त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडीली. (२ राजे २२:११)
देवाचे लोक हे देवापासून फार दूर होऊन मूर्तीपूजेकडे वळले आहेत. देवाच्या मंदिराकडे (देवाच्या घराकडे)दुर्लक्ष केले गेले आहे. अशाआध्यात्मिक अंधाऱ्या क्षणी, देवाने एक तरुण राजा योशीया ला उभे केले.
वरील वचनाचा संदर्भ हा मुख्य याजक हिल्कीयाला मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ मिळतो जेव्हा तो मंदिराची दुरुस्ती करीत असतो. तो ते नियमशास्त्राचे पुस्तक (देवाचे लिहिलेले वचन)राजा योशिया कडे आणतो. जेव्हा योशिया देवाचे वचन ऐकतो तेव्हा तो स्वतःला अपराधी मानतो व पश्चाताप झाल्याचे चिन्ह म्हणून आपली वस्त्रे फाडतो.
त्याप्रमाणे, जेव्हा तुम्ही देवाचे वचन ऐकता, तेव्हा तुमच्या कडून देवाच्या वचनाला प्रतिसाद असला पाहिजे. तुम्ही केवळ वचन ऐकणारे व काहीही न करणारे होऊ शकत नाही. हे केवळ पुरेसे नाही असे म्हणणे, "मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो" तुम्हांला त्यावर कार्य करण्याची गरज आहे. पवित्र शास्त्र सांगते, "भुते सुद्धा विश्वास ठेवतात व थरथर कापतात" (याकोब २:२०), पण ते त्यांच्या विश्वासा नुसार कार्य करीत नाहीत.
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. (याकोब १:२२)
जेव्हाव्यक्ति केवळ वचन ऐकतो आणि काहीही करीत नाही, असाव्यक्ति स्वतःला फसवणुकीसाठी उघडा करतो.
फसवणूक ही या शेवटच्या क्षणात आज सर्वात मोठा धोका आहे. जो कोणी फसवणुकी बद्दल त्याच्या हताशपणाचा नकार करतो तो अगोदरच फसविला गेला आहे. फसवणूक हे ते ऐकण्यास मागते जे तुम्हाला ऐकावयास पाहिजे असते.
अहाब हा एक दुष्ट राजा होता ज्याच्या बरोबर संदेष्ट्ये होते जे ते संदेश देत असत जे त्यास ऐकावयास आवडत असे.
इस्राएलाच्या(अहाब) राजाने सुमारे चारशे संदेष्ट्ये (खोटे) जमवून त्यांस विचारिले, मी रामोथ-गिलादावर चढाई करून जाऊ किंवा नको? त्यांनी उत्तर दिले, चढाई करून जा; प्रभु ते महाराजांच्या हाती देईल. (१ राजे २२:६)
त्यास मनापासून माहीत होते की ते काय सांगत आहे ते खरे नाही परंतु तरीही त्याने त्या खोटया सांगण्यावर विश्वास ठेवला कारण तो अगोदरच फसविला गेला होता. त्याने अनेक वेळा देवाचे सत्य वचन ऐकले होते, परंतु तो फक्त ऐकत राहिला आणि त्याविषयी त्याने काहीही केले नाही. दुसरे अहाब होऊ नका.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी आदेश देतो की, तुझी कृपा व ज्ञाना द्वारे, मी, माझ्या कुटुंबाचे सदस्य, माझे चर्च व ते सर्व ज्यांच्याविषयी मला काळजी आहे त्यांना तुझ्या विषयी चांगले शिकविले जावो. मी यासाठी तुला धन्यवाद देतो.
पित्या, येशूच्या नांवात, आम्हाला पारख दे की पवित्र व अपवित्र, स्वच्छ व अस्वच्छ आणि सत्य व असत्य यामधील फरक ओळखावा.
पित्या, मला समर्थ कर की नेहमी तुझे वचन पाळणारे व्हावे, केवळ ऐकणारे नाही. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
पित्या तुझी दया प्रदिवशी नवीन आहे यासाठी तुझा धन्यवाद. खरोखर आमच्या आयुष्याच्या सर्व दिवस माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर तुझा चांगुलपणा व तुझी दया सतत राहिल आणि मी परमेश्वराच्या उपस्थितीत सतत निवास करेन. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मला माझ्या प्रभु येशूची कृपा ठाऊक आहे; तो धनवान असता माझ्याकरिता दरिद्री झाला; अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने मी आणि माझ्या कुटुंबाचे सदस्ये त्याच्या राज्याकरिता धनवान व्हावीत. (२ करिंथ ८:९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, व त्यांच्या संघातील सर्व सदस्ये चांगल्या स्वास्थ्य मध्ये राहावीत. असे होवो की तुझी शांति त्यांच्या जीवनात व त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाला घेरून राहो. असे होवो की करुणा सदन सेवाकार्ये प्रत्येक भागामध्ये वाढत जावो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १७ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे● पैसे कशा साठी नाही
● परमेश्वरा सोबत चालणे
● किंमत मोजणे
● परमेश्वरा जवळ या
● कर्जामधून बाहेर या: किल्ली# १
● युद्धासाठी प्रशिक्षण-१
टिप्पण्या