ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धीमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. (म्हणजे तो त्याचे जीवनमान योग्यरीत्या पुढे नेऊ शकतो) नीतिसूत्रे 1:5
ज्ञानी ऐकतील आणि त्यांच्या ज्ञानात वाढतील. दुसऱ्या शब्दात, एक ज्ञानी व्यक्ति ऐकण्याद्वारे ज्ञानी होतो. मुद्दा हा सरळ आहे: ज्ञानी लोक अधिकबोलण्यापेक्षा ते ऐकतात.
ज्ञाना मध्ये वाढण्याचा एक मार्ग हा की ज्ञानी पासून त्यांच्या संदेशाला ऐकून, त्यांची पुस्तके वाचून, शिकावे. ज्ञाना साठी सर्वात चांगले पुस्तक वाचणे हे नीतिसूत्रे आहे. नीतिसूत्रे पुस्तकात 31 अध्याय आहेत आणि तुम्ही संबंधित दिवसाच्या तारखेनुसार तो अध्याय वाचू शकता. उदाहरणार्थ, जर आज 4 तारीख आहे, मग तुम्ही नीतिसूत्रे चा ४था अध्याय वाचू शकता, आणि त्याप्रमाणे.
जसे तुम्ही प्रत्येक अध्याय वाचता, तुम्ही ते तुमच्या आंतरिक मनुष्यास बोलू दयावे असे ऐकले पाहिजे. असे तुम्ही नियमितपणे करण्याने तुम्ही केवळ ज्ञानी होत राहाल.
दुसरा मार्ग देवाचे ज्ञान प्राप्त करावे तो हा आहे कीजेव्हातुम्ही प्रार्थना करता तेव्हा प्रभूचे ऐकावे. अनेक लोक प्रार्थनेला एकतर्फी संवाद असे समजतात. बोलणे हे सरळ शब्दात, ते केवळ त्यांच्या हृदयातील गोष्टी बोलतात, प्रभूला त्यांना काय सांगावयाचे आहे ते ऐकण्यास वाट पाहत नाहीत. तो निश्चितच बोलेन.
ज्ञान हे काना द्वारे प्राप्त केले जाते, मुखा द्वारे नाही. तुम्हाला दोन कानआहेत पण केवळ एक तोंड. दुसऱ्या शब्दात, कोणी ऐकण्यास तत्पर आणि बोलावयास धीमा असावे. (याकोब 1:19)
प्रतिदिवशी देवाकडून ऐकण्याचा सराव करा आणि तुम्ही तुमच्या जीवनात विलक्षण बदल पाहाल.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मला ऐकणारे कान व मानणारे हृद्य दे. माझे कान ज्ञानासाठी लक्ष देणारे कर आणि माझ्या हृदयाला समजकडे वळीव. आमेन.
कौटुंबिक तारण
मी माझ्या संपूर्ण अंत:करणाने विश्वास ठेवतो व कबूल करतो, मी व माझे घराणे तर परमेश्वराचीच उपासना करणार. माझ्या येणाऱ्या दोन पिढ्या सुद्धा परमेश्वरचीच उपासना करतील. येशूच्या नांवात.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
हेपित्या, मला आवश्यक व्यवसाय व मानसीक कौशल्याने परिपूर्ण कर की माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संधीचा भरपूर फायदा घ्यावा.येशूच्या नांवात मलाआशीर्वादकर.
केएसएम चर्च वाढ
पित्या, असे होवो की प्रत्येक व्यक्ति जोकेएसएम चे प्रत्यक्ष प्रसारणपाहत आहे तेविलक्षण चमत्कार प्राप्त करतीलत्यामुळेतेत्या प्रत्येकांना आश्चर्यात टाकेल जे त्याविषयी ऐकतील. असे होवो की ते जे ह्या चमत्कार विषयी ऐकतील ते विश्वास सुद्धा प्राप्त करतील की तुमच्याकडे वळावे व त्यामुळे चमत्कार प्राप्त करावा.
देश
पित्या, येशूच्या नांवात,अंधाराच्या दुष्ट शक्ति द्वारेविनाशाच्या प्रत्येक जाळापासून आमच्या देशाला मुक्त ठेव.
Join our WhatsApp Channel
Most Read
● रविवारी सकाळी मंडळीमध्ये वेळेवर कसे यावे?● कृपेवर कृपा
● धन्यवादाचे सामर्थ्य
● दुरून मागे मागे चालणे
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
● कृपेचे दान
● आई-वडिलांचा मान राखणे (दिवस ८)
टिप्पण्या