डेली मन्ना
देवाच्या वाणीवर विश्वास ठेवण्याचे सामर्थ्य
Monday, 23rd of October 2023
23
15
1046
Categories :
आज्ञाधारकपणा
निवडी
“आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री. ११:६)
देवासोबतच्या आपल्या प्रवासात, काही क्षण येतात जेव्हा त्याची वाणी आपल्या अंत:करणात स्पष्टपणे प्रतिध्वनित होते, ती आपल्याला विश्वासात पुढे पाऊल ठेवण्यास सांगते. तथापि, हा मानवी स्वभाव आहे की कधीकधी संकोच करावा, प्रश्न विचारावे, आणि माहिती मागावी. एखादा आश्चर्य करू शकतो, “जर आपल्याला खरेच माहित आहे की देव आपल्याला मार्गदर्शन करत आहे, तर आपण ताबडतोब ‘होय’ असे उत्तर का देत नाही?
इस्राएली लोक मिसर देशातून निघण्याच्या दरम्यान, देवाच्या चमत्कारांचे प्रथम साक्षीदार झाले होते-तांबडा समुद्र दुभागणे ते अरण्यात मान्ना पुरविण्यापर्यंत. तरीही त्यांनी अनेकदा त्याच्या योजनांबद्दल कुरूकुर केली, प्रश्न विचारले आणि शंका घेतली होती. त्यांचा प्रवास आपल्या स्वतःच्या हृदयाचा संघर्ष प्रतिबिंबित करतो.
“तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर.” (अनुवाद ८:२)
आपला संकोच बहुतेक वेळा अज्ञात भीती, भूतकाळातील निराशा किंवा आपल्या मानवी मर्यादांच्या भारामुळे उद्भवतो. परंतु देव, त्याच्या असीमित ज्ञानामध्ये, आपला कमकुवतपणा समजतो. “कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो” (स्तोत्र. १०३:१४). पुष्टी हवी म्हणून तो आमचा निषेध करत नाही, परंतु तो आपल्याला अवश्य विश्वासात वाढण्यास सांगतो.
या संदर्भात गिदोनाची कथा ज्ञानवर्धक आहे. जेव्हा देवाचा देवदूत गिदोनाला प्रकट झाला आणि त्याला सांगितले की तो इस्राएली लोकांची मिद्यानी लोकांपासून सुटका करेल, गिदोनाने लोकर वापरून, एक वेळ नाही तर अनेकदा पुष्टीकरण मागितले (शास्ते ६:३६-४०). गिदोनाच्या विनंत्या विश्वासाचा अभाव म्हणून विचार करणे सोपे असले तरी, ही एक प्रामाणिक इच्छा म्हणून आपण पाहू शकतो की तो देवाच्या इच्छेचे अनुसरण करत होता.
हे आपल्याला जे शिकवते ते गहन आहे: आपल्या पुष्टीकरणाच्या शोधात देव आपल्यासोबत संयमी राहतो. ज्यावेळेस तो आपल्या पूर्ण विश्वासाची इच्छा करतो, त्याचवेळेस आपल्या पुन्हा खातरीची आपली गरज तो समजतो.
“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५-६)
परंतु येथे त्याहूनही अधिक गहन शिकवण आहे. प्रत्येकवेळी संकोचाशिवाय जेव्हा आपण “होय” म्हणतो, प्रत्येकवेळी पूर्ण चित्र पाहिल्यावाचून आपण विश्वास ठेवतो , तेव्हा आपण केवळ आपला विश्वास मजबूत करत नाही, परंतु देवाच्या अंत:करणाच्या जवळ देखील जातो. विश्वासात सहकार्य एका नातेसंबंधाला मजबूत करते, आणि हे आपल्या स्वर्गीय पित्याबरोबरच्या नातेसंबंधापासून काही वेगळे नाही.
विश्वासणारे म्हणून, आपल्या विश्वासात परिपक्व होण्याचे आपले ध्येय असले पाहिजे, त्या अवस्थेत पोहचावे जेथे देवाच्या पाचारणाला आपले उत्तर अढळ ‘होय’ असावे. जर तुम्ही आज, स्वतःला संकोच करताना पाहता, तर असंख्य वेळा देव तुमच्यासाठी आला आहे याची आठवण करा. त्याने त्याचा विश्वासूपणा दाखवला त्या क्षणांवर चिंतन करा, त्यावेळी जेव्हा त्याने तुमच्या पावलांना मार्गदर्शन केले, आणि त्या प्रसंगांवर जेव्हा त्याने तुमच्या शोकाला आनंदात बदलले आहे.
ह्या आठवणी तुमच्या विश्वासाला बळकटी आणू देवोत. आणि जेव्हा देव बोलतो, तेव्हा तुमचे हृदय “मी आहे, प्रभू, मला पाठव” म्हणण्यास तयार असावे.
प्रार्थना
पित्या, तुजवर आमचा विश्वास मजबूत कर. ज्या प्रत्येकवेळी तू बोलावतो, तेव्हा आमचे अंत:करण आत्मविश्वासाने “होय’ असे प्रतिध्वनीत होऊ दे, हे जाणून की तू नेहमीच विश्वसनीय आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा● देव पुरस्कार देणारा आहे
● तुमच्या मनाला धैर्य दया
● स्तुति वृद्धि करते
● लोक बहाणे करण्याची कारणे- भाग १
● मान्ना, पाट्या आणि काठी
● सार्वकालिकता मनात ठेवून जगणे
टिप्पण्या