवा जिभेने प्रेम करू नका तर कृतीने व सत्याने प्रीति करा. (१ योहान ३:१८)
अनेक वेळेला आपण आपले मित्र निवडतो कारण ते आपल्याबरोबर योग्यपणे व्यवस्थित राहतात. त्यांच्याबरोबर राहणे सोपे होते आणि म्हणून त्यांचा आनंद घेण्यास इतके प्रयत्न लागत नाही. तेसोयीस्कर आहे. ते समाधानी आहे. परंतु खरी प्रीति ही इतरांवर दया करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांच्याविषयी विचार करणे यासंबंधी असते. हे समर्पणावर आधारलेले असते, सोयीस्कर आहे म्हणून नाही.
आपल्या निराश, पापमय जगात, येथे नेहमीच लोक असतील ज्यांच्याबरोबर राहणे आपल्याला कठीण होत असते, येथे नेहमीच लोक असतील ज्यांना प्रेम करणे कठीण असते. आपली स्वाभाविक वृत्ती ही दुसऱ्या मार्गाकडे पळावे, जितके शक्य होईल तितके त्यांना टाळावे.
देवाचे वचन हे म्हणत आपल्याला आवाहन करते, "जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति केली तर त्यांत तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणांवर प्रीति करणाऱ्यांवर प्रीति करतात. जे तुमचे बरे करितात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यांत तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करितात." (लूक ६:३२-३३)
कठीण लोकांना प्रीति करणे ज्यांना देवाने तुमच्या जीवनात ठेवले आहे,यासाठी तुम्हाला कृपेची गरज लागेल जे परमेश्वर तुम्हाला मुक्तपणे देतो.
रोम ५:५ म्हणते, "आशा लाजवीत नाही; कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंत;करणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे." जेव्हा आपण पवित्र आत्म्या बरोबर संगती करीत वेळ घालवितो, परमेश्वराचीप्रीति ही आपल्या आत्म्यात सखोल अशी दिली जाते. हे इतर कोणत्याही मार्गाद्वारे होऊ शकत नाही. ही कृपा आहे जी आपल्याला साहाय्य करेल की आपल्या सभोवतालच्या कठीण लोकांना प्रेम करावे.
जेव्हा आपण असे करतो परमेश्वराचा सन्मान होईल आणि आपली हृदये गहन समाधान प्राप्त करतील. हे निश्चितच उच्च प्रमाण आहे आणि तेच तर कारण आहे की ही जिंकण्याची योजना आहे.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, तुझा आत्मा माझ्यावर ओत. पवित्र आत्म्या ये, माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श कर. आमेन
कुटुंबाचे तारण
माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनात शांतीला अडथळा करणारी प्रत्येक शक्ती उपटून काढली जावो, येशूच्या नांवात. असे होवो की तुझी शांति माझ्या व माझ्या कुटुंबांच्या जीवनात राज्य करो.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मी आणि माझ्या कुटुंबाचे सदस्ये हे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असावे. जे सर्व काही आम्ही करू ते संपन्न होईल, देवाच्या गौरवाकरिता (स्तोत्र १:३). आम्ही खचणार नाही, कारण यथाकाळी आम्ही योग्य कापणी करू. (गलती ६:९)
केएसएम चर्च
पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, व संघ सदस्यांच्या जीवनात शांतीला अडथळा करणारी प्रत्येक शक्ती, येशूच्या नांवात उपटून काढली जावो. असे होवो की तुझी शांति त्यांच्या जीवनात राज्य करो.
देश
प्रभु येशू, तूं शांतीचा राजकुमार आहे. आमच्या देशाच्या सीमेवर शांति व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो की आमच्या देशाच्या प्रत्येक शहरात व राज्यात शांति राज्य करो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● तुमच्या नोकरी संबंधी एक रहस्य
● आदर व ओळख प्राप्त करा
● दिवस २१ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● जीवन हे रक्तात आहे
● वर्षाव
● २१ दिवस उपवासः दिवस १८
टिप्पण्या