अडथळे हे सर्वांत यशस्वीसाधन जे शत्रू(सैतान) देवाच्या लोकांविरुद्ध वापरतो की त्यांचे दैवी कार्य पूर्ण करण्यापासून त्यांना अडथळा करावा.
येशूनेमार्था ला हे स्पष्ट केले हे म्हणत, "परंतु एका गोष्टीची गरज आहे, आणि मरीये ने तो चांगला भाग निवडला आहे." (लूक १०: ४२)
शत्रूला केवळ हेच पाहिजे असते की आपला दृष्टांत त्या प्रमुख कार्यापासून धुमिळ करावाज्यासाठी आपल्याला बोलाविले आहे. शत्रूने मग यशस्वीपणे आपले लक्ष अनेक गोष्टींकडे लावले आहे. हेतेव्हाच मग अनेक लोक सर्व दिशेने चालू लागतात, आणि शक्यतो ते निराश आणि अस्वीकृत असे चालण्यात त्यांचा शेवट होतो.
मागील अनेक वर्षांमध्ये मी पाहिले आहे की शत्रू ने कसे लोकांना त्यांना देवाने दिलेल्या कामा मध्ये अडथळा केला आहे. काहींना तो मद्य देतो, काहींना तो नशेचे पदार्थ किंवा इतर वस्तू देतो. काहींना तो निरुपद्रवी इंटरनेट खेळ देतो जे लोकांना दिवसभर बांधून ठेवतात. निष्फळ दिवस आणि आठवडे हे निघून जातात.
एका पास्टर ने त्यांच्या चर्च मधील एक सत्य घटना मला सांगितली. काही वर्षापूर्वी, ही तरुण मुलगी त्यांच्या चर्च ला नियमितपणे जात होती. ती खूपच प्रार्थनामय आणि पवित्र आत्म्याद्वारे भरलेली होती. ती गीत गटाचे मार्गदर्शन करीत असे, वचन वाचत असे, लोकांसाठी प्रार्थना करीत असे वगैरे.
एकदिवस, एक मुलगा त्यांच्या उपासनेला येऊ लागला. तो पूर्णपणे चर्च मध्ये मिसळला नव्हता. लवकरच ही मुलगी त्याच्याबरोबर बोलू लागली आणि मग उपासनेला न येण्याची काही कारणे सांगू लागली. हे केवळ तीन महिने सुद्धा झाले नसतील आणि पास्टर ला ही बातमी मिळाली की मुलीचे लग्न झाले आहे. चर्च च सोडा,त्यानंतर संपूर्ण शहरात कोणत्याही चर्च मध्ये ती दिसली नाही. दु:खद आहे परंतु सत्य आहे!
अशा प्रकारे सैतान चुकीच्या संबंधांना उपयोगात आणतो की लोकांना त्यांच्या कामापासून दूर नेण्यात लुभावितो. मी हे सांगत नाही की सर्व संबंध हे चुकीचे आहेत. तथापि, एक योग्य संबंध सुद्धा एका चुकीच्या वेळी हे विनाश होऊ शकते.
आपल्याला पारख आणि योग्य सल्ल्याची गरज आहे की शत्रूच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचावे. "परंतु अनेक सल्लागारांमध्ये तेथे सुरक्षा आहे." (नीतिसूत्रे ११: १४)
बायबल आपल्याला इशारा देते की, "सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो." (१ पेत्र ५: ८)
Bible Reading: Isaiah 35-37
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी तुला पारख साठी मागतो. माझ्याभोवती चांगले लोक ठेव जे मला तुझ्या मार्गात वाढण्यास साहाय्य करतील. पित्या, येशूच्या नांवात, मी अडथळ्याच्या प्रत्येक आत्म्याला बांधतो जे मला दैवी कार्य करण्यापासून अडथळा करेल. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे● महाविजयीठरणे
● केवळ इतरत्र धावू नका
● येशूचे प्रभुत्व कबूल करणे
● तयारी नसलेल्या जगात तयारी
● प्रार्थनेची निकड
● जर ते तुमच्यासाठी महत्वाचे असेल, तर ते देवासाठीही महत्वाचे आहे
टिप्पण्या