शास्त्यांच्या अमदानीत देशात दुष्काळ पडला होता(रुथ १:१)
परमेश्वराने इस्राएल लोकांना विशेषतः आश्वासन दिले होते की तेथे आश्वासित भूमी मध्ये विपुलता असेन जर ते त्याच्या आज्ञापालन करीत राहतील. त्यामुळे भूमी मध्ये दुष्काळ याचा अर्थ, इस्राएल, एक राष्ट्र असे, देवाची आज्ञा पाळत नव्हते. (अनुवाद ११: १३-१७)
आणि म्हणून अलीमलेख त्याची पत्नी नामी आणि कुटुंब हे मवाब देशातराहावयास गेले. तथापि, जेव्हा नामी ने सुवार्ता ऐकली की परमेश्वराने त्याच्या लोकांची भेट घेतली आहे आणि त्यांस अन्न पुरविले आहे, तिने मवाब (शापित भूमी)मधून बेथलेहेम ला जाण्याचा निर्णय घेतला.
बेथलेहेम याचा अरबी मध्ये अर्थ "मांसाचे घर"
बेथलेहेम याचा इब्री मध्ये अर्थ "भाकरीचे घर"
योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्यास सांगितले. तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना. मग योसेफाने त्यांस सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले; आणि त्यांचा बाप याकोब याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठविलेल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जिवात जीव आला. (उत्पत्ति ४५:२६-२७)
जेव्हा याकोबाच्या पुत्रांनी त्यास हे सांगितले की त्यांचा(मुलगा) योसेफ हा जिवंत आहे आणि संपूर्ण मिसर देशावर राज्यपाल आहे, जे त्याने ऐकले त्यावर त्याचा विश्वास बसला नाही. ते इतके चांगले होते की ते सत्य असावे. तथापि, जेव्हा त्यांनी त्यांस हे सांगितले,
योसेफाचे शब्द
आणि योसेफाने पाठविलेल्या गाड्या ज्या उत्तम पदार्थांनी भरलेल्या होत्या त्या याकोबाने पाहिल्या
त्याने त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला
त्याचप्रमाणे जेव्हा आपण सुवार्ता (चांगली वार्ता) यहूदी आणि विधर्मी लोकांना घोषित करतो आपण एक संदेश दिला पाहिजे जो त्यांच्यासाठी अगदी वैयक्तिक असला पाहिजे आणि ज्याने त्यांच्याबरोबर बोलले पाहिजे. तसेच, त्यांनी आशीर्वाद पाहावा आणि तो अनुभवावा. हे मग तेव्हाच त्यांची कष्टी अंत:करणे ही संजीवित होतील. तेच सुवार्तेचे सामर्थ्य आहे.
तुम्ही कोणत्या वार्ता सतत ऐकत आहात?
जर कोणी तुमच्याकडे येऊन हे म्हणत आहे, "मला तुम्हाला सांगावयाचे आहे ह्याने तुमच्याविषयी काय म्हटले आहे. केवळ हेच बोला तुमचा धन्यवाद हो, मी नंतर ह्याविषयी बोलेन."
जर तुम्हाला हीच इच्छा असेन की त्याने काय म्हटले आहे तेच ऐकत राहावे आणि जे तुमच्याविषयी म्हटले आहे, याचा अर्थ तुमच्यात असुरक्षितेची भावना आहे. तुम्हाला ख्रिस्ता मधील तुमच्या ओळखी मध्ये सुरक्षित होण्याची गरज आहे. अशा लोकांपासून किंवा वाईट बातमी जे तुम्हाला देतात त्यापासून दूर राहा जेकेवळ तुम्हाला वाईट आणि निराश करते.
दुसरे, तुमच्या मुखातून जे शब्द बाहेर येतात?
तुमच्या स्वतःला हे विचारा, की शब्द जे मी आता बोलणार आहे, काय ते संबंध बनविणार आहेत किंवा नष्ट करणार आहेत. जर तुम्ही तुमच्या शब्दात निष्काळजी असाल, तर ते स्पष्टपणे परिपक्वतेच्या अभावास दाखविते. बायबल स्पष्टपणे सांगते की मृत्यू आणि जीवन हे जिभेच्या हाती आहे (नीतिसूत्रे १८:२१). निंदा करणारे होऊ नका.
निर्णय घ्या आणि सतत पापकबुली करीत राहा, "मी चांगली सुवार्ता घेऊन जाणारा आहे." शब्द जे मी बोलणार आहे त्याने लोकांना प्रेरणा मिळेल आणि ते त्यांना कमी लेखणार नाही. माझी जीभ ही जीवन-देणारी विहीर आहे."
लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही चांगली वार्ता आहे आणि तुम्हाला ह्या सुवार्तेला संपूर्ण जगभर पसरविण्यास बोलाविण्यात आले आहे. जे काही मी तुम्हाला सांगितले आहे जर तुम्ही त्यानुसार चालाल, तर परमेश्वर तुमचा उपयोग करेन की राष्ट्राला आशीर्वादित करावे.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
मी माझ्या मुखातून कोणतेही कसलेच कुजके भाषण निघू देत नाही परंतु गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठीकी, तेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. (इफिस ४:२९)
कुटुंबाचे तारण
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)
आर्थिकतेचा नवीन मार्ग
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील (फिलिप्पै ४:१९). मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तूं तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देतो की आमच्या मार्गामध्ये आम्हांला सुरक्षित ठेवावे आणि आम्हांला मार्गदर्शन करावे. पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्यांसाठी तुझे पवित्र दिव्यदूत पाठिव, येशूच्या नांवात. त्यांच्या विरोधातील अंधाऱ्या शक्तीचे प्रत्येक कार्य नष्ट कर.
देश
पित्या, असे होवो की तुझी शांती व धार्मिकतेने आमच्या देशाला भरून टाकावे. आमच्या देशाच्या विरोधातील अंधार व विनाशकारी सर्व शक्ती ह्या नष्ट केल्या जावोत. असे होवो की आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात प्रभु येशूचे शुभवर्तमान हे पसरवो. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे हृद्य तपासा● सार्वकालिक निवेश
● देवाच्या मंदिरातील स्तंभ
● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात
● दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – २
● युद्धासाठी प्रशिक्षण - २
टिप्पण्या