होरेबापासून (सीनाय पर्वताचे आणखी एक नाव) सेईर डोंगराच्या मार्गे कादेशबर्ण्या (कनान सीमा; तरीसुद्धा इस्राएलला ते पार करण्यासाठी चाळीस वर्षे लागली) अकरा [केवळ] दिवसाच्या वाटेवर होते. (अनुवाद 1:2)
ही एक शोकांतिका आहे. हे काही प्रवासाचे अंतर नव्हते ज्याने त्यांच्या पोहचण्यास उशीर केला. तर प्रवासात असताना हा त्यांचा स्वभाव होता ज्याने पोहचण्यास उशीर केला. देवाच्या वचनाप्रती तुमचा व्यवहार हा तुमच्या जीवनात तुम्ही किती उंच भरारी मारता आणि किती लांबचा पल्ला गाठता ते निश्चित करेल.
वैचारिकता काय आहे?
देवाच्या वचनाप्रती आपला व्यवहार यास वैचारिकता असे म्हटले आहे. वैचारिकता हे विचार करण्याचा एक विशेष मार्ग आहे.
आपण वैचारिकता कशी विकसित करावी?
अनेक वेळेला, आपल्या भोवतालची संस्कृती, परिस्थिती ज्यातून आपण जातो, लोक ज्याबरोबर आपण संबंधात असतो ते आपल्या वैचारिकतेला वळण देतात. त्यामुळेच आपण जे करतो ते करतो. ह्यामुळेच आपण जसे वागतो तसे वागतो. जेव्हा इस्राएली लोक रानातून जात होते त्यांनी विकसित केला ज्यास आपण 'वनातील वैचारिकता' विकसित केली.
काही लोक हे अत्यंत ईश्वरीय, अत्यंत प्रार्थनाशील होते परंतु ज्याक्षणी ते एका विशेष कामाच्या ठिकाणी जाऊन मिळाले, काही नवीन देशात गेले, आणि मग ते त्यांचे देवाबरोबर चालण्याच्या वागणुकीत अकार्यक्षम झाले. संस्कृती किंवा देश ज्यात ते आहेत त्याची वैचारिकता ते आत्मसात करतात. त्याप्रमाणेच, इस्राएली लोकांनी, काहीतरी ज्यास आपण वनातील वैचारिकता म्हणतो ती आत्मसात केली.
यशस्वी होण्यासाठी आपल्या जीवनात देवाच्या पाचारणास पूर्ण करण्यासाठी, हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे की योग्य वैचारिकता असावी. हेच तर कारण आहे ज्यासाठी प्रेषित पौलाने रोमच्या चर्चला लिहिले:
"देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया." रोम 12:2
पवित्र आत्म्याने मला 3 सिद्धांत प्रकट केले जे आपल्याला साहाय्य करते की वनातील वैचारिकतेवर प्रभुत्व करावे.
जेव्हा आपण सीनाय पर्वतावर होतो, प्रभू जो आपला परमेश्वर त्याने आपल्याला सांगितले होते, 'तुम्ही डोंगरवटीत राहिल्याला बरेच दिवस झाले; तर आता येथून कूच करा, आणि अमोऱ्याच्या पहाडी प्रदेशात चला, म्हणजे अराबात, डोंगरवटीत, तळवटीत, नेगेबात व समुद्रतीरी असलेल्या कनान्याच्या देशात व लबानोनापर्यंत आणि फरात महानदीपर्यंत जा. हा देश पाहा, मी तुमच्यापुढे ठेवला आहे, म्हणून परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना व त्यांच्यामागून त्यांच्या वंशजांना जो देश शपथपूर्वक देऊ केला आहे, त्यात जाऊन तो वतन करून घ्या. (अनुवाद 1:6-8)
1. तुम्ही ह्या डोंगरावर खूप दिवस राहिला आहात.
आम्ही पुढे वाटचाल करण्याऐवजी त्याच डोंगरावर फेरा आणि फेरा घालत राहिलो. त्याच डोंगरावर फेरा आणि फेरा घालत राहणे हे म्हणण्याचा माझा काय अर्थ आहे?
