या लॉकडाऊन दरम्यान, प्रार्थने नंतर, मी झोपण्यासाठी जाणारच होतो, तेव्हा मला फोन आला. तो एक माझा कार्यालयीन सदस्य होता, ज्याने ही बातमी सांगितली, "मुंबई मधील आपला एक चर्च सभासद पडला आणि मरण पावला आहे." मला सांगण्यात आले की ती आपल्या रविवारच्या वाव ह्या सभेला नियमित येत होती. मला ह्या भयानक बातमीने अत्यंत दु:ख झाले. मी ताबडतोब प्रार्थना करू लागलो आणि पवित्र शास्त्राचे हे वचन मला प्रकट झाले.
कारण सर्व मानवजाति गवतासारखी आहे;
आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे.
गवत वाळते व त्याचे फूल गळते. (1 पेत्र 1:24).
ज्या प्रत्येकाला तुम्ही आज पाहता, याची काही पर्वा नाही की ते किती सुंदर, देखणे, प्रतिभाशाली, प्रभावशाली आणि प्रसिद्ध असतील, ते एके दिवशी गवता सारखे वाळून जातील.
बायबल शरीराची तुलना गवता बरोबर का करीत आहे?
गवत हे एक सर्वात कमकुवत रोप आहे आणि ते लहानसा दबाव ज्यात जराशी हवा सुद्धा येते त्याने ते वाकू शकते. हे मानवप्राण्याच्या अशक्तपणाचे वर्णन करते.
फार पूर्वी, ईयोबाने विचारले, "मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?" (ईयोब 14:14).
येथे काही आशा आहे काय?
येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये, आपल्याकडे ईयोबाच्या प्रश्नाला उत्तर आहे जे अनेकांनी विचारले आहे. बायबल सांगते की कारण येशू जिवंत आहे, तुम्हीही जिवंत राहाल. सर्वांत मोठे सत्य हे आहे की येशू ख्रिस्त मरण पावला परंतु पुन्हा पुनरुत्थित झाला आणि तुम्ही आणि मी सुद्धा मरण पावणार परंतु आपण जीवनाच्या नाविन्यात पुन्हा जिवंत होऊ.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याची स्तुती होवो! त्याच्या महान कृपे मध्ये त्याने मृत्युपासून येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आपल्याला नवीन जन्म दिला आहे."
कुटुंबाचे तारण
पित्या,येशूच्या नांवात,माझ्या कुटुंबाच्या सदस्यांचे डोळे उघड की तुला प्रभु, परमेश्वर व तारणारा असे ओळखावे. त्यांना अंधारातून प्रकाशाकडे वळीव.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या,येशूच्या नांवात, माझ्या हाताच्या कार्याला संपन्न कर. संपन्न होण्याचा अभिषेक माझ्या जीवनावर उतरो.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे स्वास्थ्य, सुटका व चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे राष्ट्रांमध्येउंचाविले व गौरविले जाईल.
पित्या, येशूच्या नांवात, मीकेएसएम च्या प्रत्येक मध्यस्थी करणाऱ्यास येशूच्या रक्ता द्वारे आच्छादित करतो. अधिक मध्यस्थी करणारे निर्माण कर.
देश
पित्या, येशूच्या नांवात,मी प्रार्थना करतो कीभारत देशातील प्रत्येक गाव,शहर, वराज्यातील लोक तुझ्याकडे वळोत. त्यांनीत्यांच्या पापांचा पश्चाताप करावा आणि येशू ख्रिस्ताला त्यांचा प्रभु, परमेश्वर व तारणारा म्हणून स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ईश्वरीय शिस्तबद्धतेचे स्वरूप-१● ते लहान तारणारे आहेत
● २१ दिवस उपवासः दिवस ०४
● बदलण्याची वेळ
● अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● परमेश्वर पुरवठा करेल
टिप्पण्या