मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन; आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशयित सुपीक शृंगावर होता.
तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकिले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली, आणि त्यांत एक बुरुज बांधिला व द्राक्षकुंड खोदिले; मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, तो त्याने रानद्राक्षे दिली. (यशया ५:१-२)
इस्राएल हा देवाचा द्राक्षमळा आहे. चर्च हे देवाचा द्राक्षमळा आहे. देवाच्या लागवड करण्याचा परिणाम हा फलदायकपणा असला पाहिजे. येथे दोन गोष्टी आहेत जे मला पाहिजे की तुम्ही लक्षात घ्याव्यात.
१. परमेश्वर त्याच्या द्राक्षमळ्याभोवती कुंपण घालतो.
२. तो त्याच्या मध्ये बुरुज ठेवतो.
कुंपण व बुरुज का?
कुंपण व बुरुज हे आवश्यक आहे की शत्रूला बाहेरच ठेवावे.
तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे: ह्यांत हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ दयावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नांवाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला दयावे. (योहान १५:१६)
आपल्याला केवळ फळ आणण्यासाठी दीक्षित केले गेलेले नाही परंतु फळ हे कायम सुद्धा राहावे. फळ उत्पन्न करण्यात काय चांगले आहे जर फळ हे कायम राहत नाही.
चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. (योहान १०:१०)
शत्रूला पाहिजे की कुटुंबे, घराणे, चर्च सेवाकार्य व संस्थांचे फळ हे नष्ट करावे.
कुंपणा शिवाय द्राक्षमळा लावणे हे ज्ञानीपण नाही.
द्राक्षमळ्यासाठी कुंपण एक आडोसा पुरविते. बुरुज हे पहारेकऱ्यासाठी स्थान आहे. द्राक्षमळ्यासाठी पहारेकऱ्याची गरज लागते. स्थानिक चर्च ला बुरुज व पहारेकऱ्याची गरज आहे की द्राक्षमळ्यास संरक्षण दयावे. संस्थांना पहारेकऱ्याची गरज आहे.
परमेश्वर मला म्हणाला, जा एक टेहळणारा ठेव, त्याच्या नजरेस पडेल ते त्याने कळवावे. (यशया २१:६)
पहारेकरी हे भविष्यात्मक मध्यस्थी करणारे आहेत. आता तुम्ही पाहा, मध्यस्थी करणे हे का इतके महत्वाचे आहे.
इज्रेल येथील बुरुजावर पहारेकरी उभा होता. त्याने येहू येत होता त्याची टोळी पाहिली; तेव्हा त्याने कळविले की मला एक टोळी दिसत आहे. तेव्हा योराम म्हणाला, एक स्वार पाहून त्याजकडे पाठिव, त्याला सांग की सर्व काही ठीक आहे न, असे त्याला विचार. (२ राजे ९:१७)
एक पहारेकरी हा तो आहे जो पहारा देत आहे. प्राचीन शहरांच्या भिंतीवर पहारेकरी पहारा देत उभे राहत असत. एक पहारेकरी केवळ पाहणे किंवा निरीक्षण करणे किंवा ऐकत नसे.
पहारेकरी रणशिंग फुंकत असे. ही त्यांची जबाबदारी होती.
शत्रू वेशबदलून येत असे, परंतु एक आध्यात्मिक पहारेकरी जागरूक असत आणि ते रणशिंग फुंकत असे आणि आवाज देत असे म्हणजे कुटुंबातील सदस्यांना इशारा मिळेल व त्यांचा नाश होणार नाही.
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, तूं आपल्या बांधवांबरोबर बोल. त्यांस सांग की, मी देशावर तरवार आणीन तेव्हा जर देशांतल्या लोकांनी आपणांपैकी एकास निवडून पहारेकरी नेमिले, देशावर तरवार येत आहे असे पाहून शिंग फुंकून त्याने लोकांस सावध केले आणि त्या शिंगांचा शब्द ऐकून कोणी सावध झाला नाही म्हणून तरवारीने येऊन त्याला नेले, तर त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील. शिंगांचा शब्द ऐकून तो सावध झाला नाही म्हणून त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील; तो सावध झाला असता तर त्याने आपला जीव वाचविला असता; पण जर पहारेकऱ्याने तरवार येतांना पाहून शिंग वाजविले नाही व लोकांस सावध केले नाही आणि तरवारीने येऊन त्यापैंकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल, तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकऱ्याजवळ मागेन. (यहेज्केल ३३:१-६)
येथे दोन पहारेकऱ्यांचे वर्णन केले आहे
१. परिश्रमी पहारेकरी
२. बेपर्वा पहारेकरी
परमेश्वर पहारेकऱ्यांस जबाबदार धरेल.