एकाच ठिकाणी अडकून राहणे ज्याशी तुम्ही अतिशय समाधानी झाला आहात किंवा ते ठिकाण जे सोडण्यास तुम्हाला भय वाटते. याचा अर्थ हा एक निश्चित सवय, व्यसन किंवा सरळपणे एक वाईट जीवन जगणे सुद्धा होय.
अनेकांसाठी, कशावर तरी विजय मिळविण्यास अनेक वर्षे लागतात ज्यावर ताबडतोब तोडगा काढता आला असता किंवा त्यामागे सोडता आल्या असत्या किंवा तसे करावयास पाहिजे होते. हे एक सर्वात मुख्य कारण आहे ज्यामुळे काहींना एक नवीन वाटचाल सापडत नाही किंवा चमत्कार पाहत नाहीत जितक्या लवकर ते त्यांना मिळावयास पाहिजे होते. देव विश्वसनीय आहे आणि तो त्याच्या लेकरांकडून काहीही मागे राखून ठेवत नाही.
देव ज्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला राखून ठेवले नाही परंतु त्यांस आपल्या सर्वांसाठी देऊन टाकले, तो मग त्याबरोबर (येशू) आपल्याला आपल्या लाभासाठी सर्वकाही कसे देणार नाही? (रोम 8:32).
2. ही वेळ आहे की आपल्या डेऱ्याला मोडावे
देवाने इस्राएली लोकांना म्हटले की ही वेळ आहे की डेऱ्याला मोडावे. याचा अर्थ हा आहे की त्या चक्रीय पद्धती मोडाव्या, त्या दुष्ट पद्धती ज्यांनी इतकी वर्षे आणि महिने आपल्या सर्वांना बांधून ठेवले आहे.
याचा सरळ हा अर्थ आहे की तुमच्यासाठी ही वेळ आहे की डोंगरापासून वळल्याची काही चिन्हे दाखवावी. ही वेळ आहे कार्य करण्याची योजना विकसित करावी की जे तुम्ही करत आहात ते थांबवावे आणि जेथे तुम्हाला जायचे आहे त्याकडे अग्रेसर व्हावे.
यामध्ये उपास आणि प्रार्थना येऊ शकते की त्या पद्धती मोडाव्या. यामध्ये कोणा पुढाऱ्याप्रती स्वतःला जबाबदार धरावे हे येऊ शकते वगैरे. यामध्ये तुमच्या फोन वरील काही अप किंवा काही फोन नंबर काढून टाकणे हे येऊ शकते. काहीही करा परंतु त्या विनाशकारक पद्धती मोडा ज्या तुम्हाला निश्चल करतात.
3. जा आणि भूमीचा ताबा घ्या
याचा सरळ अर्थ हा आहे की तुम्हाला वचनावर कार्य करावयाचे आहे. तुम्हाला कदाचित काहीही अनुभव होणार नाही, तुम्हाला कदाचित काहीही दिसणार नाही परंतु केवळ वचना आधारित तुम्हाला पुढे जायचे आहे.
अनेक लोक हे निराश होतात जेव्हा ते देवाच्या मनुष्याकडून एक वैयक्तिक भविष्यात्मक वचन प्राप्त करीत नाहीत. तुम्हाला प्रत्यक्षात तसे करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही देवाच्या मनुष्याकडून प्रचार केलेले देवाचे वचन ऐकता, वचन स्वयं भविष्यात्मक आहे. वचनावर कार्य करा जे प्रत्येक उपासने वेळी प्रचार केले जाते जे तुम्ही ऐकता.
मी भविष्यवाणी विरोधात नाही (आणि ते तुम्हाला ठाऊक आहे). अनेक हे केवळ व्यक्तिगत भविष्यात्मक वचनासाठी वाट पाहतात आणि वचन प्राप्त केल्या नंतर, ते आणखी एका देवाच्या मनुष्याची वाट पाहत असतात की त्यांच्या जीवनावर काहीतरी बोलावे. ते खूप प्रवास करतात, पैसे खर्च करतात (आणि मी त्याच्या सुद्धा विरोधात नाही). परंतु चला मला तुम्हाला एक प्रश्न विचारू दया: जे पहिले वचन तुम्ही प्राप्त केले त्याबद्दल तुम्ही काय केले?
