नुकतेच, आमच्या एका पुढारी सभे मध्ये एका तरुण व्यक्तीने एक मनोरंजक प्रश्न विचारला: येशूला ह्या पृथ्वीवर एक बाळ म्हणून का यावे लागले? तोकेवळ एक माणूस म्हणून येऊ शकत नव्हता काय?
वास्तवात, पहिल्याशतकातील अनेक यहूदी लोकांनी याच गोष्टीचे आश्चर्य केले होते. तुम्ही पाहा, त्यांच्या मनात, खूप वर्षापासून ज्याची वाट पाहत आहे तो मशीहा एक सेनेचा अधिकारी असा येईल असे होते. त्याच्याकडे शलमोनाचे ज्ञान, दावीदाचा दरारा, मोशेचे ईश्वरीयपण, व यहोशवा सारखे सेनेचे कौशल्य असे सर्व मिळून असेल.
त्यावेळी, इस्राएल रोमन वर्चस्वाखाली होते व एक सेनेचा अधिकारी मशीहा हा एक बाळ मशीहा पेक्षा काही अर्थ सांगणारा असेल. नाही म्हटले तरी, एक बाळ एका राष्ट्राला वाचवू शकत नाही, बरोबर आहे ना? तसेच,पवित्र शास्त्रात देवदूत हे नेहमीच जुन्या करारात पूर्ण वाढ झालेले मनुष्य असे दिसले आहेत. तर मग तसे का येऊ नये?
कारण#१
येशू कुमारी पासून जन्मल्याने, त्याने त्याची दैवता निश्चित केली (मत्तय १:२२)
आपल्या पैंकी अनेक जणांस ठाऊक आहे की प्रभु येशू हा मरीया, एक कुमारी पासून जन्मला. आपल्या प्रभूचा प्रत्यक्ष जन्म घेण्याच्या शेकडो वर्षांपूर्वी,यशया संदेष्ट्याने प्रत्यक्षात भविष्यवाणी केली होती की एक कुमारी अनेक वर्षांपासून ज्याची वाट पाहत आहे त्या मशीहा ला जन्म देईल.
"यास्तव प्रभु स्वतः तुम्हांस चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नांव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील." (यशया ७:१४)
कारण#२
त्याचे अशा प्रकारे येणे हे त्याच्या मानवतेस सुद्धा दर्शविते
देवदूता सारखे नाही, येशू मानवासारखा दिसत नव्हता. तो पूर्ण मानव होता! तो एका राष्ट्राला वाचविण्यासाठी आला नव्हता परंतु तो आला की आपल्याला पापापासून वाचवावे. तो केवळ इस्राएल चा तारणारा नाही परंतु संपूर्ण जगाचा तारणारा आहे.
प्रभु येशू १०० टक्के मानव १०० टक्के देव होता जो त्याच वेळी शरीरात प्रगटझाला होता. पुढीलवचन हे स्पष्ट करते:
म्हणून त्याला सर्व प्रकारे 'आपल्या बंधुसारखे' होणे अगत्याचे होते, ह्यासाठीकी, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. (इब्री २:१७)
जेणेकरून निष्पाप असे एक मानव म्हणून आपल्याला सत्यात प्रतिनिधित करावे, त्यास अयोग्य लाभ मिळू शकले नाही. "त्यास सर्व बाबतीत आपल्यासारखे (त्याचे बंधुजन)व्हावयाचे होते की लोकांच्या पापांकरिता प्रायश्चित्त करावे. हे सत्य समजणे हे तुमच्या नाताळ ला अधिक अर्थभरित करेल.
प्रार्थना
पित्या, माझ्या अंत:करणाला तयार कर कीह्या जगात तुझ्या पुत्राचा प्रवेश होण्याचा उत्सव करावा. येशूच्या नांवात.
पित्या, माझ्याकुटुंबाच्या सदस्यांना तयार कर कीह्या जगात तुझ्या पुत्राचा प्रवेश होण्याचा उत्सव करावा. आमेन.
माझ्या तारणासाठी येण्यास व पित्याची सिद्ध योजनापूर्ण करण्यासाठीप्रभु येशू तुझा धन्यवाद होवो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● एक क्षेत्र ज्यामध्ये सैतान तुम्हांला अधिक अडथळा आणतो● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-२
● बारा मधील एक
● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
● छाटण्याचा समय– २
● नरक हे खरे स्थान आहे
टिप्पण्या