द्राक्षमळे व शेतांस सुद्धा पहारेकरी असत, विशेषतः पीक उत्पन्नाच्या वेळी. त्यांची जबाबदारी ही प्राणी व चोरांपासून पिकांचे रक्षण करावे.
त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुशलेमेबरोबर लढू व तेथे धांदल उडवून देऊ; पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्याच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेविली. (नहेम्या ४:८-९)
नहेम्याचे शत्रू हे यरुशलेमेची भिंत बांधण्यासाठी अडथळा करण्यास आले. नहेम्या हा प्रेषितीय सेवाकार्याचे प्रतिबिंब आहे. प्रेषित हे बांधणारे आहेत. बांधण्यास विरोध करणे, वाढीला विरोध करणे, हे अपेक्षित आहे. योजना ही आहे की शत्रूवर प्रभुत्व करण्यास त्यांच्या विरोधात रात्रंदिवस पहारेकरी ठेवावे. चर्च च्या वाढीसाठी प्रेषित व संदेष्ट्यांनी एकत्र कार्य करावे. प्रेषितांना संदेष्ट्यांची गरज आहे जे त्यांना वाढीसाठी साहाय्य करतील.
...बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराचा पहारा करावा. (२ इतिहास २३:६)
पहारा करण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या प्रार्थनामय जीवनात एक अध्यात्मिक पहारेकरी होण्यासाठी बोलाविले गेले आहे. तो कदाचित तुमच्या घराच्या भिंतीवर पहारेकरी असेल किंवा तुमचे चर्च किंवा तुमच्या शहराच्या भिंतीवर, किंवा परमेश्वर कदाचित तुम्हांवर सोपवेल की तुमच्या राष्ट्राच्या भिंतीवर एक आध्यात्मिक पहारेकरी असे व्हावे.
प्रभु येशूने एक पहारेकरी असण्याविषयी म्हटले आहे
सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. (मार्क १३:३३)
कदाचित तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पहारेकरी होण्यासाठी बोलाविले असेल. आईंनो तुम्हाला तुमची लेकरेबाळे व तुमच्या जोडीदाराचा पहारेकरी होण्यासाठी बोलाविले गेले आहे.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरीता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, आम्हांला साहाय्य कर, की एक आध्यात्मिक पहारेकरी असे आमची जबाबदारी आनंदाने ग्रहण करावी. आमच्या अंत:करणात तुझी अगापे प्रीति मोकळी कर म्हणजे तो आनंद होईल, एक ओझे असे नाही.
आमचे आध्यात्मिक डोळे उघड आणि आम्हांला पारख व बुद्धि प्रदान कर आणि आम्हांला समर्थ कर की लक्ष दयावे व प्रार्थना करावी आणि जागरूक व तयार राहावे.
कुटुंबाचे तारण
मी कबूल करतो की मी आणि माझे घराणे तर तुझी सेवा करणार.
आर्थिक प्रगती
मी परमेश्वराच्या वचनांमध्ये हर्षित होतो; त्यामुळे मी आशीर्वादित आहे. संपत्ती आणि धन माझ्या घरात राहतील, आणि माझे नीतिमत्व सर्वकाळ टिकते. (स्तोत्र ११२:१-३)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्ति जो केएसएम चर्चबरोबर जुळलेला आहे त्याची वचन आणि प्रार्थनेमध्ये वाढ व्हावी. त्यांना तुझ्या आत्म्याचा नव्याने अभिषेक होऊ दे.
राष्ट्र
पित्या, भारतातील प्रत्येक शहरात आणि राज्यात तुझ्या आत्म्याने आणि बुद्धीने भरलेले पुढारी निर्माण कर.
पित्या, तुझा आत्मा भारतातील प्रत्येक शहर आणि राज्यावर वाहू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे● प्रभू येशू द्वारे कृपा
● प्रीति-जिंकण्याची योजना -१
● देवदूत आपल्यासोबत राहतात
● चांगले हे उत्तमतेचे शत्रू आहे
● ख्रिस्तासाठी राजदूत
● आध्यात्मिक अभिमानाचा सापळा
टिप्पण्या