एक गोष्ट जी तुम्हाला आणि मला करणाची गरज आहे जेणेकरून आपण त्या भूमीचा ताबा घेऊ शकतो ते हे आहे की "आपले मन त्यावर स्थिर करावे आणि जे वरील (जे अत्युच्य आहे) आहे त्यावर स्थिर ठेवावे, आणि त्या गोष्टीवर नाही ज्या येथे पृथ्वीवर आहेत. (कलस्सै 3:2). ज्याप्रमाणे आपण आपले मन वरील गोष्टीवर लावतो ते देवाचे वचन वाचणे आणि त्यावर मनन करण्याने होते.
शेवटी, माझ्या मित्रानो चला मला तुम्हा सावधगिरीचा इशारा देऊ दया. मी ऐकले की पवित्र आत्म्याने म्हटले, "माझ्या लोकांना सांग", तुमच्या आश्वासित भूमीला गमावू नका.
वास्तवात, अनेक इस्राएली लोक ज्यांनी 11 व्या दिवशी प्रवासाला सुरुवात केली ते मरण पावले होते आणि ते 40 वर्षा नंतर नामशेष झाले. ते आश्वासित भूमी मध्ये जाऊ शकले नाही. माझ्यासाठी, ही अत्यंत दु:खाची बाब आहे जी कोणाच्या बाबतीत घडावी- की इतके उपलब्ध आहे परंतु त्याचा आनंद घेण्यास असमर्थ आहे.
मिसर मधून बाहेर येणे हेच केवळ पुरेसे नाही, तुम्हाला कनान देशात प्रवेश करावयाचा आहे. हे केवळ पुरेसे नाही की सुटका आणि स्वास्थ्य प्राप्त करावे परंतु तुम्हाला देवाच्या आश्वासनात व्हायचे आहे.
आपल्यापैकी काही हे वनातून जात आहेत. रान हे वाईट नाही. पण ते तुमचे अंतिम स्थान सुद्धा नाही.
अंगीकार
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
कारण मी ख्रिस्ता बरोबर पुनरुत्थित झालो आहे, त्यामुळे ज्या गोष्टी वरील आहेत त्यासाठी मी आस्थेने व तीव्रतेने शोध घेईन, जेथे ख्रिस्त हा देवाच्या उजव्या हाताकडे बसला आहे. मी हेतूपरस्पर माझे मन त्या गोष्टीकडे लावेन ज्या वरील आहेत आणि ह्या पृथ्वीवरील ज्या तात्पुरत्या गोष्टी आहेत त्याविषयी निकृष्ट वैचारिक-पातळीत अडकून राहणार नाही. येशूच्या नावात. आमेन.
कुटुंबाचे तारण
पित्या, कृपा करून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या पुढेजा व प्रत्येक उंचसखल मार्ग सरळ कर व प्रत्येकखडबडीत मार्ग सपाट कर.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या, जसे शिष्य गेले व साक्षी द्वारे परत आले की सर्व गोष्टी त्यांच्या अधीन झाल्या आहेत; मला सुद्धा यश व विजयाच्या साक्षी सह परत येऊ दे.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे उंचाविले व गौरविले जाईल.
देश
पित्या, येशूच्या नांवात,आणि येशूच्या रक्ता द्वारे, तुझा बदला दुष्टांच्या डेऱ्या मध्ये मोकळा कर आणि एक राष्ट्र म्हणून आमचे गमाविलेले गौरव पुनर्स्थापित कर. असे होवो की तुझी शांतिआमच्या देशावर राज्य करो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा● आपण वर घेतले जातील (रैप्चर) तयार आहात का?
● काठी ज्यास अंकुर आले
● एक घुंगरू व एक डाळिंब
● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण
● सात-पदरी आशीर्वाद
● पुढच्या स्तरावर जाणे
टिप्पण्या