कृपे ची सरळ व्याख्या ही परमेश्वर आपल्याला देत आहे ज्यास आपण पात्र नाही. आपण नरकाच्या शिक्षेस पात्र आहोत, परंतु परमेश्वराने त्याच्या पुत्राचे दान आपल्यावर कृपे द्वारे दिले आहे.
"कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे" (इफिस २:८). तारण, व देवाची क्षमा, हे मोफत दान आहे! आपण त्यास पात्र नाही.
जरी एकदा आपण देवाचे शत्रू होतो, कलस्सै १:२१-२२ नुसार, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे. त्यानेवधस्तंभावर वाहिलेल्या त्याच्या रक्ता द्वारे आपल्या विरोधातील शिक्षा व मृत्यूचे प्रमाण रद्द केले आहे.
एक दिवस, एक तरुण व्यक्ति माझ्याकडे आला व म्हणाला, "मला प्रभूची सेवा करण्यास आवडते परंतु त्या ठिकाणी जे लोक आहेत ते मला आवडत नाही, म्हणून मी "प्रभूची सेवा करण्याचे सोडले आहे." हीच गोष्ट संपूर्ण जगभरात अनेक ठिकाणी म्हटली जाते. कधी तुम्ही आश्चर्य केले आहे काय, लोक जे परमेश्वराला इतके प्रेम करतात ते त्यांचा शेवट अशा प्रकारे का करतात?
मी विश्वास ठेवतो की तीच कृपा इतरांना देण्यात अपयशी होणे या कारणासाठी, जी आपण प्रथम प्राप्त केली होती.
२ पेत्र१:२ म्हणते: "कृपा व शांती तुझ्यासाठी विपुल मिळो."
देवाच्या राज्यात काहीही विपुल होत नाही जोपर्यंत ते वाटले; दिले किंवा इतरांवर ओतले जात नाही. मग ते मासे व भाकरी असो जे प्रभु द्वारे वाटले गेले किंवा संदेष्टा अलीशा च्या वेळी तेल हे पात्रा मध्ये विधवे द्वारे ओतले गेले.
लूक ६:३८ हे एक सामान्य वचन आहे जे साधारणतः देण्यासाठी वापरतात.
दया म्हणजे तुम्हांस दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून व शींग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून दयाल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यांत येईल. तथापि, हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देता तेव्हाच ते विपुल होईल. तेच कृपे ला सुद्धा लागू आहे.
नियमशास्त्र सांगते, "एखादया मनुष्याला चोरून नेऊन कोणी त्याला विकील किंवा चोरलेला त्याच्यापाशी सापडेल तर त्याला अवश्य जिवे मारावे." (निर्गम २१:१६)
नियमशास्त्रानुसार, योसेफाचे भाऊ मृत्यूस पात्र होते कारण त्यांनी त्यास पकडले व त्यास मिसर मध्ये विकले परंतु योसेफाने त्यांस जीवन दिले.
मी ऐकले की आत्मा म्हणतो, "लोक ज्यांस पात्र आहेत ते त्यांस देऊ नका, त्यांना कशाची गरज आहे ते त्यांस दया." जर तुम्ही लोकांना ते ज्यांस पात्र आहेत ते दयाल, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन कार्य करीत आहात. परंतु जर तुम्ही लोकांना ते दयाल ज्याची त्यांना गरज आहे, तर तुम्ही कृपे द्वारे कार्य करीत आहात. नियमशास्त्रा मध्ये क्षमा नव्हती. येथे कृपे मध्ये क्षमा आहे.
प्रार्थना
पित्या, माझ्या जीवनावर तुझी कृपा येशूच्या नांवात मोकळी कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवदूत आपल्यासोबत राहतात● प्रेमाद्वारे प्रेरित व्हा
● जीवन हे रक्तात आहे
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
● देवदूताचे साहाय्य कसे सक्रीय करावे
● शहाणपणाची पारख होत आहे
● तुमच्या नियतीचा विनाश करू नका!
टिप्पण्या